(अजित जगताप)
सातारा दि: महाराष्ट्र शासनाने वारंवार ग्राम विकास विभाग अंतर्गत तसेच वित्त विभाग, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने सातत्याने आदेश दिलेले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी सातारा जिल्हा परिषद करत नाही. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी फटाक्याची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून गेला.
गतीशील शासन ,,,महाराष्ट्र शासन असे ब्रीदवाक्य असले तरी शासन आदेश काहींच्या बाबतीत जिल्हा पातळीवर त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यासाठी लक्ष वेधून घ्यावे. म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते संजय गाडे, विशाल कांबळे, आशुतोष वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सुहास मोरे, शंकर उईके, गणेश काटे, रोहिणी माने, अभिजीत गायकवाड, प्रशांत उबाळे, अजित पुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रारंभ जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले व योग्य ते दखल घेतली जाईल असे स्पष्ट केले. सातारा जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी मराठी 30 व इंग्रजी 40 टंकलेखन प्रमाणपत्र सादर केले होते ते अवैद्य ठरले आहे जिल्हा परिषद कारल्याची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे त्यानुसार कार्यालयाकडूनही त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे परंतु अद्यापही ठोस कारवाई होऊ शकलेली नाही त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. एखाद्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जातो. परंतु सातारा जिल्हा परिषदेचेच काही कर्मचारी हे शासनाची फसवणूक करत असून सुद्धा अधिकारी तोच कारवाई करत नाही. यामुळे प्रशासकीय कामकाजावरती परिणाम होत असल्याची माहिती संजय गाडे यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

फोटो सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करताना आंदोलन (छाया- अजित जगताप, सातारा)