अन्नदान हे तर ना. मकरंद पाटील यांच्या पदाला साजेसे काम : सागर भोगावकर

Spread the love


वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने अन्नदान

सातारा : ना. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा रुग्णालयात अन्नदान करत ना. मकरंद पाटील यांच्या मदत व पुनर्वसन मंत्रीपदाला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाने साजेसे काम केले असल्याचे गौरवोद्गार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सागर भोगावकर यांनी काढले.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने प्रदेश उपाध्यक्षंकडून येथील जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. हरीष पाटणे यांच्या हस्ते
अन्नदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, शल्य चिकित्सक युवराज करपे, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस युवाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, स्मिता देशमुख, जिल्हा महिला अध्यक्षा सिमा जाधव, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, कुलदीप भोगावकर, मनिष लाहोटी उपस्थित होते.
सागर भोगावकर पुढे म्हणाले, गेल्या सहा महिन्यात राज्यामध्ये पावसाचे सुलतानी संकट आल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत असताना ना. मकरंद पाटील यांनी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत स्तुत्य असून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा करत आपण कोणत्याही परिस्थिती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ना. मकरंद पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. यावरूनच त्यांचा शेतकऱ्यांप्रति असणारा कळवळा अधोरेखित होतो, असेही सागर भोगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!