साताऱ्यात विरोधी आंदोलकासाठी पोलिसांचा माणुसकीचा मिलाप

Spread the love

….
(अजित जगताप)
सातारा दि: कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समाजावर अधिक असते. परंतु, त्याचा नेमका ठपका हा पोलीस यंत्रणेवर ठेवला जातो. तरीही साताऱ्यात जबाबदारी व कर्तव्याचे भान ठेवणाऱ्या पोलिसांच्या माणुसकीच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक २४ मार्च २०२५ रोजी आंदोलक अनिल बाबुराव काजारी यांच्यावर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करून त्यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस व एक अधिकारी सातारा जिल्हाधिकारी कार्यासमोरून उपोषण स्थळी आले होते. त्यांनी अनिल काजारी यांचे खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतरही त्यांच्यावरील गुन्हा मागे न घेता त्यांच्या विरोधात अब्रूंचा दावा दाखल करणारी नोटीस पाठवली. तसेच सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आंदोलक अनिल काजारी यांनी पुन्हा एकदा २५ एप्रिल पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
भर उन्हामध्ये तापमान वाढले असताना न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अनिल काजारी यांना सावली देण्यासाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस एस. के. थोरात यांनी जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून माणुसकी दाखवली.
आंदोलकांच्यावर अनेकदा अपमान व लाठीमार झाल्याचे पाहिलेले आहे. पण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एक मानवतावादी पोलीस हाती छत्री घेऊन उभा असल्याचे पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. शेवटी माणुसकी श्रेष्ठ ठरले आहे.
सातारा पोलीस सुद्धा एक माणूस आहे आणि त्याच्याकडे माणुसकी असते. हे पाहून खऱ्या अर्थाने आपण खारट झालेल्या समुद्रात गोड पाणी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अजित निकम, अमर गायकवाड यांनी दिली. तसेच त्या पोलीस बांधवांचे मनापासून आभार मानले आहे.


फोटो— सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर माणुसकी दाखवताना पोलीस एस. के. थोरात (छाया— अजित जगताप सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!