Advertisement

जेष्ठ किर्तनकार किसन महाराज साखरे कालवश

जेष्ठ किर्तनकार किसन महाराज साखरे कालवश

पुणे ( वृत्तसेवा)

प्रकृती बिघडल्याने डॉ. किसन महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला

संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी पुण्यातील चिंचवड येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती बिघडल्याने डॉ. किसन महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
किसन महाराज साखरे यांच्या पश्चात कन्या यमुना कंकाळ आणि पुत्र यशोधन साखरे आणि चिदम्बरेश्वर साखरे आहेत. आळंदी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भोंदु बाबाच्या पोलीस कोठडीत वाढ

भोंदु बाबाच्या पोलीस कोठडीत वाढ

म्हसवड दि. २१
पैशाचा पाऊस पाडुन १० पट रक्कम करुन देण्याची बतावणी करुन आर्थिक फसवणुक करणार्या भोंदु बाबा मंगेश भागवत हा सध्या म्हसवड पोलीसांच्या कोठडीत असुन त्याचा अन्य एक सहकारी फरार असल्याने पोलीसांना त्याचा शोध घेण्यास आणखी थोडा वेळ मिळावा म्हणुन म्हसवड न्यायालयाने भागवत याच्या पोलीस कोठडीत वाढ करीत दि.२४ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.
म्हसवड येथील कांता बनसोडे यास १० पट रक्कम पैशाचा पाऊस पाडुन करुन देण्याचे आमिष दाखवत भोंदु बाबा मंगेश गौतम भागवत रा. कळस ता. इदापुर, जि. पुणे व त्याचा म्हसवड येथील सहकारी सर्जेराव वाघमारे यांनी ३६ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक करीत बनसोडे यांना १० पट रक्कम सोडाच पण त्यांनी दिलेली मुळ रक्कमही परत न दिल्याने बनसोडे यांनी वरील दोघांविरोधात म्हसवड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे, सदर गुन्हा दाखल होताच म्हसवड पोलीसांनी मंगेश भागवत यास त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेत त्यास म्हसवड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने भागवत यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याची मुदत दि.२१ रोजी संपल्याने पोलीसांनी आज पुन्हा त्यास न्यायालयासमोर हजर करीत याप्रकणी अन्य एक सहकारी फरार असल्याचे सांगत भागवत याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळण्याची वविनंती न्यायालयाकडे केली असता न्यायालयाने भागवत यास आणखी ३ दिवसांची दि.२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान याप्रकरणी ज्यांची फसवणुक झाली आहे त्यांनी म्हसवड पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन स.पो.नि. बाराजदार यांनी केले आहे.

औंध भूषण पुरस्कार हा मी माझ्या आई वडिलांना तर औंध जनतेस समर्पित करतो – मेजर धनाजी आमले

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

औंध : औंध भूषण हा पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना तर औंध जनतेस समर्पित करतो असे मत औंध गावाचे युवा नेते मेजर धनाजी आमले यांनी व्यकत केले आहे .मागील 4 दिवसापूर्वी मला हर्षिताराजे पंतप्रतिनिधी प्रतिष्ठान औंध यांच्या मार्फत औंध भूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आई-वडिलांचे इतर समाजातील लोकांशी खूप आपुलकीचे संबंध होते. संपूर्ण जनतेचा आशीर्वाद व प्रेम हे आधीपासूनच माझ्या कुटुंबावर आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा समाजात काम करत असताना कधीही कोणताही भेदभाव केलेला नाही. माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे मला खूप काही शिकायला मिळाले . मी सैन्यात असताना सुद्धा मला चीफ ऑफ द आर्मी स्टाफ सेना अध्यक्ष यांच्याकडून प्रशंसा पत्रक मेडल मिळाले होते . माझी सैन्य दलातील असणारी मेहनत प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता आणि देशसेवा याची दखल घेतच हे मेडल मला मिळाले होते. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यानंतर मी माझ्या गावात समाज कार्य करत आहे याचीच दखल घेत मला औंध भूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे माझ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजपर्यंत केली देश सेवा आता इथून पुढे फक्त जनसेवा हा मंत्र घेऊन मी आता काम करणार आहे. असे मत मेजर धनाजी आमले यांनी मांडून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!