
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध, ता.२२: महाराष्ट्रसह अनेक राज्यातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री यमाई केसरी बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यामध्ये मोहित शेठ धुमाळ यांचा बकासुर व कै.रणजीत निंबाळकर सर यांचा सर्जा या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे एक लाख रुपयांचे रोख बक्षीस ढाल व आकर्षक चषक जिंकून श्री यमाई केसरी चा किताब पटकावला.
येथील खरशिंगे रोड जवळ असलेल्या सरकारी मळा या मैदानात सकाळी आठ वाजता गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचा उपस्थितीत शासनाच्या सर्व नियम व अटींना अधीन राहून पार पडलेल्या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ही तीन राऊंड शर्यत होती शर्यतीला ४७५ गाड्यांची नोंद होऊन गटाचे एकूण ५४ फेरे व सेमी फायनलच्या सात फेऱ्या झाल्या कमिटीच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे एका दिवसात उजेडात फायनलचा फेरा झाला दुसऱ्या क्रमांकापासून विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे २) सागर शेठ कटरे कटरेवाडी, कटरेवाडी घाणद, जहांगीर शेठ खरसुंडी,३) सिद्धिविनायक प्रसन्न रणजीत निंबाळकर व मयुरी रणदिवे औंधकर,४) सोनाली एंटरप्राइजेस चऱ्हेगावकर, ५) संस्कार शिंदे करवडी, ६) प्रमोद जाधव ,स्वामी समर्थ कळंबी,७) भैरवनाथ प्रसन्न हिंदकेसरी संभाजी आबा काले आणि पाटकळकर.
बैलांना पळण्यासाठी आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी योग्य असे मैदान तयार केले होते मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिलार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळाला स्पर्धेतील प्रत्येक फेऱ्या चुरशीच्या होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक ठरली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते विजेता बैलगाडी मालकांना रोख रक्कम व प्रत्येकी एक ढाल देऊन सन्मानित केले गेले प्रत्येक सेमी फायनल मध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह तर गट विजेत्या प्रथम बैलगाडी साठी सन्मानचिन्ह दिले गेले. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी, रोहन खन्ना, हणमंतराव शिंदे ,राजेंद्र माने ,प्रशांतराव खरमोडे , दीपक नलवडे,अमरसिंह देशमुख,गणेश देशमुख ,गणेश हरिदास, दाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते