▪️ शनिवार दि. २५पासून अखंड हरिनाम सप्ताह तर मंगळवार दि. १ फेब्रुवारी रोजी रथोत्सव
वडूज. प्रतिनिधी -विनोद लोहार दि. ४ वडूज येथे सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदीर परिसरात समस्त ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने शनिवार दि. २५ जानेवारी ते शनिवार दि. १ फेबुवारी पर्यत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ व्या वर्षातील या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५ ते ६ .३० यावेळेत काकड आरती, सकाळी ८.१५ ते १२.३० यावेळेत ज्ञानेश्वरी सामुदायीक वाचन, दुपारी १ ते २ यावेळेत शहरातील भजनी मंडळांची भजने, सायंकाळी ४. १५ ते ५.३० यावेळेत हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत प्रवचन, रात्री ९ ते ११ यावेळेत किर्तन, रात्री १२ते ४ या यावेळेत जागर होईल.
ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ ह. भ. प. शाम महाराज आळंदीकर हे सांभाळणार आहेत. पारायणाची सांगता शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती दिवशी होणार असून त्यानिमित्त सकाळी ७ ते ९ यावेळेत श्री ज्ञानेश्वरी सांगता होणार आहे. सकाळी ९.३० ते ११ यावेळेत काल्याचे किर्तन व दहीहंडी श्री. ह.भ प. विजय महाराज शिंदे, लोणीकर , सकाळी ११ ते १२.३० यावेळेत श्री गणेश जन्माचे किर्तन (ह.भ.प. विलास गरवारे ) सिध्देश्वर कुरोली यांचे त्यानंतर दुपारी रथातून श्रीं ची व ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा होणार आहे. दुपारी २ नंतर कै. पोपटराव दतात्रेय गाडवे व कै . जयश्री पोपटराव गाडवे यांच्या स्मरणार्थ श्री . किरण पोपटराव गाडवे , श्री उमेश पोपटराव गाडवे , श्री . रविंद्र पोपटराव गाडवे व गाडवे परिवार यांचे तर्फे सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवार दि. २५ रोजी ह.भ.प. सौ इंद्रायणी जवळ मस्के, पंढरपूर यांचे प्रवचन सौजन्य कै. किसन शंकर शेटे यांचे स्मरणार्थ प्रशांत किसनराव शेटे यांचे तर्फे तर किर्तन ह.भ.प श्री. अशोक महाराज शिंदे गुरसाळे ( नातेपुते ) , सौजन्य कै. व्ही.जे. गोडसे ( सर ) व कै. रुक्मीणी विठ्ठल गोडसे ( आक्का ) यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल गोडसे ( भैय्या ) यांचे तर्फे तर जागर श्री. ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ बोंबाळे . रविवार दि. २६ रोजी ह.भ.प . डॉ. प्रा. श्री उदय रामचंद्र जाधव , फलटण यांचे प्रवचन सौजन्य कै. सुरेश सदाशिव राऊत यांचे स्मरणार्थ श्री. मनोज सुरेश राऊत व श्री. संतोष सुरेश राऊत यांचे तर्फे तर ह.भ. प. सौ. भारतीताई दिवाणे धाराशिव यांचे किर्तन सौजन्य कै. रामचंद्र विष्णु गोडसे व कै. सुमन रामचंद्र गोडसे यांचे स्मरणार्थ श्री. पोपट विष्णू गोडसे व श्री. विलास रामचंद्र गोडसे यांचे तर्फे तर श्री हनुमान भजनी मंडळ पेडगाव यांचा जागर होईल. सोमवार दि. २७ रोजी ह.भ.प. सौ. दिपाली किरण लोखंडे’ , पुसेसावळी यांचे प्रवचन सौजन्य कै. संपतराव सावळाराम काळे ( पाटील ) यांचे स्मरणार्थ श्री. धनंजय संपतराव काळे ( पाटील ) यांचे तर्फे तर ह.भ.प. श्री . सागर महाराज पवार , माहुली यांचे किर्तन सौजन्य कै. अनुसया नाना पवार यांचे स्मरणार्थ श्री. राजेंद्र पवार सर व श्री. धनजंय पवार यांचे तर्फे , तर श्री वाकेश्वर भजनी मंडळाचा जागर होईल. मंगळवार दि. २८ रोजी ह.भ. प. सौं . डॉ. सुप्रिया सांळुखे – कदम आटपाडी यांचे प्रवचन सौजन्य कै. शिवराम रामचंद्र माळी यांचे स्मरणार्थ महादेव व किरण शिवराम माळी यांचे तर्फे तर ह.भ.प . श्री. शामसुंदर महाराज ढवळे , दौंड यांचे किर्तन सौजन्य श्री . रामचंद्र पंढरीनाथ कुंभार , श्री . मनोज रामचंद्र कुंभार उपनगराध्यक्ष – नगरपंचायत वडूज यांचे तर्फे ,श्रीदत्त कृपा भजनी मंडळ नागाचे कुमठे यांचा जागर होईल. बुधवार दि . २९ रोजी ह.भ. प. श्रीधर सांळुखे , सातारा यांचे प्रवचन सौजन्य कै. अशोक ज्ञानेश्वर माळी यांचे स्मरणार्थ श्री . सावता व सचिन अशोक माळी यांचे तर्फे तर किर्तन ह.भ. प. श्री . धर्मराज महाराज हांडे , पुणे सौजन्य श्री. संतोष जयसिंग वडूज ( पोष्टमन ) यांचे तर्फे तर श्री. दत भजनी मंडळ वडूज यांचा जागर होईल. गुरुवार दि. ३० रोजी ह.भ. प. समाज भूषण श्री . पांडूरंग लोहार सर , कलेढोण यांचे प्रवचन सौजन्य श्री. मोहन सुदाम गोडसे ( माऊली अॅटो गॅरेज ) यांचे तर्फे तर ह.भ. प. श्री . अमोल महाराज सुळ ( नातेपुते ) यांचे किर्तन, सौजन्य श्री . अनिल पंढरीनाथ गोडसे मा. सरपंच ( चे. श्रीराम संस्था वडूज ) , प्रताप मानसिंग गोडसे चेऊरून ख. वि.स , संचालक वि.का. सेवा सोसायटी यांचे तर्फे तर श्री माऊली भजनी मंडळ, वडूज यांचा जागर होईल. शुक्रवार दि. ३१ रोजी ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम (फलटण ) यांचे प्रवचन सौजन्य कै. तुकाराम नामदेव माळी यांचे स्मरणार्थ श्री. सचिन तुकाराम माळी व श्री . नितीन तुकाराम माळी यांचे तर्फे तर ह.भ.प मोहन काका घोटीकर रा . घोटी यांचे किर्तन सौजन्य कै. किशोर शंकर तोडक यांचे स्मरणार्थ श्री. कुंदन व केदार किशोर तोडकर यांचे तर्फे तर श्री हनुमान भजनी मंडळ नायकाचीवाडी यांचा जागर होईल. तसेच मृदंगाचार्य ह.भ.प. संगम महाराज , पवारवाडी व ह.भ.प. केदार महाराज , माजगावकर , गायनाचार्य ह.भ.प. प्रथमेश गुजर , सांगोला व ह.भ.प. निखील डांगे विहापूर , विणेकरी ह.भ.प. धोंडीराम चव्हाण , शेनवडी ,ह.भ.प. नाना मारुती बुधावले , आटपाडी , ह.भ.प. लक्ष्मण कोंडीबा बुधावले आटपाडी व ह.भ.प. सोमनाथ महाराज , सातेवाडी तसेच चोपदार ह.भ.प. सोपान विठ्ठल जाधव नढवळकर तसेच काकड आरती , हरिपाठ , किर्तन साथ – ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था , विहापूर ता. कडेगाव यांची साथ राहील .सोहळ्यासाठी मंडप व लाईट व्यवस्था किरण मंडपचे बाळासाहेब गोडसे यांचे वतीने करण्यात आली आहे
शनिवार दि. १ फेब्रवारी रोजी श्रीगणेश जयंती सोहळ्यानिमित्त सकाळी ७ ते ९ श्री ज्ञानेश्वरी सांगता, काल्याचे किर्तन व दहिहंडी सकाळी ९.३० ते ११ तर ११ ते १२.३० च्या दरम्यान श्रीगणेश जन्माचे किर्तन होईल नंतर दुपारी श्री व ज्ञानेश्वरांची रथातून भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा पार पडणार आहे. दुपारी दोन नंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे .तरी वडूज पंचक्रोशील व तालुक्यातील भावीकांनी व गणेशभक्तांनी या मिरवणूक व दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन वडूज ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळांनी केले आहे.

फोटो…
श्रीसिद्धीविनायक
…