Advertisement

शिवप्रताप मल्टिस्टेट “बँको ब्लू रिबन 2025” पुरस्काराने सन्मानित

– लोणावळा येथील ऐतिहासिक सहकार परिषद सोहळ्यात संस्थेच्या कार्याचे कौतुक!

*विटा : येथील शिवप्रताप मल्टिस्टेट ला आपल्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि ग्राहकांना विश्वासार्ह दिलेल्या सर्वोत्तम सेवा व सुविधा याबद्दल *”बँको ब्लू रिबन 2025″* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथील दिमाखदार सहकार परिषद सोहळ्यात या पुरस्काराचे माजी सहकार आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

शिवप्रताप मल्टिस्टेट च्या सर्व शाखांमध्ये कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या वित्तीय गरजा समजावून घेऊन उत्तम सेवा देण्याचे कार्य करत आहेत. संस्थेने ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता, डिजिटल बँकिंग आणि छोट्या व्यवसायांना कर्ज मिळवून देणे व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे यासारख्या विविध उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे.

कार्यकारी संचालक मा.विठ्ठलराव साळुंखे यांनी यावेळी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देत आगामी काळात संस्था नवीन डिजिटल बँकिंग सेवांमध्ये सुधारणा करणार असून ग्राहकांच्या सुलभतेसाठी अनेक ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.“आमचा मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम डिजिटल सेवा देणे आहे.”
शिवप्रताप मल्टिस्टेट केवळ एक वित्तीय संस्था नाही, तर ती ग्राहकांच्या आर्थिक जीवनात एक विश्वासार्ह भागीदार बनली आहे. संस्था ग्राहकांना सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी तत्पर आहे, ज्या मध्ये नवीन बचत खाती, डिजिटल बँकिंग, कर्ज सुविधा, विमा पॉलिसी, UPI QR, यासारख्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.

“आपली संस्था केवळ बँकिंग सेवा पुरवत नाही, तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकासाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत असल्याचे व हा सन्मान संस्थेचे संस्थापक स्व .प्रतापशेठ(दादा)साळुंखे यांच्या आशीर्वादाने, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि संस्थेच्या विकासाचा ठसा आहे. आम्ही आपल्या विश्वासावर उभे राहून या यशाचा आनंद साजरा करत असल्याचे चेअरमन मा. शेखर साळुंखे यांनी सांगून सर्व सभासद, कर्मचारी, आणि ग्राहक यांचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, सौ. नंदा सपकाळ, गणेश बाबर, विशाल चव्हाण, नितीन गोतपागर महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर लॉयर्स हॉल साठी २ कोटी ७० लाख निधी मंजूर

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल साठी २ कोटी ७० लाख निधी मंजूरआमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल उभारण्यासाठी १३४.७५ लाख रुपये निधीची याचबरोबर मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी १३५.९९ लाख रुपये निधीच्या तरतुदीस शासन निर्णयाद्वारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा येथील वकील मंडळींनी अधिवक्ता संघाच्या वतीने लॉयर्स हॉल उभारण्यात यावे अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली होती.

मतदार संघातील पंढरपूर, मंगळवेढा या दोन्हीही तालुक्यात लॉयर्स हॉल उभारण्यात यावे.यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लायर्स हॉल बांधण्याचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी शासनास सादर केला होता. सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून आमदार समाधान आवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून पंढरपुर आणि मंगळवेढा येथे तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी निधीची तरतूद करून घेतल्याने याचा फायदा वकील मंडळी आणि न्यायासाठी दाद मागणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार असल्याने वकील मंडळी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

चौकट-

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात लॉयर्स हॉल साठी २ कोटी ७० लाख निधीची तरतूद

मतदार संघातील पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सतत शासन दरबारी सतत पाठपुरावा करून दोन्ही तालुक्यातील लॉयर्स हॉल बांधण्यासाठी २ कोटी ७० लाख निधी मिळवल्याने वकील मंडळी आणि सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

वडूजच्या जवानाचा अपघाती मृत्यू …आज शुक्रवारी पार्थिव वडूजमध्ये दाखल होणार


प्रतिनिधी- विनोद लोहार
वडूज : येथील माधवनगर चे सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे यांचे बुधवारी रात्री देशसेवा बजावत असताना वयाच्या ४० व्या वर्षी अपघाती निधन झाले.
जवान चंद्रकांत काळे हे अठरा मराठा मराठा तोफखाना रेजिमेंट चे राजस्थान येथील महाजन फिल्ड फायरींग रेंज मध्ये युध्द अभ्यास ट्रेनिंग घेत असताना अपघाती निधन झाले. ते गेली अनेक वर्षे देश सेवेत रुजू होते . त्यांनी यापूर्वी पंजाब , लडाख, जम्मू काश्मीर, सतवारी, नवशेरा, सिकंदराबाद, डाबर तालबेहट, आवेरीपट्टी , अश्या विविध ठिकाणी देशसेवा बजावली होती. सध्या ते दिल्ली – मेरठ येथे अठरा रेजिमेंट मध्ये अटलरी डिपार्टमेंट मध्ये नाईक सुभेदार या पदावरती कार्यरत होते. चंद्रकांत यांचे प्राथमिक शिक्षण वडूज जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले.माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय एन.सी.सी. ग्रुपचे ते सीएचम होते. शैक्षणिक दशेपासूनच देशसेवेची आवड असणारे चंद्रकांत हे विविध मैदानी खेळात पारंगत होते.
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!