म्हसवड वार्ताहर
म्हसवड येथील इलेक्ट्रिक व्यापारी व म्हसवड नगरपालिकेचे स्थापत्य इंजिनिअर नितीन यांचे वडील गजानन आत्माराम तिवाटणे यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे मुली नातवंडे, मुले, आणि सुना असा परिवार आहे. म्हसवड येथील प्रसिद्ध स्थापत्य अभियंता नितीन तिवाटणे व इलेक्ट्रिक व्यापारी राकेश तिवाटणे, यांचे ते वडील होते.
मृत्यू समयी ते 86 वर्षाचे होते. त्यांनी नुकतीच महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेली होती.
अतिशय वृत्तस्थ असे जीवन जगत होते.
म्हसवड परिसरामध्ये तिवाटणे साहेब या नावाने ते परिचित होते.
गेली अनेक वर्ष म्हसवड शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती व हातपंप दुरुस्तीचा व्यवसाय करीत होते.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वर म्हसवड येथील कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधना नंतर म्हसवड परिसरातील व्यापाऱ्यांनी दुःख व्यक्त करून अंत्यदर्शन घेतले.
…… ….. …. …. …. …. …. …