पेट्रोल पंपावर ४ लाखांचा अपहार करुन फरार झालेल्या मॅनेजर ला अटक

Spread the love

म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

म्हसवड (वार्ताहर )
म्हसवड येथील यश पेट्रोल पंपावर हिशोबाच्या पैशात ४ लाखांचा अपहार करून फरार झालेल्या मॅनेजर ला म्हसवड पोलीसांनी केली अटक.

सविस्तर हकीकत

यश पेट्रोलियम, म्हसवड सुर्यवंशी यांच्या पेट्रोल पंप वर मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी रणजीत नवनाथ सरगर राहणार दीडवाघवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा याने दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल व डिझेल विक्रीतील पैशातील हिशोबामध्ये अपहार करून तब्बल 4 लाख 11 हजार 279 रुपयांचा अपहार फसवणूक करून सदरची रक्कम चोरल्या बाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
याबाबत ची फिर्याद दुर्गेश पांडुरंग शिंदे जनरल मॅनेजर यांनी म्हसवड पोलीसात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर लक्षात आले की सदर रक्कम घेऊन हा आरोपी फरार झालेला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या आरोपीस पकडण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथके रवाना केलेली होती. परंतु हा आरोपी गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता व मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता.
*तरी देखील तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी रणजीत नवनाथ सरगर,राहणार दीडवाघवाडी हा सोलापूर -सातारा बॉर्डर येथे येणार असल्याबाबत अचूक माहिती काढून या आरोपीस वेशांतर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे आणि स्टाफने पाठलाग करून पकडले.
*या आरोपीस माननीय न्यायालयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड करीत हजर केले असता माननीय न्यायालय म्हसवड यांनी आरोपी रणजीत नवनाथ सरगर याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे या करीत आहेत.
सदरची आरोपी अटकेची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, नीता पळे, भास्कर गोडसे, महावीर कोकरे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, वसीम मुलानी, सतीश जाधव, अभिजीत भादुले, दया माळी यांनी या आरोपीस अटक करणे कामी तपास पथकात काम करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!