पुणे-सत्यशोधक महासभा प्रबोधन सभे तर्फे दरवर्षी प्रमाणे समता भुमी वरील महात्मा फुले वाड्यात विश्व सम्राट बळीराजाची मिरवणूक बलिप्रतिपदादिनी दि.22 ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 11 ते दु.2 पर्यंत काढण्यात आली यंदाचे 23 वे वर्ष होते.
यावेळी प्रथम समाजसेवक अँड .मोहन आणि ॲड. शारदा वाडेकर, प्रतिमा परदेशी यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तर जेष्ठ समाजसेवक अंकल सोनवणे यांचे शुभहस्ते विश्वसम्राट बळीराजाला भव्य पुष्पहार घालण्यात आला. बळीराजाच्या भूमिकेत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक होते.
या प्रसंगी अँड.मोहन वाडेकर म्हणाले की शेतकरी म्हणजे बळीराजा परंतु शेतमालाला हमी भाव कायदा असतानाही लागू होत नाही हे दुर्दैव्य आहे. गेली अनेक वर्ष कोणतेही सरकार आले तरी बळीराजा सुखावेल अशी कधीही कामे करीत नाही.यावेळी तर अनेक ठिकाणी महापूर आल्याने शेतकरी बांधवांचे जमिनीचे आतोनात नुकसान होऊन देखील सरकार तटपूजी मदत करताना आढळेना, खरे तर ओला दुष्काळ जाहीर करून एकरी किमान 50 हजार रुपये तरी मदत करावी तसेच जमिनी साठी मोफत गाळ उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली.
यावेळी बळीराजा गौरव महोत्सव समिती मिरवणुकीच्या आयोजिका प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की बळीराजाच्या काळात शेतकऱ्या वर कधीही संकट आले नाही ते राज्य महिलांसाठी व शेतकऱ्यासाठी खूप आनंददायी चांगले होते ते दिवस पुन्हा येण्यासाठी बहुजनांनी एकत्र आले तरच सुगीचे दिवस येतील असे म्हणत पुढील वर्ष मिरवणुकीचे 24 असल्याने सर्व तरुणांनीच त्याचे नेतृत्व करावे असे आव्हान केले.
लाल महालात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि राजेंद्र शेलार रोहिदास तोडकर व नवनाथ लोंढे यांनी पुष्पहार अर्पण केला. समारोप प्रसंगी सत्याचा अखंड कु. शान्सी चव्हाण हिने सुंदर आवाजात गायला
या.वेळी , ,महेश बनकर, मधुकर राऊत, मारुती जाधव,आशा ढोक , शिल्पा शिरवणकर अनेक मान्यवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोलाची मदत ,प्रवीण – प्रतिक परदेशी, आप्पाराव चव्हाण, वामन वळवी, क्षितिज ढोक , गाथा परदेशी ,यांनी केली.
बळीराजाचा जयघोष ईडा पीडा टळू दे बळीराजाच राज्य येऊ दे हा जयघोष व महापुरुषांचे नावांनच्या घोषणानी आणि न्यू.अमर बँड च्या देशभक्तीपर आणि शेतकरी, बळीराजावरील सुमधुर गीतांनी फुले वाडा ते लाल महाल मिरवणूक दरम्यान परिसर घुमघुमला होता.यावेळी जागोजागी चौकात बळीराजाचे स्वागत फटाकडे माळ वाजवून पुष्पहार व फळभाज्या चे हार घालून स्वागत केले आणि विशेष म्हणजे यावेळी तरुणा सोबत मान्यवरांनी महिला पुरुषांनी गोल रिंगण करून नाचत बळी राज्य पुन्हा लवकर येऊ दे असे आवाहन देखील करीत होते. तर बळीराजाच्या हस्ते सर्वाना कृषिधन, फळभाज्याचे वाटप करण्यात आले.
तर दिवाळी निमित्त नागपूर व इतरत्र ठिकाणावरून आलेल्या कुटुंबांनी लाल महालात विश्व सम्राट बळीराजा सोबत अनेकांनी फोटो काढले.
पुण्यात विश्व सम्राट बळीराजा गौरव मिरवणूक मोठ्या दिमाखात पार पडली.