पत्रकार हा समाजाचा शिल्पकार असतो. – नितीन शेठ दोशी

Spread the love

म्हसवड (वार्ताहर)

पत्रकार हे समाज आणि देश घडवत असतात, पत्रकार हाच समाजाचा खरा शिल्पकार असतो,असे विचार माजी नगराध्यक्ष, अहिंसा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी म्हसवड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने म्हसवड प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
या वेळेला ते बोलत होते.


या वेळेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे -पाटील हे होते.
या वेळेला अहिंसा नगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी म्हणाले की म्हसवड व परिसरातील पत्रकार सतत जागरूकपणे काम करतात , पत्रकारामुळे समाजव्यवस्था टिकून राहत असते महाराष्ट्र इतर राज्यामध्ये माण तालुक्यातील पत्रकारांनी आपलं स्थान निर्माण केलेले आहे.
पत्रकार सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्राबरोबरच आर्थिक क्षेत्रात काम करतात
अहिंसा पतसंस्थेच्या प्रगती मध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकारांचे अतिशय मोलाच सहकार्य केल्यामुळे अहिंसा नगरी सहकारी पतसंस्थेचा नावलौकिक वाढला असून अहिंसा नागरिक पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर सामाजिक काम करण्यासाठी अहिंसा नागरी सहकारी संस्था नेहमीच अग्रेसर असते.
असे या वेळेला दोशी म्हणाले ,
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हसवड प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष महेश कांबळे म्हणाले की म्हसवड व शहरातील अग्रगण्य असणारी अहिंसा नागरि सहकारी पतसंस्था राजकारण विरहित अर्थकारण असणारी एकमेव पतसंस्था असून अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. यामुळे या संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे. सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये विविध समस्या सोडवण्यासाठी यां नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व चेअरमन सतत काम करत असतात यामुळे या पतसंस्थेने मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. आणि याचबरोबर या पतसंस्थेने लोकांचा विश्वास निर्माण करून मान तालुक्यातील जनतेला या पतसंस्थेने आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे.
या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळालेले असून माण तालुक्यातील विद्यार्थी हे चमकदार कामगिरी करून अधिकारी बनलेले आहेत.
या वेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे पाटील म्हणाले की माण तालुक्यामध्ये अहिंसा नागरी पतसंस्थेचे कार्य हे इतर पतसंस्थेपेक्षा वेगळा असून या पतसंस्थेने काळाच्या ओघा बरोबर आधुनिकीकरणाला जोड दिली आहे .आधुनिकीकरण पतसंस्थेने करून आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे . आपुलकी ची विश्वासार्ह सेवा हे या संस्थेचे ध्येय आहे.याच प्रमाणे अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी या पतसंस्थेच्या कार्याचा नावलौकिक महाराष्ट्र बाहेर निर्माण केलेला आहे. विश्वासार्हते मुळे व उतम सेवा यामुळे या पतसंस्थेच्या ठेवी वाढल्या आहेत .या पतसंस्थेने आर्थिक हित न पाहता लोकांचे सामाजिक हित पाहून समाजातील विविध गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करून त्यांना कार्याची मोठी प्रेरणा दिलेली आहे आणि या पतसंस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळाले आहे,
संस्थेने सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली असून माण तालुक्यातील बेरोजगारांना हाताला काम देण्याचे काम या पतसंस्थेने केले असून अनेक उद्योजक या पतसंस्थेने निर्माण केलेले आहेत.
यावेळेला प्रेस क्लब चे उपाध्यक्ष सचिन सरतापे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कर्मचारी नितीन वाडेकर यांनी केलं
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक महेश ,मासाळ संस्थेचे कर्मचारी महेश पतंगे नीरज होरा आनंद लिंगे बाबू भाई मुलानी मनोज शिंदे , हरिदास मासाळ ,सतीश विरकर, अजमल मूजावर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!