रायफल शुटींग स्पर्धेत असावरी मेळावणे हीने पटकावले सुवर्ण पदक
आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत म्हसवडचा डंका
म्हसवड (वार्ताहर)

माण तालुक्यातील आसावरी मेळावणे हिने आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
भारतीय शालेय महासंघाने आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेतील रायफल शुटींग प्रकार स्पर्धेत म्हसवड येथील मेरी माता विद्यालयाची विद्यार्थिनी कु. असावरी सतीश मेळावणे हीने सुवर्ण पदकाला गवसणी घालत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत क्रिडा स्पर्धेत म्हसवडचा डंका वाजवला, असावरीच्या या यशाने माण च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इंदौर ( मध्यप्रदेश ) याठिकाणी २० डिसेंबर ते २४ डिसेंबर या दरम्यान झालेल्या क्रिडा स्पर्धेत देशभरातील शाळांनी सहभागी होत आपल्या गुणवंत खेळाडुंना या स्पर्धेत उतरवले होते, या स्पर्धेत माण तालुक्यातील म्हसवड येथील मेरी माता विद्यालयानेही सहभागी होत विविध क्रिडा प्रकारात आपले विद्यार्थी खेळाडुंना उतरवले होते. १७ वर्षा खालील गटातील या स्पर्धेत रायफल शुटींग प्रकारात १० मिटर अंतर स्पर्धेत म्हसवड च्या असावरी मेळावणे हीने सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेत माण तालुक्यासह म्हसवडचा डंका वाजवल्याने तिचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.
स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेली असावरी मेळावणे ही म्हसवड येथील मेरी माता विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिकत असुन तिचे आई – वडील हे अतिशय सामान्य जिवन जगत आहेत, आपल्या मुलीने मिळववेले यश हे त्यांच्यासाठी नवीन ऊर्जा देणारे ठरले आहे तर असावरी हीस यापुढे योग्य कोच मिळाल्यास भविष्यात ती देशासाठी नेमबाजी स्पर्धेत खेळुन देशासाठी एक दिवस सुवर्ण पदक निश्चित पटकावेल असा विश्वास तिच्या आई वडीलांसह तिच्या शिक्षकांना वाटत आहे. दरम्यान असावरी हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे मेरी माता विद्यालय, म्हसवड येथील भोई समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो –