
वडूज/ प्रतिनिधी: विनोद लोहार
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या वडूज शहराच्या उपनगराध्यक्ष पदी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे कट्टर , विश्वासू समर्थक वडूज नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक सोमनाथ नारायण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपुर्वी गत उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांनी आपल्या पदाचा राजीनामा विद्यमान नगराध्यक्षा सौ.रेशमा बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केला होता.या रिक्त झालेल्या जागी प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता उपनगराध्यक्ष पद निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी कामकाज पाहिले.दरम्यान यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संदिप घार्गे, नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांच्यासह वडूज नगरपंचायतीच्यानगरसेविका , नगरसेवक, कार्यकारी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वडूज नगरपंचायत इमारतीमध्ये पद निवडप्रक्रिया पार पडली. व पार्टी अंतर्गत समज्योत्यानुसार एकमुखाने सोमनाथ जाधव यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर होताच प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे, वडूज नगरपंचायती चे नगरसेवक, नगरसेविका , कार्यकारी नगरसेवक, यांच्यासह वडूज मधील सामाजिक , राजकीय कार्यकर्ते व समाज बांधवांनी जाधव यांना शुभेच्छा देत सत्कार केलें व अभिनंदन केले.
सदरच्या निवडीनंतर कार्यकर्तेंनी व समाज बांधवांनी नगरपंचायत परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत व पेढे वाटून निवडीबद्दल जल्लोष साजरा केला.
दरम्यान
रात्री सहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायतीच्या कार्यालया पासून फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत एसटी बस स्थानक परिसर, शिवाजी चौक, हुतात्मा स्मारक, भैरवनाथ मंदिर, जुनी बाजारपेठ, शेतकरी चौक, गणपती मंदिर अश्या मार्ग क्रमानें जाधव यांची जल्लोषात वडूज नगरीतून मिरवणूक काढण्यात आली.

( : वडूज नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी सोमनाथ जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करताना प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे व इतर मान्यवर)