संत नामदेव यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम इंजिनीयर सुनील पोरे यांनी केले -माजी आमदार प्रकाश देवळे

Spread the love

संत नामदेव यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम इंजिनीयर सुनील पोरे यांनी केले -माजी आमदार प्रकाश देवळे

म्हसवड ( वार्ताहर)
श्री संत नामदेव महाराजांचा वसा आणि वारसा जोपासण्याचे आदर्श कार्य करत असलेल्या इंजि.सुनील पोरे यांना नामदेव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून त्यांनी या पुढील काळात नामदेव शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करावेत असे उदगार माजी आमदार प्रकाश देवळे यांनी काढले. ‌ पुणे येथील नामदेव व्हिजन फाउंडेशन तर्फे देणेत येणारा राज्यस्तरीय “नामदेव समाज भूषण” हा सातारा जिल्ह्याचे शिंपी समाज अध्यक्ष इंजि सुनील पोरे याना रविवारी 4 डिसेंबर रोजी पुणे येथील अल्पबचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात समाजाचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे हस्ते शाल श्रीफळ नामदेव प्रतिमा व सन्मानपत्र देवून करणेत आला.या वेळी नासपचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर डॉ अजय फुटाणे, राजेंद्र पोरे, रविंद्र रहाणे एकनाथ सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी पुढे बोलताना माजी आमदार देवळे म्हणाले राज्यभरातून सुमारे सात हजार समाज बंधु भगिनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असून इंजि.सुनिल पोरे यांनी यांनी समाजासाठी व समाजेत्तर केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेवून हा पुरस्कार देणेत आला आहे.तसेच त्यांनी नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे.त्यांच्या कडून समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न व्हावेत अशी भावना आहे.पुढील काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे असं सांगत त्यांनी अजून जोमाने कार्य करावे असे आवाहनही देवळे यांनी केले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना इंजिनिअर सुनील पोरे म्हणाले श्री संत नामदेव शिंपी समाज संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना संघटित करण्याचे कार्य हाती घेतली व एकसंघ समाज झाल्याच्या नंतर नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आले असून या पुढील काळात आपल्या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी हे आर्थिक विकास महामंडळ मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही श्री संत नामदेव महाराजांचे वसा आणि वारसा जोपासण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असून समाजाने एक संघ राहण्याची गरज असल्याचे सांगून आपण यापुढील काळात अधिक उमेदीने कार्य करणार असून नामदेव समाज भूषण हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो सर्व समाजाचा असल्याचे मत पोरे यांनी मांडले
यावेळी कार्यक्रमास संजय सारोळकर डॉ राजेश्वर सुपेकर डॉ स्वप्ना सुपेकर ईश्वर धिरडे नागपुर भास्कर टोंपे वनेश खैरनार अतुल मानकर नामदेव व्हिजन फाउंडेशन चे महेश मांढरे कैलास नेवासकर राजकिशोर सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मांढरे यांनी केले तर आभार कैलास नेवासकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!