औंध : दि. 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिन शिवगर्जना प्रतिष्ठान औंध संचलित प्राथमिक माध्यमिक आणि आणि स्वर्गीय संभाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालया मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी ध्वजपुजन मा.श्री.डॉ.विलास साळुंखे आणि ध्वजारोहण मा.मेजर दादासाहेब घार्गे यांच्या हस्ते करणेत आले . प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मा.श्री. रमेश चव्हाण साहेब (व्यवस्थापक ज्योती गॅस,एजन्सी) यांचे मार्फत पिठाची गिरण (14″)(3HP) शाळेस सप्रेम भेट देणेत आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ देशमुख (बापू), आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मा.जयसिंगराव घार्गे साहेब,मेजर शेवडे मा.अमर देशमुख (उद्योजक),मा.सह्याद्री देशमुख, मा.वसंत पवार (ग्रा.सदस्य),मा. संदीप इंगळे (काका),मा.दत्ता फडतरे, मा.नामदेव भोसले, मेजर संभाजी कुंभार, मा. साहेबराव देशमुख ,मा.महेश गोसावी,मा.अवधूत पछाडे,मा.केशव इंगळे, मा.बाजीराव आमले सर्व संचालक मंडळ, आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
पंढरपूर दि.28:- दि. 02 ते 12 फेब्रुवारी दरम्यान माघ वारी संपन्न होत असून, दि.8 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य विषय आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माघ शुध्द 5 म्हणजे दि.2 फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये वेळ वाढविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
माघवारी पुर्व नियोजनाबाबत आज श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली . बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्व खात्याचे सहायक संचालक डॉ.विलास वाहणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन व संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच मंदिर समितीचे विविध खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन करण्यात येणार असून, भाविकांना पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप याठिकाणी मुबलक सोयी -सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच जलद व सुकर दर्शन व्हावे यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि.2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी व नियोजन तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर स्थानिकांसाठी स.6.00 ते 7.00 व रा.10.00 ते 10.30 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून दर्शन व्यवस्था करणे, मंदिरातील सर्व लाकडी दरवाज्यांना मंदिर निधीतून किंवा देणगीदार भाविकांमार्फत चांदी लावणे, पालखी महामार्गावर कमान बसविणे, दर्शनरांगेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या वारसांना 1 लक्ष रूपयांची मदत, वयोवृध्द, विकलांग, गरोदर महिला इत्यादी भाविकांना सभामंडपातून प्राधान्याने दर्शन व्यवस्था इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
माजी आमदार, कविवर्य धोंडीराम वाघमारे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त काल,मंगळवार २८ जानेवारी रोजी संध्याकाळी वडजल तालुका माण येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. माण तालुक्याच्या इतिहासातील हे पहिले वहिले कवि संमेलन अत्यंत मनमोहक वातावरणात पार पडले. या कवी संमेलनास ज्येष्ठ कवि श्री. विठ्ठल वाघ (अकोला),कवी व संपादक श्री. विजय चोरमारे (कोल्हापूर), डॉ. सुरेश शिंदे (करमाळा), श्रीमती.संजीवनी तडेगावकर(जालना),श्रीमती लता ऐवळे (सांगली),भरत दौंडकर (पुणे),श्री.रमजान मुल्ला (नागठाणे), श्री.इंद्रजित घुले (मंगळवेढा) श्री. हनुमंत चांदुगडे (सुपे) अशा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून हि सर्व कवी मंडळी आली होती. तसेच माण तालुक्यातील धोंडीराम दादांवर प्रेम करणारे शेकडो लोकं माण व फलटण परिसरातून उपस्थित होते. ज्येष्ठ कवि श्री.विठ्ठल वाघ यांनी धोंडीराम वाघमारे यांच्या हुंदका या काव्यसंग्रहातील खेड्यातला भारत दिल्लीला कसा कळणार, कळला असता तर आला आता आकार’ या कवितेचे विश्लेषण केले व धोंडीराम वाघमारे यांच्या कर्तुत्वाला उजाळा दिला. मंत्रिपद नको पण माझ्या दुष्काळी माण तालुक्याला पाणी द्या म्हणणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार होऊन गेला आणि तो म्हणजे धोंडीराम वाघमारे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय धोंडीराम वाघमारे यांनी केले व आभार श्री. राजेंद्र शेलार यांनी मानले,सुत्रसंचालन डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. सर्व प्रिंट मीडिया,डिजिटल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच विशेषतः वडजल गावातील समस्त ग्रामस्थ बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे या साठी बालबाजार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता .संस्थेच्या संचालिका व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सौ सविता वसंत मासाळ मॅडम व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या हस्ते बालबाजार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्या सौ राजश्री नितीन दोशी(भाभी )उपस्थित होत्या.सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी बाजारामध्ये पालेभाज्या ,फळभाज्या तसेच खाऊ पदार्थ व इतर पदार्थ विक्रीस घेवून आले होते .याचा लाभ सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला. गावातील गावकरी ,महीला ,विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी चे विद्यार्थी,शिक्षक आवर्जुन उपस्थित होते. बालबाजार बरोबरच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता,यादरम्यान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच शिक्षिका यांच्यासमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला . शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यावहारांतून विकास होऊ शकतो ते ज्ञान बालबाजारतुन मिळते, संस्थेने चांगला उपक्रम राबविला असे प्रतिपादन म्हसवड चे माजी नगराध्यक्ष व अहिंसा नागरी सह पतसंस्था मर्यादित म्हसवड चे चेअरमन श्री.नितीन दोशी (भाऊ)म्हणाले ,उपस्थित सर्वांचे स्वागत संस्था प्रमुख डॉ.वसंत मासाळ व व्यवस्थापकीय संचालक श्री रावसाहेब मासाळ यांनी केले. बालबाजार लहान मुला मुलींनी गजबजून गेला . संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाल बाजार पार पाडण्यास प्रयत्न केले. सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.