Advertisement

मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असेल तरीही सर्वांना वस्तुस्थिती कळतेच. बाळासाहेब आंबेकर.

‘’ आयत्या बिळावर नागोबा
चक्क समाजाची दिशाभूल ‘’

सध्या खोटे बोल पण रेटून बोल अशी नवी चुकीची परंपरा समाजातील कांहीं पुढारी मंडळींनी समाजासमोर मांडली आहे. आपला कुठलाही दूरान्वयाने काहीही संबंध नसताना स्वयंघोषित टिळा लावून नसलेले पदे जोडून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, वर्तमान पत्रात खोट्या बातमी छापून आणणे, समाजाला आणि कांही प्रमुख व्यक्तींना सरळ सरळ ब्लॅकमेल करणे असा छान उद्योग गेल्या कांहीं दिवसांपासून चालू केला आहे.
मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असेल तरीही सर्वांना वस्तुस्थिती कळतेच.
लाखोत नव्हे तर करोडो रुपयांचा हिशोब गेल्या कांहीं वर्षापासून मागूनही ज्यांनी अजून दिला नाही ही मंडळी आता समाजाला अक्कल शिकायला चालले आहेत.
ज्यांनी आपल्या गुरुसमान महाराजांना त्रास दिला त्यांनीच आता महाराजांची ढाल करून किंवा महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळीबार करण्याचे लाजीरवाणी प्रयत्न चालू केले आहेत.
समाजकारण करताना समाजाच्या फायद्यासाठी राजकारण जरूर करावे परंतु राजकारणासाठी समाजाचा गैरवापर करणे हा निंदनीय प्रकार आहे.
केशवराज संस्थेचे आणि नामदेव समाजोन्नती परिषदेचे सर्व पदाधिकारी अत्यंत संयम बाळगून आहेत याचा अर्थ चुकीचा घेऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.
यापुढे सर्व सनदशीर मार्गाने जाण्याची कारवाई करणेस आता मागे आम्ही मागेपुढे पहाणार नाही एवढाच इशारा आज येथे देत आहोत
ही सर्व मंडळी २००४ ते २०२४ पर्यंत कुठे गायब होती. आजच ही मंडळी जागी कशी झाली आहेत हा यक्ष प्रश्न आहे. याचा त्यांनी प्रथमता खुलासा केलेला नाही. तो करावा असे आमचें त्यांना आव्हान आहे असो.
यापूर्वी केशवराज संस्थेच्या उरलेल्या एकमेव एका वरिष्ठ विश्वस्तांना असेच मधाचे बोट लावून बेकायदेशीर मार्गाने स्टॅम्प पेपरवर स्वतः नावे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्याचे कृत्य तसेच.पंढरपूर समाजाला वेठीस धरून,विनाकारण त्रास देऊन काम चालवले आहे हे तेथील समाजाला सुद्धा माहीत आहे.मंदिरातून उपलब्ध होणाऱ्या रोख रक्कमा घेऊन त्याचे काय करण्यात येते हे भगवान विठ्ठल जाणे.
अजून खूप काही याबाबत लिहिण्यासाठी आहे, पण बस सुज्ञास न सांगणे लागे.
गेली चार वर्षे यांनी समाज्याच्या हितासाठी झटण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आमच्या संस्थांना किती त्रास दिला आहे हे मला सांगायची गरज वाटत नाही.
माझ्या आधीचे अध्यक्ष वै. सुधीरदादा पिसे यांना देखील काम करत असताना खूप त्रास दिलेला आहे.
सर्वसामान्य जनतेला हे माहीत आहे की महाराष्ट्र शासन कधीही कोणाच्या हातात पैसे देत नाही, ही वस्तुस्थिती असताना त्याचा निर्रथक बाउ करुन खोटा प्रचार करण्यचा केविलवाणा प्रयत्न केला होता परंतु यात ते तोंडघशी पडलेले आहेत
लोकसहभागातून निधी संकलन करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अत्याधुनिक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर पहिले भव्य असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मारक उभारण्याची कल्पना नामदेव समाजोन्नती परिषदेने शासनासमोर मांडली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे
केशवराज संस्थेचा कायदेशीर अध्यक्ष मी असताना अध्यक्ष म्हणून आपणच आहोत असे मिरवणारे खोटे पद आणि घटनेत सचिव पद असताना सरचिटणीस आपणच आहोत ही बिरुदावली मिरवणारे यांनी कायदेशीर आहोत काय? हे दाखवून द्यावे असे माझे त्यांना आव्हान असून खोटेनाटे पद समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्वांन मंडळींनी आपण कोण आहोत ? याचा त्यांनी आता गंभीरपणे विचार करावाच
४ जिल्हाधिकारी, ४ प्रांताधिकारी, ४ विभागीय आयुक्त, ३ मुख्यमंत्री यांचे बरोबरच विविध खात्यातील सोलापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील अधिकारी यांच्या भेटीगाठी घेतघेत केलेला पाठपुरावा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या २ माजी अध्यक्षांसह आज श्री संजयराव नेवासकर हे करीत आहेत हे आदरणीय नामदास महाराज यांच्या सहित सर्व समाजाला ज्ञात आहे एवढेच आज पुरेसे आहे.

आपला,
बाळासाहेब आंबेकर,
अध्यक्ष,
केशवराज संस्था, पंढरपूर.
जेष्ठ पत्रकार

वाचन,चिंतन आणि निरीक्षणातून नवसाहित्यिकांना लेखनाची दिशा मिळते – सुनील दबडे

आटपाडी वार्ताहर
सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे ‘देवनागरी किशोर साहित्य संमेलन’ बालक,पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त़असून मंडळाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे यांनी व्यक्त़ केले.
सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या 32 व्या वर्धापन दिन,विश्व़ हिंदी दिन व स्वर्गीय प्राचार्य भगवानराव बाबर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मंडळाने राष्ट्रभाषानुरागी प्राचार्य भगवानराव बाबर राष्ट्रभाषा भवन तुरची-तासगाव येथे आयोजित केलेल्या खुल्या देवनागरी किशोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दबडे बोलत होते. यावेळी नव्याने साहित्य लेखन करणारे सांगली जिल्ह्यातील शिक्षक,साहित्यिक, विद्य़ार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनिल दबडे पुढे म्हणाले की शिक्षकांनी आणि विद्य़ाथ्यांनी चांगल्या पुस्तकांचे खूप वाचन करावे. वाचनामुळे लेखनाची दिशा मिळते. वाचनामुळे माणसाच्या संपूर्ण आयुष्याला चांगले वळण लागते. वाचन आणि लेखन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लहान मूल जसे रांगत रांगत चालायला शिकते तसा साहित्यिक वाचत वाचत लिहायला शिकतो. वाचनाशिवाय केलेले लेखन पाण्याच्या बुडबड्यासारखे असते.श्व़ासाशिवाय माणूस जगू शकत नाही. तसा वाचनाशिवाय साहित्यिक लिहू शकत नाही. नव्याने लिहू पाहणाऱ्या कवी लेखकाने वाचनाबरोबरच लेखनाची तंत्रेही अवगत करावी.
यावेळी बोलताना दबडे पुढे म्हणाले की “मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची मनं बधीर झाली आहेत. वाचनाकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक पालक नोकरी धंद्य़ाच्या मागे आहेत. नव्या नव्या वस्तूंनी घरं भरून गेली आहेत.घरातली आई सायंकाळच्या वेळेला दूरदर्शनवरील मालिका बघायला व्यस्त! वडील मोबाईलवर लॅपटॉप वर दंग!! घरातला मोठा भाऊ, बहिण चॅटिंग मध्ये गुंग!!! घरातील अशा वातावरणामुळे आपापसात संवाद कमी झाला आहे. त्यामुळे लहान मुलांचे बालपण हरवलं आहे. घरपण संपत चाललेली घरं आणि तुटत,फाटत चाललेली मनं! अशी अनेक घरांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. घराला घरपण आणण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी सुसंवाद साधा. त्यांना वेळ व प्रेम द्य़ा. त्यांच्या हातात पुस्तक द्य़ा. शिक्षकानी शाळेत विद्य़ार्थ्यांची आई व्हा’. असे मत यावेळी बोलताना दबडे यांनी व्यक्त़ केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे पुढे म्हणाले की ‘मराठी साहित्यात आजपर्यंत ज्येष्ठ शिक्षक साहित्यिकांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ओला- सुका दुष्काळ, शेतीमालाचे गडगडलेले भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रीभृणहत्या,महिलांची असुरक्षितता,बेरोजगारी,गुंडगिरी, ग्रामीण भागात फोफावणारी अंधश्रद्ध़ा, दूषित राजकारण, व्यसनाधीनता,गावागावात लग्नविना राहिलेली व वय वाढलेली पोरं या व अशा अनेक प्रश्नांमुळे समाजात अस्वस्थता दिसून येते आहे. शिक्षक साहित्यकांनी लेखन करताना अशा अस्वस्थ वर्तमानाचा वेध आपल्या लेखनातून घ्यावा.असे आवाहन यावेळी दबडे यांनी उपस्थित नवलेखकाना केले.
संमेलनाच्या सुरुवातीला सुनिल दबडे यांच्या हस्ते प्राचार्य भगवानराव बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घ़ाटन करण्यात आले..हिंदी मंडळाचे ज्येष्ठ विश्व़स्त जयवंत दबडे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक सुनिल दबडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आडसुळ यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात शिक्षक व विद्य़ार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. काव्य स्पर्धेतील विजेत्यांचे व हिंदी मंडळाने वर्षभर घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारोपाच्या कार्यक्रमात करण्यात आले.काव्य स्पर्धांचे परीक्षण कवी किशोर दीपंकर व उत्कृष्ट निबंधकार उदयकुमार गवळी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा हिंदी मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती सुजाता मोरे, उपाध्यक्ष नंदकुमार खंडागळे,कार्यवाह निवृत्त़ी शिंदे,सहकार्यवाह उदयकुमार गवळी,जिल्हा कार्यकारणी विश्व़स्त बाळासाहेब गुरव व आप्पासो पाटील,आटपाडी तालुका हिंदी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कदम,तासगाव तालुका हिंदी संघटनेच्या सदस्या श्रीमती शारदा यादव,तासगाव तालुका हिंदी संघटनेचे सदस्य रमेश चव्हाण, बाळासाहेब शेंडगे व सौ.ज्योती कोगनोळे, वाळवा तालुका हिंदी संघटनेचे सद,स्य विकास शेटे व श्रीकांत देशमुख, मिरज तालुका हिंदी संघटनेचे सदस्य सतीश कांबळे मंडल के हितैषी वि.रा.पाटील, शिक्षक,पालक व विद्य़ार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कवी किशोर दीपंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे केले. शेवटी वंदे मातरम गीताने समारोहाची सांगता झाली.
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
.

बकासुर सर्जा ची बैल जोडी ठरली यमाई केसरी

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

औंध, ता.२२: महाराष्ट्रसह अनेक राज्यातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री यमाई केसरी बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यामध्ये मोहित शेठ धुमाळ यांचा बकासुर व कै.रणजीत निंबाळकर सर यांचा सर्जा या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे एक लाख रुपयांचे रोख बक्षीस ढाल व आकर्षक चषक जिंकून श्री यमाई केसरी चा किताब पटकावला.
येथील खरशिंगे रोड जवळ असलेल्या सरकारी मळा या मैदानात सकाळी आठ वाजता गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचा उपस्थितीत शासनाच्या सर्व नियम व अटींना अधीन राहून पार पडलेल्या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ही तीन राऊंड शर्यत होती शर्यतीला ४७५ गाड्यांची नोंद होऊन गटाचे एकूण ५४ फेरे व सेमी फायनलच्या सात फेऱ्या झाल्या कमिटीच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे एका दिवसात उजेडात फायनलचा फेरा झाला दुसऱ्या क्रमांकापासून विजयी गाडी मालकांची नावे पुढीलप्रमाणे २) सागर शेठ कटरे कटरेवाडी, कटरेवाडी घाणद, जहांगीर शेठ खरसुंडी,३) सिद्धिविनायक प्रसन्न रणजीत निंबाळकर व मयुरी रणदिवे औंधकर,४) सोनाली एंटरप्राइजेस चऱ्हेगावकर, ५) संस्कार शिंदे करवडी, ६) प्रमोद जाधव ,स्वामी समर्थ कळंबी,७) भैरवनाथ प्रसन्न हिंदकेसरी संभाजी आबा काले आणि पाटकळकर.
बैलांना पळण्यासाठी आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी योग्य असे मैदान तयार केले होते मैदानात एकापेक्षा एक वरचढ जातिवंत खिलार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळाला स्पर्धेतील प्रत्येक फेऱ्या चुरशीच्या होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक ठरली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते विजेता बैलगाडी मालकांना रोख रक्कम व प्रत्येकी एक ढाल देऊन सन्मानित केले गेले प्रत्येक सेमी फायनल मध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह तर गट विजेत्या प्रथम बैलगाडी साठी सन्मानचिन्ह दिले गेले. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी, रोहन खन्ना, हणमंतराव शिंदे ,राजेंद्र माने ,प्रशांतराव खरमोडे , दीपक नलवडे,अमरसिंह देशमुख,गणेश देशमुख ,गणेश हरिदास, दाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते

मतदानचं चोरून घेतल तर भ्रष्टाचार काय आहे—— बच्चु कडू

पिक विम्यासाठी 1 रुपया का घेता— बच्चु कडू

भविष्यात अजित पवार व एकनाथ शिदे यांना सत्तेतुन बाहेर काढण्याचा भाजपचा डाव—— बच्चु कडू

पंढरपूर

पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालयाचे विद्यमान अध्यक्ष बच्चु कडू यांची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकित प्रहार सोलापूर जिल्हात आपले उमेदवार उभा करणार तसेच महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणुन संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची ओळख गोरगरीब, कष्टकरी यांचा देव म्हणून आहे. त्या पंढरीच्या पावन नगरीतुन सुरुवात करणार असल्याचे यावेळी बच्चु कडू यांनी व्यक्त केले. तर भविष्यात प्रहार संघटनेची ओळख पांडूरंगाच्या पंढरीतून संपूर्ण महाराष्ट्राला झाली पाहिजे. येणार्या सर्वच निवडूकि मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आपली ताकत दाखवेल. पंढरपूर शहर व तालुक्यात गावं तिथं शाखा, गांव तिथं प्रहार हा उपक्रम जोरात राबवून गोरगरीब, दिव्यांग, विधवा, निराधार, कामगार यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करून गुन्हे दाखल झाले तरी चालतील असे परखड मत व्यक्त केले.
यावेळी ता. प्रमुख संतोष मोरे यांनी बच्चुभाऊ कडू यांचे आदेशाने व जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के व उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
सर्व सामान्य माणसाला शासकिय कार्यालयात न्याय मिळत नसेल तर अधिकार्याना चोप देऊन साडे तीनसे गुन्हे अंगावर घेणारा बच्चु बच्चु कडू आहे. प्रहारच्या पदाधिकार्यांनी सुद्धा फक्त पद घेऊन बसण्या पेक्षा जर सर्व सामान्य जनतेला एखाद्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालवे लागत असतील तर आंदोलन करून अधिकार्याना चोप देऊन गुन्हे अंगावर घेतले तरी काय हरकत आहे असे मत बच्चु कडू यांनी पंढरीत व्यक्त केले

error: Content is protected !!