
म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै. अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश पिसे यांचे शुभहस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या प्रसंगी मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी श्री गणेश पिसे यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष शेटे, बाबू मुल्ला, विलास माने, देविदास डमकले, निवृत्ती सराटे, निलेश लिंगे, दिनेश मोरे, ग्रंथपाल सुनिल राऊत आदी उपस्थित होते.