
म्हसवड -वार्ताहर–
सोलापूर येथील नागरबाई संभाजी सोनवणे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्या ८४ वर्षाच्या होत्या.
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे यांच्या चुलती होत्या.
त्यांना 29/ 12 /2024 रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी या वेळेला देवाज्ञा झाली.
नागरबाई संभाजी सोनवणे या परिवारातील एक मोठी आई नावाने परिचित होत्या.
यांचे पश्चात पाच मुलं दोन मुली नातवंड नाती असा मोठा परिवार मोठा परिवार आहे.
अशा कुटुंबातली एक व्यक्ती होती.
अतिशय हाल अपेष्टा व अत्यंत कष्टाने सर्व प्रपंचा उभा करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते .
त्यांच्या जाण्याने प्रचंड मोठी सोनवणे परिवारामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे.
सोलापूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.