
वडूज/ प्रतिनिधी-विनोद लोहार
येथील नगरपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत ऑनलाईन नोंदणी
अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश चव्हाण व नगराध्यक्ष सौ.रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत वडूज नगरपंचायत हद्दीतील घरकुल मंजुरीसाठी“ऑनलाईन नोंदणी अभियान ” दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राबविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी आधार कार्ड,उत्पन्न दाखला,बँक पासबुक
जागेचा पुरावा (७/१२, सिटी सर्वे उतारा, येणे प्लॉट, आखीव पत्र),पि.एम. स्वनिधी इमारत बांधकाम कामगार
इत्यादी योजनेचे लाभार्थी असलेस नोंदणी क्रमांक प्रत आवश्यक असून नगरपंचायत कार्यालयात गुरुवार
दिनांक : १४ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
तसेच अधिक माहितीसाठी प्रधान मंत्री आवास योजना कक्ष नगरपंचायत वडूज येथे संपर्क साधावा.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी केले आहे.