मुरुम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब मुरुम सिटी, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर शाळेत महिला-पुरूष व विद्यार्थ्यांची सर्वरोग निदान आरोग्य शिबिर रोटरी डे व महाशिवराञीचे औचित्य साधुन गुरुवार (ता. २७) रोजी घेण्यात आले. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांच्या हस्ते डाॅ. तेजस्वीनी सोनवणे, डाॅ. सागर काबरा, डाॅ. गिरिष मिनियार, मुख्याध्यापक बाबुराव पवार यांच्या उपस्थितीत दंतचिकित्साचे प्रात्यक्षिक करुन करण्यात आले. यावेळी नागरिक, विद्यार्थी यांची तपासणी करुन औषधे देण्यात आली. रोटरीचे संतोष कांबळे, प्रा. डाॅ. अप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. राजकुमार वाकडे, कलप्पा पाटील, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, वैष्णवी शिंदे, शिक्षक सुनिता खंडागळे, तानाजी बिराजदार आदींनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे लाडु वाटप करून संध्या पुजारी यांनी अभार मानले.
फोटो ओळ : आनंदनगर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत सर्व रोग निदान शिबिराप्रसंगी डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करताना रुग्ण व अन्य.
पहाटे साडेसहा वाजेपर्यंत दर्शनरांगेतून सुमारे दीड लाख भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे साडेसहा वाजता पुन्हा सालकऱ्यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून, संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.परंपरागत प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी उरकून दरवर्षी हे भुयार स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. दरम्यान ,चालू वर्षी या भुयारात एक सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवून हत्ती मंडपातील स्क्रीनवर भुयारातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांना घेता आला,यामुळे तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले. वयोवृद्ध,लहान मुले,आजारीअसणारे यांना भुयारात जाता येत नसल्याने ते भाविक या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनापासून वंचित राहतात,त्यांची सोय झाल्याने यावेळी तमाम भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी देवस्थान ट्रस्ट व पोलिस स्टेशन यांचेकडून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व प्रकारे खबरदारी घेण्यात आली,जेणेकरून तमाम भाविकांची स्वयंभू शिवलिंगाच्या सुलभ दर्शनाची उत्तम सोय झाली…..
म्हसवड (प्रतिनिधी )एल. के. सरतापे… अज्ञात चोरट्यांनी म्हसवड येथील शिक्षक काॅलनी परिसरातील ६ बंद घराचे कुलुपे तोडून घरफोडी केली आहे. यामुळे नुतन पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे.
म्हसवड शहरा लगत असलेल्या शिक्षक काॅलनी या परिसरात उच्चभ्रु ,नोकरदार, व सोने चांदीचे व्यवसायिक मंडळी वास्तव्य करणाऱ्या ची संख्या जास्त प्रमाणात आहे. काल दि.२६ रोजी बुधवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने या परिसरातील अनेक कुटुंबे परगावी गेले होते. काही लोक मुंबई, व कुंभमेळा याठिकाणी घरांना कुलूप लावून गेली होती . बुधवार व मंगळवारी रात्री चोरट्यांनी या परिसरातील कुलूप बंद घरांना लक्ष करून चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने चांदीच्या वस्तूसह काही रुपयांची चोरी केल्याची घटना म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली . परंतु चोरी बाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी नागरीक पुढे आले नाहीत. या चोरट्यांना पाठीशी कोण घालण्याचा प्रयत्न करतयं याबाबत चर्चा सुरू आहे.
याबाबात अधिक माहिती अशी, कि,म्हसवड पोलिस स्टेशन पासून दिडशे मीटर अंतरावर असलेल्या शिक्षक काॅलनीच्या मागील बाजूस असलेल्या एका बिल्डिंग मध्ये चार कुंटुबे राहतात. एक प्राथमिक शिक्षण विभागात काम करतात ,दुसरे रयत शिक्षण संस्थे मध्ये प्राध्यापक आहेत . ते १५ दिवस कुंटुबासह प्रयागराज, दिल्ली आदी ठिकाणी गेले आहेत. तर तिसरे घर मालक ते मुंबई येथे आपल्या मुलाकडे गेले होते. या बंद असलेल्या घरांची चोरट्यांनी कुलपे तोडून घरात प्रवेश करुन सामानाची उलथा पालथ केली. या ठिकाणी दोन्ही नोकरदार मंडळी असल्याने चोरट्यांनी घरे फोडली. यामध्ये चांदीचे पैंजन,सोन्याचे दागिने चोरले , मात्र लॅपटॉप, प्रिन्टर, टिव्ही आदी वस्तूला हात ही चोरट्यांनी लावला नाही . तर प्राध्यापक यांच्या घरातून काही रोख रक्कम गेली आहे. मुंबई येथे गेलेल्या वृध्द दाम्पत्याच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते .तर शिक्षक काॅलनी मधील ओतारी, टॉवर या बिल्डिंग मधे भाड्याने राहत असलेले पशुवैद्यकीय डाॅक्टर यांचे हि बंद घर फोडून सोने चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या तर शिक्षक काॅलनी शेजारील काळा पट्टा नावाच्या शिवारात सातारा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात नोकरीला असलेल्या व सातारा येथे राहत असलेला बंगला चोरट्यांनी फोडला. त्याच्या हि घरातील किरकोळ वस्तू चोरीला गेल्या तर सहावी चोरी याच वस्तीवर एस टी महामंडळातुन निवृत्त झालेले व सध्या मुलाकडे मुंबई गेले होते. त्यांचा सुध्दा बंगला चोरट्यांनी फोडला. या सहा ठिकाणी कुलूप बंद बंगला चोरट्यांनी फोडला. मात्र या सहा घर फोडी बाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कसलीच कल्पना नाही . ज्यांची घरे फुटली त्यांनी व शेजारी राहणाऱ्यानी या बाबत चोरीची तक्रार दिली नाही. या मागील नक्की कारण काय ? लोक चोरी झाले नंतर गुन्हे दाखल करण्यास गेल्यावर नागरिकांना त्रास दिला जात असल्याने तक्रार दाखल करण्यासाठी नागरीक पुढे येत नाहीत, अशी चर्चा आहे.? या मागील खरी वस्तुस्थिती काय याचा शोध नव्याने हजर झालेले अक्षय सोनवणे घेणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सपोनि अक्षय सोनवणे यांना नवे आव्हान?
म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि सखाराम बिराजदार यांची तडकाफडकी म्हसवड वरुन सातारा येथे बदली झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तर दहिवडी पोलिस ठाण्याचे दबंग अधिकारी म्हणून असलेले अक्षय सोनवणे याचा दहिवडी येथील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अनेक महिन्यापासून म्हसवड येथे बंदली होणार अशी चर्चा होती.
ती खरी ठरली आहे .म्हसवड पोलिस ठाण्याचा भार अक्षय सोनवणे पेलणार का ?
मंगळवारी एका रात्रीत सहा बंगले चोरट्यांनी फोडले याचे या परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे जाताना दिसत आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेज मधील चोरट्या पर्यंत म्हसवड पोलिस पोचणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे? ……
(साळुंखे )यांनी अपार मेहनत, व अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Town Planning Officer)
या पदावर राज्यात चौथ्या क्रमांकाने घवघवीत यश मिळवले आहे.श्रीधर चे शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा भाटकी तर माध्यमिक शिक्षण क्रांतिवीर हायस्कूल म्हसवड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील A.I.S.S.M.S इंजिनियरिंग कॉलेज येथे झाले . सध्या श्रीधर भोपाळ
(एम. पी) येथे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये एम. टेक चे शिक्षण घेत आहे.श्रीधर ने परिस्थितीवर मात करून घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याच्यावर सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सातारा दि: सातारा जिल्हा धनुर्विद्या संघटना व शिवांतीका आर्चर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा सातारा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीच्या कुमारी नारायणी संजय जाधव हिने रिकर्व या प्रकारात चमकदार कामगिरी करत दि २८ फेब्रुवारी रोजी डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्य अजिंक्य पद स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. कुमारी नारायणी जाधव हिने आर्चरी या खेळासाठी दृष्टी आर्चरी अकॅडमीचे प्रवीण सावंत, सहाय्यक मार्गदर्शक शिरीष ननवरे व सायली मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एन पवार , वर्ग शिक्षिका पाटील मॅडम व क्रीडा शिक्षक गोकुंडे सर यांनी कौतुक केले. तिचे मूळ गाव गोवे तालुका जिल्हा सातारा हे आहे. तिच्या या यशाबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
औंध : ऐतिहासिक खटाव तालुक्यातील औंध गावच्या दक्षिणेस श्री केदारेश्वर महादेवाचे देवालय आहे. महाशिवरात्रीनिमित्त औंध तसेच औंध परिसरातील भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे तिथे दिसून आले. हे मंदिर खूप जुने असून कमीत कमी 600 ते 700 वर्ष या मंदिरास झाले असावेत असा अंदाज वर्तवला जातो. 1768 साली श्री केदारेश्वर महादेवाचे देवालय अगदी जीर्ण झाल्याने श्रीमंत परशुराम पंतप्रतिनिधी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आज महाशिवरात्रीचा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भाविकांमध्ये भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. औंध मधील पुजारी ओंकार आनंदराव गुरव हे केदारेश्वर महादेवाची पूजा ही सकाळी मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने करतात. त्यानंतर दिवसभरामध्ये भाविकांचे अभिषेक घालण्यात येतात. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले असते त्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारात संपूर्ण औंध गावातून श्री केदारेश्वर महादेवाचे पालखीचे आयोजन करण्यात आलेले असते. त्यानंतर देवाची पाकाळणी करून संध्याकाळी दहाच्या सुमारास भजनाचे सुद्धा आयोजन केलेले असते दुसऱ्या दिवशी देवस्थान तसेच गाव वर्गणीतून भक्तांसाठी खीर वाटपाचे आयोजन करण्यात येते.
.. मुरूम, ता. २५ (प्रतिनिधी) : देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी नवनवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाची ही प्रगती होते. सध्या पेट्रोल, डिझेल हे अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी केले. मुरूम ता. उमरगा येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे बसवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे सीनियर सेल्स मॅनेजर शाश्वत शर्मा, संस्कार गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सचिन राजनाळे, विश्वनाथ मुदकण्णा, अंकुश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, मुरूम हे शहर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे इथल्या ग्राहकांची सेवाच होणार आहे. हा व्यवसाय करताना आपण त्यात शुद्धता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या भागात शेतकरी वर्ग मोठा असून शेतीतील बरीचशी कामे यंत्राद्वारे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही एक प्रकारे मदत या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होईल. पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, डॉ. नितीन डागा, शरणाप्पा मंगरूळे, श्रीशैल मंगरूळे, अजय औसेकर, प्राचार्य अशोक सपाटे, दत्ता चटगे, राजशेखर मुदकण्णा, संतोष चटगे आदि उपस्थित होते. किरण बरबडे, ओमकार पाटील, नाना बेंडकाळे, गणेश काबरा, गणेश अंबर, गुरु स्वामी, शरण बेळमगे, महेश पाटील, श्रीहरी पाटील, महादेव मेणसे व बरबडे परिवारातील सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज बरबडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार शितल राजनाळे यांनी मानले.
संत गाडगेबाबा जयंती दिनी गोरे व आदलिंगे यांचासत्यशोधक विवाह घडला, तो आदर्श सर्व समाजाने घ्यावा –डॉ.निकिताताई देशमुख
सांगोला /घेरडी . फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंती दिनी रविवार दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी दु.4.30 वाजता सांगोला परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह सोहळा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गोरे ,घेरडी यांच्या (स्वगृही) सत्यशोधक जयराम गोरे, आणि समाजसेवक उद्दव आदलिंगे यांची सत्यशोधिका पुजा आदलिंगे, यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पुरोगामी विचाराचे स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या सुनबाई व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ.निकिताताई देशमुख यांचे व अनेक मान्यवरांचे उपस्थितीत शानदार पणे प्रबोधन करीत मोफत संपन्न झाला. या प्रसंगी डॉ.निकिता देशमुख म्हणाले की आयुष्यभर जनजागृती करणारे लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ थोर संत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा , कर्मकांड व विज्ञानावर आधारित जनजागृती केली. असे समाज प्रबोधन करणारे महान संताचे जयंती दिनी गोरे आदलिंगे परिवाराने हा सोहळा आयोजित करून हे सर्व पहाण्याची व सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल परिवाराचे अभिनंदन करीत या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना याचा सार्थ अभिमान वाटतोय तर हा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असे मौलिक विचार देखील मांडले. या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे चे गायन केले . यावेळी वधू वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम डॉ.निकिताताई देशमुख ,बाळासाहेब ननावरे ,सोमनाथ राऊत यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले . तसेच वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना व निवेदिका सौ.मयुरी राऊत व विवाह सोहळा घडवून आणणरे सोमनाथ राऊत यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र देण्यात आले. या प्रसंगी वर्षाराणी गोरे यांनी Phd पूर्ण केली तसेच अश्विनी ,मनीषा ज्योती गोरे व सावित्री बोराडे यांनी पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतले म्हणून यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन डॉ.निकिता देशमुख यांचे हस्ते येथोचीत सन्मान केला तर हा सोहळा पाहून मनीषा ,अश्विनी ,ज्योती व सावित्री या उच्चशिक्षित मुलीनी आम्ही सत्यशोधक जीवनसाथी निवडून याच पद्धतीने विवाह करू असे सर्वासमक्ष मनोगत व्यक्त केल्याने या सोहळ्याची चांगलीच चर्चा परिसरात रंगली होती. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी फोन वरून व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आणि सोलापूरचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी शुभ संदेश व शुभ आशीर्वाद आवर्जून दिले.
प्रतिनिधी – चैतन्य काशिद महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी,ता.माण,जि.सातारा येथील निवासस्थानी येथे ठेवण्यात येणार आहे.बोराटवाडी येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार ,शेखर,कन्या सौ.सुरेखा,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. “कै. भगवानराव गोरे (दादा) यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”
पंढरपूर पोलीसांनी 6 लाखांचा गांजा पकडून आरोपी केले अटक, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची गांजा वाहतुकीवर पुन्हा धडाकेबाज कारवाई
पंढरपूर वार्ताहर पंढरपुर ३२ किलो गांजा व एक कार सह १४,४२,६८० रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला. अधिक माहिती अशी, दिनांक २३/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदार हे व्हिआयपी बंदोबस्ताचे अनुशंगाने पंढरपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपुर जाणारे रोडवरील लिंगायत स्मशानभुमी समोर रोडवर अंधारे जागेत एक पांढरे रंगाची हयुंडाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच १३ बीएन ९६२२ ही गाडी रात्रौ २०/४५ वा चे सुमारास संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली. सदर गाडीचा संशय आलेने संशयित गाडीस पोलीस स्टाफ यांनी गराडा घातला व गाडी चालकास व त्याचेसोबत मागील सीटवर गाडीत आणखीन तीन महिला बसलेल्या दिसल्या. सदर संशयितांकडे अधिकची चौकशी केली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये काही सिलबंद पॉकेट दिसली. सदर गाडीतील सिलबंद पाकीटे पाहता त्याचा उग्र व आंबट वास येत असलेने सदरची पांढरे रंगाची हयुंडाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच १३ बीएन ९६२२ ही गाडीसह संशयित तीन महिला व एक पुरुष यांना पुढील चौकशीकामी पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे आणुन अधिकची चौकशी केली असता सदर गाडीमध्ये तब्बल ३२.१३४ किलो ग्रॅम वजनाचा ६,४२,६८०/- रू किं.चा गांजा असलेने त्यांचेविरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं १२७/२०२५ एनडीपीएस कायदा कलम २० (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल केला असुन यामध्ये ०३ महिला व ०१ पुरुष आरोपीसह एकुण ०४ आरोपीं अटक केलेले आहेत
सदर आरोपींकडुन खालीलप्रमाणे मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
१) ६,४२,६८०/- रू. अंदाजे किंमतीचा प्रतिबंधित गांजा
३) ८,००,०००/- रू किं एक पांढरे रंगाची हयुंडाई कंपनीची आय २० गाडी नं एमएच १३
बीएन९६२२
एकुण १४,४२,६८०/- किंमतीचा मुददेमाल आरोपी व कार सह ताब्यात घेतला.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी साो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितमकुमार यावलकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. डॉ. अर्जुन भोसले सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके साो, यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे, श्रेणी. पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, कल्याण ढवणे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोकॉ शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, मपोका रेश्मा सांगोलकर सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे तसेच पुढील तपास सपोनि श्री. भारत वाघे हे करीत आहेत.