
म्हसवड पालिका हद्दीतील सार्वजनिक शौच्छालयाची अतिशय दैयनिय अवस्था झाली असुन याबाबत माध्यमांनी आवाज उठवत प्रशासनाच्या दुर्लक्षपणावर बोट ठेवल्याने खडबडुन जागे झालेल्या पालिका प्रशासनाने आज पालिका हद्दीतील सर्वच सार्वजनिक शौच्छालयात जावुन पाहणी केली.
पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी याबाबत गांभीर्य दाखवत पालिका अभियंता, कर्मचार्यांना व स्वच्छता ठेकेदारास सोबत घेत म्हसवड पालिका हद्दीतील बाजार पटांगण, गुरव गल्ली, बाय पास रोड, यात्रा पटांगण, आंबेडकर नगर, माळी गल्ली, सणगर गल्ली, मासाळवाडी, माने वस्ती, उद्यमनगर १, उद्यम नगर २, विरकरवाडी, बेघरवस्ती, झगडे वस्ती, नागोबा मंदिर, मल्हारनगर, चोपडेवस्ती, रामोशीगल्ली आदी ठिकाणी जावुन तेथील सार्वजनिक शौच्छालयाची पाहणी केली. ही शौच्छालये २० वर्षापुर्वीची असल्यानेच त्यांची अवस्था सध्या दैयनिय झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना विचारले असता सर्वच सार्वजनिक शौच्छालयाच्या खर्चाचे ऑडीट करुन लवकरच सार्वजनिक शौच्छालयात सर्व दुरुस्ती करुन नागरीकांची गैरसोय दुर करु असे त्यांनी सांगितले.