Advertisement

नागरबाई संभाजी सोनवणे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

म्हसवड -वार्ताहर–
सोलापूर येथील नागरबाई संभाजी सोनवणे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्या ८४ वर्षाच्या होत्या.
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे यांच्या चुलती होत्या.
त्यांना 29/ 12 /2024 रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी या वेळेला देवाज्ञा झाली.
नागरबाई संभाजी सोनवणे या परिवारातील एक मोठी आई नावाने परिचित होत्या.
यांचे पश्चात पाच मुलं दोन मुली नातवंड नाती असा मोठा परिवार मोठा परिवार आहे.
अशा कुटुंबातली एक व्यक्ती होती.
अतिशय हाल अपेष्टा व अत्यंत कष्टाने सर्व प्रपंचा उभा करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते .
त्यांच्या जाण्याने प्रचंड मोठी सोनवणे परिवारामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे.
सोलापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तहसिलदार यांच्या उपस्थितीत खटाव तालुक्यातील वीस सरपंच आरक्षण सोडत जाहीर,

वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार

वडूज : खटाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता तहसिल कार्यालय वडूज येथे तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या .
खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे – डिस्कळ – अनुसूचित जाती महिला , कुरोली सिद्धेश्वर – सर्वसाधारण , दहिवड – सर्वसाधारण ,खटाव – ना. मा . प्र. महिला ,दरजाई – ना. मा .प्र. महिला, काळेवाडी – ना. मा. प्र . ,भांडेवाडी – ना. मा. प्रवर्ग महिला , पवारवाडी – सर्वसाधारण – ,पडळ – सर्वसाधारण ,धकटवाडी – ना. मा. प्र . , पळसगाव – सर्वसाधारण महिला , अनपटवाडी – सर्वसाधारण महिला , वाकळवाडी – सर्वसाधारण , फडतरवाडी (नेर ) – सर्वसाधारण महिला , कटगुण – सर्वसाधारण , औंध – सर्वसाधारण महिला ,वर्धनगड – सर्वसाधारण महिला , पांढरवाडी – सर्वसाधारण , शिरसवडी – सर्वसाधारण महिला , यलमरवाडी – सर्वसाधारण महिला या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडले .
खटाव तालुक्यातील एकूण २० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील सर्व पक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते .
सरपंच आरक्षण सोडती मध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल व हुतात्मा परशुराम विद्यालया मधील विद्यार्थी उपस्थित होते . तर नायब तहसिलदार महेश चक्के , मंडलाधिकारी सचिन कर्णे , महसुल सहाय्यक सुषमा वाघमोडे उपस्थित होत्या .

फोटो : सरंपच आरक्षण सोडती दरम्यान तहसिलदार बाई माने व इतर
(विनोद लोहार)

खटाव तालुक्यातील वीस सरपंच आरक्षण सोडत जाहीर….
▪️ तहसिलदार बाई माने यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत

वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार

वडूज : खटाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता तहसिल कार्यालय वडूज येथे तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या .
खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत पुढील प्रमाणे – डिस्कळ – अनुसूचित जाती महिला , कुरोली सिद्धेश्वर – सर्वसाधारण , दहिवड – सर्वसाधारण ,खटाव – ना. मा . प्र. महिला ,दरजाई – ना. मा .प्र. महिला, काळेवाडी – ना. मा. प्र . ,भांडेवाडी – ना. मा. प्रवर्ग महिला , पवारवाडी – सर्वसाधारण – ,पडळ – सर्वसाधारण ,धकटवाडी – ना. मा. प्र . , पळसगाव – सर्वसाधारण महिला , अनपटवाडी – सर्वसाधारण महिला , वाकळवाडी – सर्वसाधारण , फडतरवाडी (नेर ) – सर्वसाधारण महिला , कटगुण – सर्वसाधारण , औंध – सर्वसाधारण महिला ,वर्धनगड – सर्वसाधारण महिला , पांढरवाडी – सर्वसाधारण , शिरसवडी – सर्वसाधारण महिला , यलमरवाडी – सर्वसाधारण महिला या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडले .
खटाव तालुक्यातील एकूण २० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील सर्व पक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते .
सरपंच आरक्षण सोडती मध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल व हुतात्मा परशुराम विद्यालया मधील विद्यार्थी उपस्थित होते . तर नायब तहसिलदार महेश चक्के , मंडलाधिकारी सचिन कर्णे , महसुल सहाय्यक सुषमा वाघमोडे उपस्थित होत्या .

फोटो : सरंपच आरक्षण सोडती दरम्यान तहसिलदार बाई माने व इतर
(विनोद लोहार)

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार- मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला मंत्रीपदाचा पदभार

मुंबई, दि. ३१: येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार राहुल दादा कुल,आमदार सचिन कांबळे-पाटील, अरुण गोरे (आबा) , धैर्यशीलदादा कदम,मंत्री गोरे यांच्या पत्नी सानिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री गोरे यांनी सपत्नीक मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन
करून पदभार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचावणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून काम चालू करणार आहे.

शिवाय पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दीदी कार्यक्रम १०० दिवसात करण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

19 रोजी ,औंध मध्ये राजयोग फाउंडेशन आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे

औंध : औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री यमाईदेवी यात्रे निम्मित राजयोग फौंडेशन संस्थापक श्री अमर देशमुख यांच्या मार्फत औंध मध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक 19/1/2025 रोजी औंध मध्ये घेण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध,यांची असणार आहे.स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक टी शर्ट. मेडल.आकर्षक बॅग, सहभाग प्रमाणपत्र आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी साठी प्रश्नांत जाधव -8600880998, तानाजी इंगळे -7769802137,बाबा नांदुगडे – 9075520805, शंभूराजे देशमुख – 9850186007 यांच्याशी संपर्क करावा.स्पर्धेसाठी स्पर्धकांना 200 रुपये एव्हडी नोंदणी शुल्क आकरण्यात आली आहे. वयोगट 16 ते 29 वर्षे पुरुष व महिला प्रथम क्रमांक 7000 रुपये तर दुतीय क्रमांक5000 रुपये, तृतीय क्रमांक 3000 आणि उत्तेजनार्थ रुपये 2000 आशी बक्षीशे असणार आहेत. तर वयोगट 30 वर्षे पुढील सुद्धा बक्षीशे ही वयोगट 16 ते 29 वर्षे प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम 3 विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.ही स्पर्धा यमाई स्टेडियम औंध येथून चालू होणार आहे. कार्यक्रमासाठी सकाळी झुम्बा डान्स चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धे मध्ये भाग घ्यावा असे आव्हान मा. श्री अमर देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास विभाग व शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने महिलांसाठी आरीवर्क प्रशिक्षण संपन्न.

(मुरुम प्रतिनीधी)
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशीव आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी 15 दिवसाच्या आरीवर्क प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात 30 महिलांनी सहभाग घेतला.
आधुनिक बदलत्या फॅशन नुसार शहरी आणि ग्रामीण महिलांची वाढत्या मागणी विचारात घेऊन महिलांसाठी आरीवर्क प्रशिक्षण उपयुक्त ठरेल अनिष्ट रोजगार संधी उपलब्ध करील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी केले.
शिवाजी महाविद्यालयात या प्रशिक्षणाचा समारोप झाला यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ अस्वले यानी महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशीव चे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांनी प्रशिक्षित महिलांना उद्योग उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रोग्राम समन्वयक सतीश चव्हाण यांनी सहकार्य केले. या समारोपात श्री अशोक चव्हाण यांनी प्रशिक्षित महिलांनी व्यावसाय उद्योग कसा करावा याचा मंत्र देतांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थी महिलांनी बनवलेल्या.
आरीवर्क ला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक भारती चौगुले, द्वितीय क्रमांक अशादेवी सोनकवडे, तृतीय क्रमांक शिल्पा गायकवाड आणि उत्तेजनार्थ अंकिता पाटील व ज्योती अंकुश यांना मिळाला आहे.
प्रशिक्षका ज्योती पवार यानी महिलांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणा साठी वाणिज्य विभागाचे डॉ अजित अष्टे, प्रा. खंडू मुरलीकर, प्रा. अक्षता बिरादार, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. संध्याराणी चौगुले, प्रा. विद्या गायकवाड प्रा. राणी बेंबलगे, प्रा. अंजली चव्हाण यांनी सहकार्य केले आहे.

म्हसवड येथील आसावरी मेळावणे हिने रायफल शूटिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवले.शालेय स्पर्धा.

रायफल शुटींग स्पर्धेत असावरी मेळावणे हीने पटकावले सुवर्ण पदक
आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत म्हसवडचा डंका

म्हसवड (वार्ताहर)

माण तालुक्यातील आसावरी मेळावणे हिने आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.


भारतीय शालेय महासंघाने आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेतील रायफल शुटींग प्रकार स्पर्धेत म्हसवड येथील मेरी माता विद्यालयाची विद्यार्थिनी कु. असावरी सतीश मेळावणे हीने सुवर्ण पदकाला गवसणी घालत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत क्रिडा स्पर्धेत म्हसवडचा डंका वाजवला, असावरीच्या या यशाने माण च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इंदौर ( मध्यप्रदेश ) याठिकाणी २० डिसेंबर ते २४ डिसेंबर या दरम्यान झालेल्या क्रिडा स्पर्धेत देशभरातील शाळांनी सहभागी होत आपल्या गुणवंत खेळाडुंना या स्पर्धेत उतरवले होते, या स्पर्धेत माण तालुक्यातील म्हसवड येथील मेरी माता विद्यालयानेही सहभागी होत विविध क्रिडा प्रकारात आपले विद्यार्थी खेळाडुंना उतरवले होते.‌ १७ वर्षा खालील गटातील या स्पर्धेत रायफल शुटींग प्रकारात १० मिटर अंतर स्पर्धेत म्हसवड च्या असावरी मेळावणे हीने सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेत माण तालुक्यासह म्हसवडचा डंका वाजवल्याने तिचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेली असावरी मेळावणे ही म्हसवड येथील मेरी माता विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिकत असुन तिचे आई – वडील हे अतिशय सामान्य जिवन जगत आहेत, आपल्या मुलीने मिळववेले यश हे त्यांच्यासाठी नवीन ऊर्जा देणारे ठरले आहे तर असावरी हीस यापुढे योग्य कोच मिळाल्यास भविष्यात ती देशासाठी नेमबाजी स्पर्धेत खेळुन देशासाठी एक दिवस सुवर्ण पदक निश्चित पटकावेल असा विश्वास तिच्या आई वडीलांसह तिच्या शिक्षकांना वाटत आहे. दरम्यान असावरी हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे मेरी माता विद्यालय, म्हसवड येथील भोई समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो –

दुःखद निधन,रामचंद्र कल्लापा शिंदे यांचे निधन

रामचंद्र कल्लापा शिंदे यांचे निधन


गोंदवले – रामचंद्र कल्लापा शिंदे वय ५२ रा.घुणेवस्ती ( पानवण ) यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या पाश्चात्य आई, वडील,दोन विवाहित मुले व माण पंचायत समितीचे शिक्षण विभागाच्या शालार्थ विभागाचे श्री.शिवाजी शिंदे यांचे बंधू होत.
रामचंद्र शिंदे यांच्या अंत्ययात्रेला शिक्षण विभागातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छाया – रामचंद्र शिंदे

ट्रक व ट्रॅव्हल अपघात, पुणे येथील दोन महाला ठार.

पंढरपूर: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसची आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. आज (रविवारी) सकाळी पुणे येथून देवदर्शनाला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची ट्रकची धडक (Pandharpur Accident News) झाल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील गुरसाळे येथे बस ओव्हरटेक करत असताना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने या बसमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स बसचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हे सर्व भाविक मावळ भागातील एकाच कुटुंबाचे असून बस मध्ये एकाच कुटुंबातील 27 जण होते. यातील किरकोळ जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढचा तपास करीत आहेत. ही बस पंढरपूर वरून मंगळवेढा, अक्कलकोट, तुळजापूर या देवदर्शनासाठी निघाली होती.(Pandharpur Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही भाविकांची खासगी बस पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीमध्ये होती, पंढरपूर पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असतानाच भाविकांची खाजगी बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण (Pandharpur Accident News) अपघात झाला. अपघातामध्ये दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, असून अन्य सहा ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.(Pandharpur Accident News)
टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेली भाविकांची बस (क्र.एम.एच. 14 एल.एस.3955) चा पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक (क्रमांक आर जे 14 जी एल 1780) सोबत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला (Pandharpur Accident News). या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अपघात (Pandharpur Accident News) झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

औंध मध्ये राजयोग फाउंडेशन आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे

औंध : औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री यमाईदेवी यात्रे निम्मित राजयोग फौंडेशन संस्थापक श्री अमर देशमुख यांच्या मार्फत औंध मध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक 19/1/2025 रोजी औंध मध्ये घेण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध,यांची असणार आहे.स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक टी शर्ट. मेडल. आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी साठी प्रश्नांत जाधव -8600880998, तानाजी इंगळे -7769802137,बाबा नांदुगडे – 9075520805, शंभूराजे देशमुख – 9850186007 यांच्याशी संपर्क करावा.स्पर्धेसाठी स्पर्धकांना 200 रुपये एव्हडी नोंदणी शुल्क अकरण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धे मध्ये भाग घ्यावा असे आव्हान राजयोग फाउंडेशन संस्थापक श्री अमर शेठ देशमुख यांनी केले आहे.

शकुंतला जाधव यांचे दुःखद निधन

शकुंतला जाधव

वडूज :

वडूज येथील माजी उपसरपंच यांच्या मातोश्री चे दुःखद निधन

येथील शकुंतला जगन्नाथ जाधव यांचे रविवारी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.वडूज नगरीचे माजी उपसरपंच परेश जाधव व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!