
वडूज प्रतिनिधी- विनोद लोहार
वडूज: सातेवाडी ता.खटाव येथील सुकन्या व सेवागिरी इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.सोनम जितेंद्र संकपाळ (बोटे ) हिने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती व एन एसएसई स्पर्धा परीक्षेत अव्वलस्थानी येण्याचा मान पटकावला.कु.सोनम जितेंद्र संकपाळ (बोटे ) हिने एन एसएसई स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र राज्यात इयत्ता तिसरी मध्ये २०० पैकी १८२ मार्क्स मिळवून दहावा क्रमांक पटकावला. तर भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा शैक्षणिक वर्षात सातारा जिल्ह्यात८० टक्के मार्क्स मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
. तिच्या या उज्वल यशाबद्दल पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सातेवाडी ग्रामस्थ आणि सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.