म्हसवड जि.प.शाळा नंबर १ ला शिक्षणाधिकारी यांची सदिच्छा भेट

Spread the love

माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मन पिसे व डायटचे अधिव्याख्याता श्री.कोकरे यांची म्हसवड जि.प.शाळा नंबर १ ला सदिच्छा भेट व शिक्षकवृंदाना मार्गदर्शन.

गोंदवले –
आज बुधवार दिनांक 4/12/2024 रोजी village go to school उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नंबर १ या ठिकाणी डायट चे अधिव्याख्याता सन्माननीय श्री.विजयकुमार कोकरेसाहेब व माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री.लक्ष्मणराव पिसेसाहेब यांनी शाळेत भेट दिली त्यावेळी साहेबांनी लोकसहभाग करून शाळेचा कायापालट, रंगरूप बदलण्यासाठी आवाहन केले त्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व शिक्षक स्टाफ यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये वर्गणी जमा करण्याचे ठरले त्याप्रमाणे आठ शिक्षकांनी त्वरित आवाहनास प्रतिसाद देत प्रत्येकी 5000 प्रमाणे 40000 रुपये वर्गणी शाळेमध्ये जमा झाली. सन्माननीय कोकरे साहेब व सन्माननीय पिसे साहेब या दोघांनीही सर्व शिक्षकांचे वैयक्तिक अभिनंदन केले.
छाया – माणचे गटशिक्षणाधिकारी पिसे साहेब, डायटचे अधिव्याख्याता श्री.विजयकुमार कोकरे साहेब,जि.प.शाळा नंबर १ म्हसवडचे शिक्षकवृंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!