Advertisement

अभंग संस्कृति उपासक संत कशिबा महाराज पुण्यतिथी संपन्न.

लोणंद वार्ताहर .

गुरव समाज महासंघाचे आयोजन राज्यांतील श्री संत सावतामाळी संतांच्या अभंगवाणी आपल्या लेखन साहित्यानं शब्दबद्ध करणारे साहित्यिक संत काशिबा महाराज यांच्या पुण्यतिथी मंदिरा संस्कृति उपासाक गुरव समाजाच्या वतीन नुकतीच साजरी करण्यात आली यात राज्यांतील विवीध जिल्हयातील गुरव बंधू भगिनी सहभाग दर्शविला. पुरंदर खंडाळा सीमेलगत असलेल्या सूखेड येथे अभंग कीर्तन आणि पुष्प वृष्टी कऱण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते मिलिंद पाटिल, परिवहन अधिकारी ज्योती गुरव, सार्वजनिक फेडरेशन देवस्थान अध्यक्ष विजय कुमार पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरव समाज प्रतापराव गुरव. गोरीहर गुरवउपस्थित होते.,तर कार्यक्रमत समाजातील सामाजिक सांस्कृतीक धार्मिक पत्रकारिता,उद्योजक शैक्षणिक अशा विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले यात ख्यातनाम ज्योतिषतज्ञ प्रवीण राजगुरू, राष्ट्रीय गुरव समाज अध्यक्षा अनुपमा गुरव, पत्रकार दिग्दर्शक विजयकुमार हरिश्चंद्रे, नितीन शिर्के, प्रसिध्द महिला शंख आणि तुतारी वादक कविता गुरव,मोहन भांडलवकर इत्यादिंचा समावेश होतो गुरव समाजातील नामवंत कीर्तनकरानीही सहभाग दर्शविला श्री संत काशीबा महाराजांचे संत साहित्य कार्य परिक्रमा सर्व समाजाच्या पर्यंत पोहचवणे करीता काशिबा महाराज जीवनचरित्र अभ्यासिका सूरू करण्याचा मानस यावेळी आयोजक राजेन्द्र भांडवलकर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमा करीता सातारा जिल्हा आणि फलटण खंडाळा गुरव समाज कार्यकर्त्यांनी विषेश परिश्रम घेतले.

म्हसवड प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी महेश कांबळे, उपाध्यक्षपदी सचिन सरतापे

म्हसवड दि. ७
म्हसवड प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदी महेश कांबळे यांची तर उपाध्यक्ष पदी सचिन सरतापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या अध्यक्षतेखाली व माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत म्हसवड प्रेस क्लब ची कार्यकारिणी निवड करण्यात आली यामध्ये प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदी महेश कांबळे यांची, उपाध्यक्ष पदी सचिन सरतापे यांची, खजिनदारपदी विजय टाकणे यांची तर प्रेस क्लब च्या सचिवपदी सचिन शिंगाडे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार एल.के. सरतापे, नागनाथ डोंबे, शंकर पानसांडे, धनंजय पानसांडे, शहाजी लोखंडे, आण्णासाहेब कोळी आदी पत्रकार उपस्थित होते. सर्व नुतन पदाधिकार्यांचे जेष्ठ पत्रकार सलीम पटेल, दिलीप किर्तने, विजय भागवत, अजित काटकर, पोपट बनसोडे, सचिन मंगरुळे, अहमद मुल्ला, सुशील त्रिगुणे आदींनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!