(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये अन्याय सहन न करता झटणारे अनेक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यात आहे. पण, एका दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते व सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी एका पोलिस अधिकाऱ्यांना नम्रपणे मोबाईल द्वारे संपर्क साधला. मात्र त्यांनी हलक्यात घेऊन सिंघम स्टाईल भाषा वापरली. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांनी त्याचा चिंगम करून त्याच्या चौकशीचा फार्स चांगलाच आवडला आहे.
याबाबत माहिती अशी की
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या मंत्री व युट्युब चे संपादक पत्रकार वादाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय गाडे यांनी अत्यंत नम्रपणे लोकशाही मार्गाने आणि धाडसाने याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्यांनी पक्षाला लाजवेल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत संसदीय भाषा वापरून त्या पोलिस अधिकाऱ्यांनी वर्दीचाच अवमान केला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील संविधानवादी, परिवर्तनवादी ,आंबेडकरवादी विचाराच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. त्यांना वस्तूस्थिती सांगून व दाखवून दिली याबाबत गांभीर्याने लक्ष वेधून त्यांनी सदर पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आशुतोष वाघमोडे यांनी दिली.
आज सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये श्री संजय गाडे, सत्यवान कमाने, गणेश भिसे, महारुद्र तिकुंडे, सुरेश बोतालजी, चंद्रकांत कांबळे, उमेश चव्हाण, अमोल पाटोळे, ऋषिकेश गायकवाड, रोहन राजेशिर्के, महेश शिवदास, किरण बगाडे, सतीश गाडे ,सचिन कांबळे, डॉ. रमाकांत साठे, विशाल कांबळे, अभिजीत गायकवाड, प्रशांत उबाळे, सुनीता येवले, रेखा सकट, किरण माने, युवराज कांबळे, अरविंद गाडे, अरबाज शेख, सादिक शेख यांच्यासह अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास आठ दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात पुन्हा आंदोलन केले जाईल. असाही इशारा सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यात प्रामाणिक व समाज हिताचे निर्णय घेणारे सामाजिक कार्यकर्ते व पोलीस दल यांच्यामध्ये चांगला समन्वय असल्यामुळे अनेक विधायक उपक्रम सातारा जिल्ह्यात राबवले जात आहेत. ही कौतुकस्पद बाब आहे. परंतु, काही झारीतील शुक्राचार्य सुद्धा दोन्ही बाजूला असल्यामुळे अनेक वेळा कटू अनुभव घ्यावा लागतो.
लोकशाही मार्गाने समन्वय साधला तर प्रत्येकाची प्रतिष्ठा जपली जाते. सातारा जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यामध्ये विशेषता दुष्काळी भागातील पोलीस अधिकारी वर्दीचा अति डोस देऊन कार्यकर्त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी मात्र हा प्रयत्न कार्यकर्त्यांनीच अक्षरशः हाणून पाडला आहे. सदर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे. त्या त्या ठिकाणी दोन नंबरच्या व्यवसायिकांशी त्यांचे संबंध अनेकदा उघड झाले आहेत. अशीही टीका आता होऊ लागलेली आहे .
दरम्यान, लोकशाहीमध्ये कायद्याचे रक्षण व पालन करणे हे सर्वांचे जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवून काम करणे हिताचे आहे. अशी भूमिका शांतता प्रिय नागरिकांनी घेतलेले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन जी भूमिका घेतली. त्याचे सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
फोटो -सातारा पोलीस मुख्यालयामध्ये आक्रमक झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते (छाया- आशुतोष वाघमोडे सातारा)
