Advertisement

विडणी येथे महिलेचा गुढरित्यानिर्घृण खून,नरबळी असल्याची चर्चा

(अघोरी खून )

लोणंद (प्रतिनिधी) –
विडणी येथे ऊसाच्या शेतामध्ये एका महिलेचा गुढ रित्या निर्घुण खून झाले असल्याची घटना घडली आहे . मृतदेहाचे शेजारी अघोरी पूजेचे साहित्य आढळून आले आहे आढळून आलेल्या आहेत.
या घटनेने विडणीसह या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ,
विडणी ता. फलटण येथील २५ फाटा नजीक व शिवाजी महाराज मठाच्या पश्चिमेच्या बाजूस विडणी गावातील डॉ.प्रदीप जाधव यांच्या ऊसाचे शेतात एका महिलेची निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली आहे,
या घटनेची माहिती विडणीच्या पोलीस पाटील सौ.शीतल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
शुक्रवार दि.१७जानेवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास गावातील डॉ. प्रदीप जाधव हे आपल्या २५ फाटानजीक व शिवाजी महाराज मठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आपल्या ऊसाच्या शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये सडलेला वास आल्याने त्यांनी पाहिले असता, त्यांना आपल्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा निर्घुण खून झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस पाटील सौ.शीतल नेरकर यांना दिली.
या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी ,परकर, पांढरा रंगाचा स्कार्प, चप्पल तसेच लिंबू नारळ, काळी बाहूली हळदीकुंकू ,गुलाल, दहीभात तसेच याठिकाणी अघोरी विधी केल्याचे साहित्य आढळून आले आहे,
तसेच याच ठिकाणीच धारदार चाकू, सुरा यासारखे घातक हत्यारेही आढळून आली आहेत . या महिलेचे मुंडन केलेले केस, रक्त व तेलाचे डागही दिसून आले आहेत.
यावरून या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवठी आढळून आली आहे.
तर थोड्याच अंतरावर याच महिलेचा शरीराच्या कमरेखालचा संपूर्ण भाग हिस्त्र प्राण्यांनी खालेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहूल धस,पोलिसनिरीक्षक सुनील महाडिक उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील शिवाजी जायपत्रे ,नागटिळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसरातील शेतामध्ये पाहणी केली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत.
घडलेल्या या अघोरी घटनेने विडणी व परिसरातील जनता हादरली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ,
अंधश्रद्धेचा पोटी ही घटना घडली असल्याचे दिसून येते आहे.
अद्यापही याबाबत तपास सुरू आहे.
फलटण पोलीस निरीक्षक अधिक तपास करीत आहेत.
..

मरडवाक येथे ‘बालआनंद बाजाराचे’ आयोजन

चिमुकले विद्यार्थी बनले भाजीपाला विक्रेते

मायणी दि.१७ :- वार्ताहर

                 मरडवाक ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दप्तरमुक्त आनंदायी शनिवार'

अभियानांतर्गत गत शनिवारी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकले विद्यार्थी छोटे व्यापारी बनून भाजीपाला , खाऊचे पदार्थ विक्री करताना दिसत. होते. यावेळी ग्रामस्थांनी उस्फुर्त पणे या बाजारात दाखल होताना छोट्या व्यापारी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मालाची खरेदी केली.
या उपक्रमाचे उद‌घाटन मरडवाक चे लोकनियुक्
सरपंच संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच पांडुरंग जाधव,
शाळा व्यवस्थाक समिती अध्यक्ष भाऊसो घुसाठे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते..
सर्वांत उत्तम संपत्ती म्हणजे फावला वेळ.
यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी उपक्रमाचे नियोजन केले

म्हसवड येथे भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात उत्साहात

म्हसवड : करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या वतीने आयोजित भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ सौ. सोनिया गोरे (मा. ना. जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभ होता, ज्यामध्ये म्हसवड परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. सुवर्णा पोरे, सौ. अंजली भागवत, राजलक्ष्मी पोरे, अँड. गौरी पोरे यांचा समावेश होता. उपस्थित महिलांनी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पारंपरिक उत्साह साजरा केला.कार्यक्रमादरम्यान भाजप सदस्यता अभियानाचे उद्दिष्ट आणि महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.कार्यक्रमाचे आयोजन करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या सहकार्याने बाळासाहेब पिसे, बाबू मुल्ला, सागर चव्हाण, विकास लोखंडे, आणि सौ. पानसंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. शेवटी आभार प्रदर्शन अँड. शुभम पोरे यांनी केले.महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा, दि.17 : जिल्ह्यातील महिला बचत गट खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तुंची निर्मिती करित आहे. त्यांना हक्काची बाजार पेठ मिळावी यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील. या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मिनी सरस 2025 मानिनी जत्रेचे उद्घाटन व महा आवास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद आदी उपस्थित होते.

‘उमेद’ अंतर्गत महिला बचत गटांना ताकत देण्याचे काम केंद्र व राज्य शासनाने केले आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम ठरविला आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार आहे. महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबर इतर चांगल्या वस्तुंची निर्मिती करीत आहे, त्यांच्या वस्तुंसाठी विविध शहरांमधील मॉलमध्ये एक स्टॉल उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्ह्यात 20 हजार महिला बचत गट आहेत. उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे.

बचत गटाच्या महिला घेतलेले कर्ज नियमित फेडत असतात, या महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाडून जिल्ह्यातील बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. नायगाव येथे 125 कोटी रुपये खर्च करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात येत आहे. येथे उमेदचे प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजार पेठ मिळावी म्हणून मॉल उभारण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, बचत गटांच्या उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासन काम करीत आहे. छोट्या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करुन केंद्र व राज्य शासन या व्यवसायिकांना व्यवसायासाठी बळ देत आहे. बचत गट चांगले उत्पादनांची निर्मिती करीत आहेत. या उत्पादकांनी आपला संपर्क क्रमांक सर्वांना द्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री व्हावी यासाठी महामार्गावर मॉलची निर्मिती करावी. यातून त्यांचा माल चांगल्या दरासह मोठ्या प्रमाणात विकला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक श्री. सिद यांनी उमेद व महाआवास अभियानाची माहिती दिली.

कार्यक्रामच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी महिला बचत गटांच्या प्रत्येक स्टॉला भेटी देवून उत्पादित केलेल्या मालाची माहिती घेतली.

या कार्यक्रमा प्रसंगी लखपती दिदींचा सत्कार, 2024-2025 अंतर्गत आवास योजेंतर्गत पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात घराचा ताबा व उमेद अंतर्गत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेटतात भिडु अन् खेळतात लुडो |म्हसवड शहरात मोबाईल गेमींगद्वारे लाखो रुपयांची उलाढाल

म्हसवड दि. १७
म्हसवड शहरात सध्या ऑनलाइन मोबाइल गेमचे पेव फुटले असुन या ऑनलाइन गेमद्वारे शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची वस्तुस्थिती आहे, दोन किंवा त्याहुन अधिक भिडु एकमेकांना कोठेही भेटले की त्यांच्यामध्ये लगेचच लुडो चा डाव सुरु होत असुन याद्वारे काहीजण मात्र भिके कंगाल झाले आहेत.
या गेमद्वारे काहीजण कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे, मात्र याकडे पोलीसांनीही काना डोळा केल्याने शहरातील अनेक गल्लीबोळात असे भिडु लुडोचा डाव टाकलेले आढळुन येतात. मोबाईल वर अँपद्वारे ही गेम डाऊनलोड केली जाते, त्यानंतर दोन किंवा त्याहुन अधिकजण या मध्ये सहभागी होवुन त्यावर पैशाचा पाऊस पाडला जातो. या मध्ये जो जिंकतो तो हसतो मात्र जो हरतो त्याची अवस्था धड सांगता येत नाही, सहनही होत नाही अशी होते. या गेमद्वारे अनेकजण कर्जबाजारी झाल्याचे चित्र असुन दिवसभर मोबाईलमध्ये डोकं घालुन ही गेम खेळणार्यांच्या डोळ्याला व मानेला त्रास होत असल्याचेही अनेकजण सांगत आहेत. लुडोचा हा प्रकार म्हणजे जुगारच असल्याचे बोलले जात असुन यातुन हजारो रुपयांची दररोज उलाढाल होत आहे. लुडो खेळणार्यां भिडोंचे अड्डे कोठे सुरु आहेत याची संपूर्ण माहिती पोलीसांना आहे, मात्र खेळणारे भिडोही पोलीसांचे भिडु असल्याने ते त्यांच्याकडे आजवर डोळे झाक करीत आले आहेत, त्यामुळे या खेळाचा प्रसार अधिक होवु लागला असुन अनेकजण यातुन कर्जबाजारी होत असल्याची वस्तु स्थिती आहे.

फोटो

दहिवडी पोलीसांचा गोंदवले येथे दारू अड्ड्यावर छापा.

म्हसवड वार्ताहर

गोंदवले येथे विदेशी दारू विक्री करताना एकास अटक करण्यात आली असून 2600रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी

गोंदवले खुर्द ता. माण जि. सातारा गावचे इद्धीत हॉटेल वनराज ढाब्याचे पाठीमागे आडोशास नारळाचे झाडाखाली उघडयावर एक जण विदेशी दारू विक्री करताना पोलीसांना आढळून आला.
दहिवडी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खाडे व इतरांनी छापा टाकून मुद्दे माल जप्त केला आहे
याप्रकरणी राजकुमार दत्तात्रय काळे वय-44 वर्षे रा. गोंदवले खुर्द ता. माण जि.सातारा यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

यामध्ये मैकडावल कंपनी घ्या 5 बाटल्या,देशी दारू च्या 22 बाटल्या,इम्पिरिअल ब्ल्यू 2 बाटली,
असा एकूण 2600रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दहिवडी पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.पी. खाडे हे तपास करीत आहेत.
….

error: Content is protected !!