म्हसवड वार्ताहर
लोणंद MIDC ते मरिआईचीवाडी येथील हद्दीत सुरू असलेला केंद्र सरकारचा सौरऊर्जा प्रकल्प काही दिवसात सुरू होत आहे.
या प्रकल्पातून HT विद्युत लाईन औद्योगिक क्षेत्राकडे घेऊन जायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु ही लाईन जाण्यास बेंदवस्ती व सभोवतालच्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, राजकीय दबावापोटी या विद्युत लाईनच्या सर्व्हेमध्ये बदल करण्यात आला होता.
सदरच्या कामास कडाडून विरोध झाल्यावर शेतकऱ्यांनी हा प्रकार भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील यांच्या कानावर घातला. संबंधित शेतकरी, काँट्रॅक्टर, नायब तहसीलदार यांनी घटना स्थळावर पाहून सर्व्हे करून मा.तहसीलदार यांना अहवाल पाठवला.
श्री.हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी हा प्रकार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून देताच ग्रामविकास मंत्र्यांनी तहसीलदार अजित पाटील यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच ही विद्युत लाईन पुढे घेऊन जाण्याच्या सूचना केल्या.
त्याप्रमाणे आज तहसीलदार मा.अजित पाटील साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील, महावितरण उपविभागीय अधिकारी श्री.रेड्डीसाहेब, काँट्रॅक्टर श्री.खुडे, मंडलअधिकारी श्री.देवकाते साहेब यांनी संबधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढला व औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या HT विद्युत लाईनचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी नगरसेवक शिवाजीराव शेळके, मस्कुआन्ना शेळके, संदीप शेळके, शामराव शेळके, विकास क्षीरसागर, शरद शेळके, दिलीप क्षीरसागर, गोकुळ क्षीरसागर, तेजस शेळके, संतोष क्षीरसागर, संजय क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, मंगेश क्षीरसागर, सुजित क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
बेंदवस्ती व पाटीलवस्ती येथील शेतकऱ्यांच्या कडून ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Leave a Reply