
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज : येथील ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त रविवारी दिनांक ६ ते शुक्रवार दिनांक २५ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.प्रशांत गोडसे यांनी दिली .
रविवार दिनांक ६ एप्रिलपासून ते शनिवार दिनांक १२ एप्रिल पर्यत केदार विजय ग्रंथाचे पारायण आयोजीत केले आहे . त्यामध्ये दररोज पहाटे ६ .३० वाजता श्री जोतिबा देवास अभिषेक , दररोज सकाळी ७ वा १५ मि. आरती , ७.५० ते ११ .५० केदार विजय ग्रंथाचे सामुदायिक वाचन तसेच सायकांळी दररोज आरती होणार आहे . शुक्रवार दि. ११ रोजी सकाळी ७.३० वा. जोतिबा देवाची मिरवणूकीने आगमन झाले . तसेच रात्री ८ वा. वारसा महाराष्ट्राचा हा शिवकालीन लोककलांचा जागर कार्यक्रम संपन्न झाला . तसेच शनिवार दि. १२ रोजी दुपारी २.३० वा. ह.भ.प. विजय महाराज शिंदे लोणीकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे . तसेच सायकांळी ५ वा २७ मि. श्री जोतिबा देवाची पालखीतून भव्य मिरवणूक असून त्यात उंट नगारा , घोडे – मोरंग्या , सुर – सुनई ( हलगी ) , तसेच विद्युत रोशनाई , संभळ – पथक , महाकाल ( अघोरी ) ही असणार आहेत . रविवार दि. १३ रोजी दुपारी २ वाजले पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . सोमवार दि . १४ रोजी भव्य डोळ्यांचे आरोग्य शिबीर होणार आहे . बुधवार दि. १६ रोजी रात्री ९ वा . फुलवंती पुणेकर यांचा ठसकेबाज लावण्यांचा बहारदार कार्यक्रम असणार आहे . शुक्रवार दि. २५ रोजी ४ वाजले पासून प्रथमच श्री जोतिर्लिग यात्रा कमेटी व श्री भैरवनाथ यात्रा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बागेमध्ये होणार आहे . याचदिवशी पेडगाव फाटी येथे भव्य बैलगाड्यांच्या जंगी शर्यंती होणार आहेत .
यात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे , निलेश संभाजीराव गोडसे ( काका ) , उपाध्यक्ष हणमंत महादेव गोडसे , महेश नारायण गोडसे ( दादा ) , सचिन उत्तम गोडसे ( आण्णा ) , खजिनदार – डॉ. रोहन राजेंद्र गोडसे , नवनाथ राजाराम गोडसे , मोहन सुदाम गोडसे , सचिव – अमोल सयाजी गोडसे , निलेश अंगदराव गोडसे , तानाजी बापूराव पवार , प्रतिक चंद्रशेखर गोडसे , नितीन शिवाजी जगदाळे , सहसचिव संजय जोतिराम गोडसे (बंटी ) रविराज गोडसे व समस्त ग्रामस्थ व जोतिर्लिग यात्रा कमेटी वडूज हे प्रयत्नशील आहेत . सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत गोडसे यांनी केले आहे