Advertisement

घिगेवाडीत गिरवले विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे. जिल्हा परिषद शाळेच्या स्तुत्य उपक्रमामुळे कौतुकांचा वर्षाव.

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

घिगेवाडी ता. कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने मुलांच्या व्यवहार ज्ञानात व बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी शाळेच्या पटांगणात भरवला चिमुकल्यांचा बाल बाजार.
अश्या या आगळ्यावेगळ्या चिमुकल्यांच्या बाल बाजाराचे उद्घाटन शालेय कमिटी अध्यक्ष रोहित सावंत यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला “फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नव्हे तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे. या चिमुकल्यांच्या बाल बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या,चायनीज भेळ, ईडली,मंचुरियन,विविध प्रकारच्या डाळी,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ,खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस,भेल सेंटर,वडापाव,पाणीपुरी,भजी-चहा,अशा दुकानांचा यात समावेश होता. बाल बाजारात ग्रामस्थ, पालक महिला बचत गटाच्या सदस्य यांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची तसेच पालेभाज्यांची खरेदी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यामुळे पालक वर्गातून हे समाधान व्यक्त होत होते.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व बुद्धिस चालना मिळते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते. अशा प्रतिक्रिया खरेदीस आलेल्या पालक वर्गातून येत होत्या. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी घिगेवाडीचे आदर्श सरपंच नारायण सावंत, शिक्षिका सारिका ननावरे,सुधीर सावंत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन,आदिनाथ सावंत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने भरवलेल्या बाल बाजाराबाबत मनोगतं व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक संजय काळे सरांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाचे सदस्य, शालेय कमिटी सदस्य, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळ :- घिगेवाडी ता. कोरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भरवलेल्या बालबाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला व ग्रामस्थांची गर्दी.

रोटरी क्लब लोणंद व बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चांदवडकर ऑप्टिशियन येथे शिबिर संपन्न

लोणंद दिलीप वाघमारे यांच्या कडून.

रोटरी क्लब लोणंद व बुद्रानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर सकाळी 10 ते 2या वेळेत चांदवडकर वाच ऑप्टिशियन शास्त्री चौक लोणंद येथे आयोजित करण्यात येते. यामध्ये बिन टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लासरु शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या मागील पडद्याची (रेटिना), काचबिंदू तपासणी व उपचार, अत्याधुनिक मशीनद्वारे सर्व डोळ्यांच्या तपासण्या केल्या जातात. रोटरी क्लब लोणंद च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त गरजूंना मोफत चष्मे वाटप, औषधे वाटप करण्यात येते, आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. या वेळचे शिबिर डायबिटीस व ब्लड प्रेशर चे पेशंटसाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञान युक्त फंडस कॅमेराने मोफत डायबिटीस रेटिनोपॅथी व काचबिंदू तपासणी असे आयोजित केले होते, 90 रुग्णांनी याचा फायदा घेतला. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांदवडकर वाच ऑप्टिशियन, शास्त्री चौक लोणंद येथे असे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा अवश्य फायदा घ्यावा असे आव्हान अध्यक्ष रो. प्रवीण चांदवडकर व प्रोजेक्ट चेअरमन रो. डॉक्टर किशोर बुटीयांनी यांनी केले. नेत्रचिकित्सक प्रवीण चांदवडकर व व नेत्र चिकित्सक गायत्री चांदवडकर डॉ. गिरीश पाटील व बुधरानी हॉस्पिटल ची टीम यांनी सर्व रुग्णांची अत्याधुनिक मशीनच्या साह्याने डोळे तपासणी केली.

जेवायला वाढले नाही म्हणून मुलाने केला आईचा खून

.

दहीवडी पोलिसांनी आरोपीला एक तासात केले जेरबंद.

दहिवडी प्रतिनिधी,ता.११:
पिंगळी बु.(ता.माण )
येथील ३४ वर्षीय युवकाने शुक्रवार दि.१० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा हंडा आईच्या डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली.
दारूच घेते आई वडिलांचा व मुलाचा जीव या घटनेप्रमाणे. दारूच्या नशेच्या आहारी गेलेला विशाल आनंदराव जाधव (वय ३४) हा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यावेळी आई (संगीता आनंदराव जाधव. वय ६० वर्ष )या झोपल्या होत्या. तो आईला म्हणाला मला जेवायला वाढ त्यावर आई म्हणाली की तू रोज दारू पिऊन येतोय मी तुला जेवायला वाढणार नाही. हाताने घेऊन खा असे म्हटल्यामुळे त्याला एवढा राग आला की त्याने दारूच्या नशेत जवळच असलेला पाण्याचा हंडा उचलला व चार ते पाच वेळा आईच्या डोक्यामध्ये जोरदार मारला. त्यामुळे आईच्या डोक्यामध्ये जोरदार वार झाले आणि रक्तप्रवाह वाहू लागला. नंतर नातेवाईकांनी संगीता यांना दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलविले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले. सातारा येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्यानंन्तर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.व दहिवडी शोककळा पसरली.
दहिवडी पोलिसांनी घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित घटनेची सखोल चौकशी करून. जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या नराधमास लपून बसलेला असताना देखील एक तासांमध्ये त्याला जेरबंद केले.

फोटो…
दहिवडी :अटकेत असलेला आरोपी विशाल जाधव(वय३४वर्ष )समवेत सपोनि. अक्षय सोनवणे व पोलीस कर्मचारी

मेरी माता इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी मनोज कुंभार याला नेमबाजी स्पर्धेत मनोज रौप्य पदक

म्हसवड (वार्ताहर )

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या 68 व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा दिनांक 2 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन मध्य प्रदेश सरकारचे शालेय शिक्षण मंत्री उदय प्रताप सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले आनंदाची वार्ता म्हणजे या स्पर्धेमध्ये मेरी माता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथील इयत्ता 8 वी मधील आर्यन मनोजकुमार कुंभार याने ओपन साईट रायफल प्रकारात 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक मिळवले. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत आर्यनने सुवर्णपदक पटकावले होते त्याचे मिळवलेले हे यश उत्तुंग असे असून त्याने म्हसवड परिसरासह सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवले त्याचे या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू सर्व पत्रकार मित्र व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.

ऐतिहासिक शाहू नगरीत लोधवडे प्राथ.शाळेची जिल्ह्यात दणकेबाज कामगिरी


निबंध स्पर्धेत दृष्टी मोरेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


गोंदवले – ऐतिहासिक छत्रपती शाहू नगरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या तसेच ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा जिथे श्रीगणेश झाला होता अशी ती पवित्र ऐतिहासिक साताराच्या राजवाड्यातील प्रतापसिंह हायस्कूलची वास्तू या ठिकाणी सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाकरिता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हा स्तरीय निबंध बाल व्यक्तिमत्त्व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.यामध्ये मोठया गटातील निबंध स्पर्धेत सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कुमारी दृष्टी सुनिल मोरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून माणदेशात एक उच्चांकी असा शैक्षणिक इतिहास निर्माण केला.तिचे प्रतापसिंह हायस्कूल मध्ये पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते जल्लोषी अभिनंदन करण्यात आले.
अभिनंदन करणाऱ्यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर मॅडम,माणचे गटविकासाधिकारी मा. प्रदीप शेंडगे,सहाय्यक गटविकासाधिकारी मा.चंद्रकांत खाडे, गटशिक्षणाधिकारी मा.लक्ष्मण पिसे,जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तारधिकारी मा.मुळे मॅडम,शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे केंद्रप्रमुख शोभा पवार आदि मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले,तर तिच्या राजवाड्यातील मुख्य सत्कार समयी जिल्हा विस्ताराधिकारी मा.सस्ते, मा.कोर्डे ,निबंध परीक्षक शिक्षक आणि मॅडम,दृष्टी मोरेची निबंध स्पर्धेतील विशेष अशी खास तयार करून घेणारे तिचे मार्गदर्शक प्राथ.शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे,संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांनाचे आलेले मार्गदर्शक शिक्षक व काही पालक वर्ग यांच्या उपस्थितीत तिच्या अभिनंदनचा हा सत्कार सोहळा प्रतापसिंह हायस्कूल मध्ये नुकताच पार पडला.
याशिवाय तिचे अन्य अभिनंदन करणाऱ्या मान्यवरात लोधवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.कुंडलिक चोपडे,उपाध्यक्ष मा.सर्जेराव कांबळे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,लोधवडे शाळेचे मुख्याध्यापक मा.महादेव ननावरे ,सहकारी शिक्षक दिपक कदम,सुचिता माळवे,संध्या पोळ, दिपाली गोरे-फरांदे ,मनीषा घरडे,अश्विनी मगर व तिचे पालक आणि सध्याला लोधवडे ग्रामस्थांनाच्या मधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हा सुरूच आहे.


छाया – दृष्टी मोरे निबंध स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार करताना शिक्षण विभाग जि.प.सातारचे मान्यवर, मार्गदर्शक शिक्षक सतेशकुमार माळवे (विजय ढालपे)

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण ” आटपाडी ” व्हावे . – सादिक खाटीक

शरदचंद्रजी पवार, राम नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांना साकडे


आटपाडी दि . ११ ( प्रतिनिधी )
लवकरच होवू घातलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण ” आटपाडी ” व्हावे, या न्याय लक्षवेधी मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना तातडीने सुचित केले जावे, यासाठीचे साकडे आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी अनेक मान्यवर महोदयांना घातले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आटपाडीचे सुपुत्र उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक साहेब, राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, आटपाडीचे आणखी एक सुपुत्र राजीव खांडेकर यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार महोदय, महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा, राज्यसभेवरील सर्व खासदार महोदय , विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय आणि
सर्व दैनिकांचे संपादक / प्रतिनिधी महोदय, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयातील न्युज चॅनेल्सचे संपादक / प्रतिनिधी महोदय या सर्वांना ईमेलद्वारे साकडे घातले आहे .
महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यात आणखी नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारीत झाले आहे आणि या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा समावेश करून नवीन माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे या वृत्तात म्हटले गेले आहे . नवीन २१ जिल्ह्यां बरोबरच माणदेश जिल्हा होत असल्याचा आम्हां माणदेशींना मोठा आनंद होतो आहे . या माणदेश जिल्हा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर, शतकापासून उपेक्षित, वंचित, मागास ठेवल्या गेलेल्या आटपाडी तालुक्यातले “आटपाडी शहर ” , माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण म्हणून घोषीत झाले पाहिजे . अशी माझ्या सारख्या असंख्य माणदेशींची अंतरीची न्याय मागणी आहे .
दुष्काळी तालुक्यांचा आटपाडी जिल्हा व्हावा . ही मागणी प्रथमतः आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांनी १९७० च्या दशकात एका पाणी परिषदेच्या वेळी केली होती . माणदेशातील अनेक व्यासपीठावरून माणदेश जिल्ह्याच्या मागणीचा वेळोवेळी आवाज उठत आला आहे . १९८९ ते ९३ साला दरम्यान झालेल्या माणदेश ज्ञानपीठच्या दहिवडी, सांगोला येथील साहित्य संमेलनातही या मागणीला पुढे रेटण्यात आले होते . दहिवडीच्या साहित्य संमेलनात, मी ( सादिक खाटीक ) , सुभाष कवडे सर, प्राचार्य सयाजीराजे मोकाशी यांनी, माणदेश जिल्हाची ही मागणी जोरात लावून धरली होती . माझ्या पत्रकारीतेच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात, माणदेश जिल्हा व्हावा, माणदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी असावे, यावर मी सातत्याने लिखाण केले आहे . विविध व्यासपीठ, बैठका, मिटींगामध्ये, माणदेश जिल्हा व्हावा आणि या जिल्ह्याचे ठिकाण आटपाडीच असावे, यावर ठाम मत मी मांडले आहे. याचेही शेकडो जण साक्षीदार आहेत .
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा आणि सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा माणदेशात समावेश होतो . या माणदेशी आठ तालुक्यात सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून आटपाडी शहरच ठरू शकते. यासंदर्भाने भाष्य करताना सादिक खाटीक यांनी अनेक मुद्यांचा परामर्श घेतला आहे .
माणदेशातल्या या आठ तालुक्यातल्या आटपाडी तालुक्याला मोठा ऐतिहासीक, साहित्यीक, सांस्कृतीक वारसा लाभला आहे . आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असणारे , महाकवी ग . दि. माडगूळकर, व्यंकटेशतात्या माडगूळकर, शंकरराव खरात, ना . सं . इनामदार, औंध अधिपती बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी, हे पाच मान्यवर साहित्यीक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते . आटपाडी मुख्य महाल असलेल्या आणि आटपाडी तालुका सर्वार्थाने पुढे यावा, यासाठी सदैव आस्था बाळगणाऱ्या, औंध संस्थानचे राजपूत्र बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधींनी भारताचे राजदूत म्हणून मोठी देशसेवा बजावली आहे . आटपाडीच्या म . गो . तथा बाबा पाठक यांनी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून मोठे नाव कमावले आहे . तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार मिळविणाऱ्या सत्यभामाबाई पंढरपूरकर या मुळच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरीच्या . मुंबईतून अनेक वेळा आमदार, खासदार, नामदार झालेले श्री . राम नाईक साहेब हे ही आटपाडीचेच . भारतीय राजकारणात देश स्तरावर चमकलेले आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे प्रा . अरुण कांबळे, त्यांच्या साहित्यीक मातोश्री शांताबाई कांबळे, जत विधानसभा मतदार संघातून दोन वेळा जिंकणारे ॲड . जयंत सोहनी साहेब हे ही आटपाडी तालुक्यातील गोमेवाडीचे . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जतेतून विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीचे . विधान परिषदेत १२ वर्षे आमदार राहीलेले पुणे स्थित, ग . दि . माडगुळकर आण्णा मुळचे आटपाडी लगतच्या माडगुळ्याचे . राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावर नावाजलेले मराठी भाषेच्या एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर साहेब हे ही आटपाडीचेच . सातासमुद्रापार नावलौकीक संपादन केलेल्या, सुवर्ण, रौप्य, कास्य पदके मिळविणाऱ्या अनेक गुणवंत, प्रज्ञावंत, किर्तीवंतांची जन्मभूमी, कर्मभूमी, कुळभुमी आटपाडी तालुका आहे. अर्जून पुरस्कार विजेते करगणीचे सचिन सर्जेराव खिलारी, सुवर्ण, रौप्य पदके मिळविणारे तळेवाडीचे संकेत सरगर, काजल सरगर बंधु – भगिनी, अनेक जिल्ह्यातल्या पैलवानांना आटपाडीच्या तालमीतून तयार करणारे, शिवछत्रपती कीडा पुरस्कार प्राप्त वस्ताद पै . नामदेव बडरे, आपल्या ज्ञानदानाने माणदेशातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात गुणवत्तेचा झेंडा फडकावणाऱ्या लोणारी समाज संस्थेचे, आटपाडीतील गुरुकुल माणदेशाचे वैभव ठरू लागले आहे . हे वास्तव भारतातील व भारताबाहेरील करोडो लोकांना माहीत आहे.
दर तीन वर्षांनी प्रचंड दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला गत शतकात मात्र मोठे दुर्देवच आले आहे . प्रचंड कर्तृत्वसंपन्न, व्यक्तीमत्वांची जननी असणाऱ्या आटपाडी तालुक्याची राजकीय, सामाजीक, शेतीच्या, पिण्याच्या, पाण्याच्या दृष्टीने मोठी होरपळ झाल्याचे, कोणताही माणदेशी आणि आटपाडी लगतचे तीनही जिल्ह्यातील लोक नाकारणार नाहीत .
दीड शतकापासून आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी येथे असणाऱ्या ३ टी . एम . सी . क्षमतेच्या तलावाचे नाव मात्र शेजारच्या सातारा जिल्हाच्या माण तालुक्यातल्या म्हसवडचे. आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतल्या या तलावाचे नाव आजही शासन स्तरावर ” म्हसवड तलाव “ असेच आहे. या तलावाचा कारभार पाहणारे मुख्यालय राजेवाडीपासून १०० कि . मी . अंतरावरील फलटणला. आणि या तलावाचे बहुतांश पाणी जाते, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, पंढरपूर तालुक्याला. सद्य स्थितीत, या दोन्ही तालुक्यांना सर्व बाजूंनी विविध पाणी योजनातून पाणी मिळत असतानाही राजेवाडीच्या बहुतांश पाण्यापासून आटपाडी तालुक्यावाशीय वंचितच राहीले आहेत .
झुक झुक आगीनगाडीच्या अजरामर गीतातून शतकापासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या ग . दि . माडगुळकर आण्णांच्या आटपाडी तालुक्याला खऱ्या अर्थाने रेल्वे आणि विमान सेवेची नितांत आवश्यकता आहे . भारताबाहेर अनेक देशात आणि भारतातल्या प्रत्येक शहरात कार्यरत असणाऱ्या हजारो गलाई बांधवाना आटपाडी – खानापूर तालुक्यात सर्वत्र जलद ये – जा करण्यासाठी रेल्वे आणि विमान वाहतुकीची सेवा अति आवश्यक आहे . भारतात सर्वात प्रभावी ठरणाऱ्या पशुधनामध्ये खिलार जनावरांचे निर्मितीस्थान असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील व माणदेशातील खिलार जनावरांची, देशातील शेती आणि दुध – दुभत्यासाठी मोठी मागणी आहे व सर्वत्र नितांत गरज आहे . इतकेच नव्हे तर आटपाडी तालुका व लगतच्या तालुक्यातील शेळ्या – मेंढ्या वर्गातील या लहान जनावरांच्या दुध, मांस, कातड्याची जगभरात मोठी मागणी आहे . आटपाडीत शनिवारी भरणारा शेळ्या, मेंढ्या, बोकडे, बकरे, पाटी, लाव्हरांचा बाजार, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो आहे . राजस्थानच्या जैसेलमेर इतकी उष्णतेची घनता असणाऱ्या आटपाडी तालुक्यात सौर उर्जा प्रकल्पाला प्रचंड वाव आहे . तालुक्यातल्या असंख्य डोंगरांवर पवन उर्जेच्या पवन चक्क्या उभारणीस पोषक स्थिती आहे . हजारो एकरात बांबु लागवड, बाबुं उद्योगावर आधारीत कारखानदारी, डाळींब, द्राक्ष, व इतर फळ फळांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी येथे उत्तमरित्या चालु शकते. देशात सर्वोत्तम ठरेल अशा शेळ्या – मेंढ्या या लहान जनावरांचे मांस परदेशी निर्यात करणारी व्यवस्था सुद्धा आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उभारता येवू शकते . अशीच येथील सर्वकष स्थिती आहे . कापसाचे प्रचंड आगर असणाऱ्या आटपाडी तालुक्यासह, माणदेशात सुत, कापड, निर्मिती व्यवसायाला मोठी संधी आहे . याशिवाय हजारो एकरात साकारू शकणारी बेंगलोर कॉरीडोर सारखी हजारो कोटी रुपये गुंतवणूकीची मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात आटपाडी शहरालगत तसेच तालुक्यात अन्यत्र मोठी पोषक स्थिती आहे.
जगविख्यात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेली आणि १९३७ साली आटपाडीत उभारली गेलेली कैद्यांची स्वतंत्रपूरातली खुली वसाहत ही भारतात नव्हे तर आशीया खंडातली , क्रुर , गुन्हेगार, सैतानाना, पुन्हा माणसात आणणारी, मानवतावादी भूमिका, कृतीतून साकारणारी पहिली वसाहत होती, आणि आजही तिची महती जगभर आहे .
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतीकारकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या आटपाडी तालुक्याने, सदैव माणदेशाच्या केंद्रस्थानी रहात माणदेशाची मोठी सेवा बजावली आहे . लगतच्या तिन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारी, आटपाडी येथील, आटपाडी एज्यूकेशन सोसायटी, ही मोठी शिक्षणसंस्था असो , अथवा दोन दशके, तिन्ही जिल्ह्यातल्या उसाचे गाळप करणारा आटपाडीचा माणगंगा साखर कारखाना असो, किंवा आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीचा श्री . सद्गुरू साखर कारखाना असो , अथवा माणदेशात अव्वल ठरलेली आटपाडीची कृषी उत्पन्न बाजार समिती असो , अथवा बाबासाहेब देशमुख दुध संघाचे अनेक युनिट असोत किंवा बाबासाहेब देशमुख बँकेच्या विविध शाखा असोत, या सारख्या आटपाडी तालुक्यातल्या अनेक संस्थांनी इतर माणदेशी तालुक्यांना नेहमीच मोठा आधार दिलेला आहे . श्री . सिध्दनाथांचे पवित्र स्थान म्हणून देशभर ख्यात असणारी खरसुंडी, श्रीराम उर्फ लखमेश्वर देवस्थानची करगणी, श्री . उत्तरेश्वरांची आटपाडी, श्री . शिरळोबाची दिघंची अशा अनेक यात्रांतून, लाखोंना आटपाडी तालुक्यात आणणारी ही पवित्र स्थाने आटपाडी या माणदेश जिल्ह्याच्या ठिकाणाला मोठी चालना देणारी ठरू शकतात . खिलार जनावरांच्या खरसुंडी, करगणी, आटपाडीत भरणाऱ्या प्रचंड मोठ्या चारही यात्राही आटपाडीची आणखी उंची वाढवणाऱ्या ठरताहेत. हे ही लक्षात घेतले गेले पाहीजे .
पाण्याच्या प्रचंड दुर्भिष्याने आटपाडी तालुक्यातून, मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरातील हमालीसाठी, कापड कामगार, सुतगिरणी कामगार म्हणून इचलकरंजी, बार्शी, मुंबई, सुरत, अहमदाबाद, सह देशाला जवळ करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील कुटुंबांचा आकडाही शेकडोंच्या घरात जावू शकतो. उसतोडी करण्याच्या आणि मेंढपाळीच्या निमित्ताने भटकंती करणारी आणि सधन भागात जावून तेथेच स्थिरावलेली शेकडो कुटुंबेही आटपाडी तालुक्यातील निघतील, आटपाडी तालुक्यातून देशभरात झालेले हे हजारो स्थलांतरीत आटपाडी तालुकावाशीय, ” आटपाडी “ हे माणदेश जिल्ह्याचे ठिकाण बनल्याने आणि जिल्हा ठिकाणच्या म्हणून होणाऱ्या नवनिर्मितीच्या प्रगतीने, पुन्हा आपल्या दारी अर्थात आटपाडी तालुक्यात परतणार आहेत . यात तीळमात्र शंका नाही .
क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकरांच्या माणदेशी दुष्काळी सर्व तालुक्यासह अन्य काही अशा एकूण १३ दुष्काळी तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याच्या लढ्याचे गत ३२ वर्षापासून आटपाडी शहर आणि तालुका हेच मुख्य केंद्र राहीले आहे . या चळवळीच्या २५ हून मोठ्या पाणी परिषदा आटपाडी येथेच संपन्न झाल्या आहेत . या चळवळीच्या, विविध पक्षाच्या, नामदार, आमदार, खासदार, अशा अनेक नेते मंडळीच्या रेट्यातून १९९६ पासून आज अखेर राज्यात सत्तेत असलेल्या वेगवेगळ्या यूती – आघाडी सरकारने टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यासाठी पाण्याची प्रचंड उपलब्धता करून दिली आहे. देशाला दिशा देणारा, समन्यायी पाणी पुरवठ्याचा बंदिस्त पाईप लाईनचा पथदर्शक प्रकल्प राज्यात, सर्वप्रथम आटपाडी तालुक्यातूनच राबविण्यात येत असून तो जवळ जवळ ८० टक्के मार्गी लागला आहे. ही बाब ही आटपाडी या माणदेश जिल्हाच्या ठिकाणाला अधोरेखित करणारी अशीच आहे. आटपाडी शहरातून २ आणि दिघंचीतून आणखी १ राजमार्ग असे ३ राजमार्ग आटपाडी तालुक्यातून गेलेले आहेत . आटपाडी शहराच्या पुर्व – पश्चिम दिशेने २५ – ३० कि .मी . अंतरावरून २ राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. या ३ राजमार्ग, २ राष्ट्रीय महामार्गाचा आटपाडी शहराला मोठा फायदा होणार असल्याने आटपाडी शहर हे माणदेश जिल्ह्याचे ठिकाण करणे अत्यंत न्यायाचे आणि संपूर्ण माणदेशाच्या सोयीचे ठरणार आहे .
संस्थानात दोन दोन मंत्रीपदे, आमदारकी भुषविणाऱ्या आटपाडी तालुक्यावर स्वातंत्र्यानंतर राजकीयदृष्ट्या मोठा अन्यायच झाला . आटपाडी तालुक्याच्या सरहद्दीवरील तिन्ही जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांना विधानसभा आमदार म्हणून अनेक वेळा संधी मिळाली . लोकसभा, राज्यसभेवर खासदार म्हणून यातल्या अनेक तालुक्यांना बहुमान मिळाला . इतर अनेक मोठ्या सत्तास्थानी हे तालुके विराजमान झाले . मात्र स्वातंत्र्यानंतर आटपाडी तालुक्याची मोठी राजकीय होरपळ केली गेली आहे . आटपाडी तालुक्याचा ज्या विधानसभा मतदार संघात समावेश होतो अशा विधानसभा मतदारसंघात झालेल्या आज अखेरच्या १६ निवडणूकात फक्त दोन वेळाच आटपाडी तालुकावाशीय आमदार झाले . लोकसभा, राज्यसभेची खासदारकी असो, राज्य, केंद्रातील नामदारकी असो अथवा अन्य सत्तास्थानातील नामदारकीच्या दर्जाची पदे असोत आटपाडी तालुक्याच्या वाट्याला विधान परिषदेची ३ वर्षाची आमदारकी, जि . प . चे सव्वा वर्षाचे अध्यक्षपद, या उपर फारसे काही हाती लागले नाही, हे प्रचंड राजकीय दुर्देव आहे . हे दुर्देव पुसून काढून, येत्या दशकभरात आटपाडी तालुक्याच्या पर्यायाने माणदेशाच्या सर्वांगीण, चौफेर आणि लक्षवेधी विकासाच्या दृष्टीने माणदेश जिल्ह्याचे मुख्यालय आटपाडी शहराला करणे, हेच आटपाडी तालुक्यावर आजवर झालेल्या प्रचंड राजकीय अन्यायावर योग्य न्याय देणारा क्रांतीकारी निर्णय ठरू शकेल . माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण ” आटपाडी शहर ” व्हावे . यासाठी साकडे घातलेल्या, सर्व मान्यवर महोदयांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना . देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तातडीने सुचित करावे . अशी आग्रही अपेक्षाही सादिक खाटीक यांनी केली आहे .

काळे पडळ पोलीसांचे विरोधात रोहन वाघमारे यांचे मंत्रालय समोर उपोषण

पुणे, दि. ११ : पोलिस ठाण्यात ठेकेदारां विरूध्द तक्रार देण्यासाठी गेलेल्या एकास तेथील ठाणे अंमलदार व अन्य तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करून न घेता उलटपक्षी ठेकेदाराच्या सांगण्यावरून त्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना काळेपडळ तरवडीवस्ती पोलिस ठाण्यात घडली आहे.
या पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार श्री. काळे व अन्य तीन पोलिस कर्मचारी यांची कसून चौकशी करून न्याय देण्याची मागणी रोहन दिलीप वाघमारे
रा. काळेपडळ हल्ली मुक्कम लोणंद,(ता. खंडाळा), जि. सातारा यांनी मुख्यमंत्री साहेब यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.अन्यथा या विरूध्द कुटंबासमवेत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात रोहन दिलीप वाघमारे
रा. काळेपडळ हल्ली मुक्कम लोणंद, (ता. खंडाळा), जि. सातारा यांनी म्हटले आहे की, ठेकेदार राजू यांचेकडे मी काम करत होतो. मला माझ्या कामाचे पैसे ते वेळेवर देत नव्हते.वारंवर दमदाटीची भाषाही ते मला करत होते. माझ्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी माझ्या बुलेट गाडीची चावी काढून घेतली. ठेकेदार राजू यांच्या मीत्रानेही तुझी गाडी व पैसे देत नाही.असे म्हणुन गाडी हिसकावुन घेतली. तुला कोठे जायचे तेथे जा, माझ्या सगळीकडे ओळखी आहेत.असे म्हणून पुन्हा पैसे मागायला आलास तर तुला संपवून टाकेन अशी धमकीही दिली. या कारणांवरून ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास
काळेपडळ तरवड वस्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता ठेकेदाराने माझ्या अगोदर पोलीस ठाण्यात जावून ठाणे अंमलदार श्री. काळे यांच्याशी सल्ला मसलत करून चिरी मीरी देवून त्यांना माझ्या गाडीची कागद पत्रे तपासा व कारवाई करण्याचे सांगून गाडीची चावी माझ्या हातात ठेवून ते दोघे निघून गेले. त्यानंतर पोलीसांनी मला आत बोलवले. गाडीची कागद पत्रे आहेत का आशी विचारणा केली, कागदपत्र आणून देतो म्हणून सांगूनही पोलीसांचे ऐकले नाही.पोलीस अमंलदार श्री.काळे व अन्य तीन पोलीसांनी मला तेथे जबरदस्त अमानुषपणे मारहान केली. दुचाकी बुलेट मोटार सायकलचा सायलेन्सर गाडी रेस करुन गरम करून माझे तोंड त्याला चिकटवले व माझ्या हातावर,पायावर मारहान केली. त्यामुळे मी भयभीत झालो.औषध उपचार करूनही मी अदयापही आजारीच आहे. त्यामुळे कामावरून घरीच आहे. वाणवडी पोलीस ठाण्या अंर्तगतच्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलिस, तक्रार देण्यासाठी गेलेल्यांवर असा अत्याचार करतात का ? त्यांना मारहान करण्याची परवानगी कोणी दिली ? माझ्याकडे काही कागदपत्रे नव्हती तर त्यांनी माझ्यावर कोर्टकेस करायला हवी होती. मात्र ठेकेदार राजू व त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून मला पोलिसांकडून अमानुष मारहाण झाली आहे.मारहान करत असताना म्हारामांगाचे लोक हे असेच असतात व त्यांना सरकारने डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे त्यांचे लाड झाले आहेत. जरा काय झाले तर हे लोक जातीवाचक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. असेही ठाणे अमंलदार श्री. काळे व त्यांचे सहकारी तीघे पोलिस कर्मचारी बोलत होते. मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तक्रारदार गेल्यास तेथे त्याला मारहान करण्याचा अधिकार शासनाने पोलिसांना दिला आहे काय ? तक्रार घेणे तर लांबच मात्र तक्रारदाराचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्याची मानसिकताही हे पोलिस कर्मचारी ठेवत नाहीत.अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हावी व यापुढे माझ्या जीवीतास ठेकेदार व त्यांच्या मित्रांकडून धोका आहे. मी त्यांच्या विरूद्ध आपणाकडे पत्र पाठवल्याने माझ्या कुटुंबाचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर अर्जाची चौकशी व सिसिटीव्हीचे फुटेज तपासुन वाणवडी पोलीस ठाण्यात चौकाशी व्हावी ही अपेक्षा आहे. कारण काळेपडळ तरवडी पोलिस ठाण्यातील पोलीसच माझा घातपात करतील की काय,आशी भितीही आता माझ्या मनात निर्माण झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री साहेब यांनी चौकशी लावावी. या घटनेची पोल खोल झाल्यास सत्य उघडीस येईल यात तिळमात्र शंका नाही. तसेच नार्को टेस्ट घेण्याची परवानगी मिळावी.तरी संबधीत पोलीस कर्मचारी श्री.काळे यांच्यासह अन्य तीन पोलिस कर्मचारी यांची सखोल चौकशी होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.अन्यथा कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही श्री. वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्री, कोल्हापूरचे आयजी, पुणे व साताऱ्याचे न्यायधिस, मानवी हक्क आयोग, पुणे आयुक्त यांना माहितीसाठी पाठवल्या आहेत.


सपोनि.अक्षय सोनवणे व पो. ह. रामचंद्र गाढवे यांची मोठी कामगिरी

दोन तोळे सोन्याचा अर्ध्या तासात लावला छडा

दहिवडी प्रतिनिधी,
दहिवडी (ता. माण)येथील राहणाऱ्या महिला जास्मिन निसार इनामदार या आज गुरुवार दि.९ रोजी दहिवडी बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना त्यांच्या गळ्यात असलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र गळ्यातील स्कार्फ काढताना पडले होते. सदर महिला या बारामती येथे परत जात असताना पांगरी जवळ गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यात त्यांचे मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत त्यांचा मुलास कळवले. सदर मुलगा दहिवडी पोलीस ठाण्यात गेला व त्यांने घडलेल्या प्रकाराबाबत सपोनि.अक्षय सोनवणे यांना माहिती दिली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस हवालदार गाढवे यांनी मंगळसूत्र पडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दहिवडी बाजारपेठ व इतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामकाज चालू केले. त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये अज्ञात महिलेला मंगळसूत्र दिसल्यानंतर त्यांनी ते उचलून घेतल्याचे अस्पष्टपणे दिसत होते.

फोटो…….


दहिवडी : हरवलेले दोन तोळे सोने महिलेला परत करताना सपोनि.अक्षय सोनवणे व हवालदार रामचंद्र गाढवे.

वडूज पोलीस स्टेशन ने सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या


खटाव प्रतिनिधी –
जे के काळे यांचे कडून.

error: Content is protected !!