म्हसवड :-वृत्तसेवा
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक 27 रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील नामदेव समाज शिंपी बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांनी केले आहे.
रविवार दिनांक 27 जुलै रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नामदेव समाज शिंपी परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर यांनी केले असून या कार्यक्रमास केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या संजीवन सोहळ्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील शिंपी समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी केले आहे
27 रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम
