Advertisement

युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला

युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला


मुरुम प्रतिनीधी-
युवकांनी इतर कौशल्यासोबतच डिजिटल साक्षर असणे ही आज काळाची गरज असुन त्यासाठी शासन सुद्धा अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. विद्यार्थ्यांनी अशा योजनाचा लाभ घेऊन स्वतः साक्षर होणे हि काळाची गरज़ असल्याचे मत मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांनी व्यक्त केले.
श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा
राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर जकेकुरवाडी येथे चालू असून या गुरूवारी (ता.१६) शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.युसुफ मुल्ला यांनी “डिजिटल लिटरसी ही काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तंटामुक्त समितीचे सदस्य तानाजी पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.गिरीधर सोमवंशी, डॉ.भरत शेळके, प्रा. मुरलीधर जाधव, प्रा.डी.डी पांढरे, प्रा.एम.डी.गायकवाड डॉ. व्ही. एम.गायकवाड,डॉ. एस. एल राठोड,डॉ आर. एम. सूर्यवंशी प्रा. एस आर. चव्हान,प्रा.विजय पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. मुल्ला म्हणाले की,
आज संगणकाने माणसाचे सारे जीवनच व्यापून टाकले आहे. पोस्ट सेवा, बँका, आणि विविध कार्यालयांतील सर्व कामे आत्ता संगणकाद्वारेच केली जातात. ग्राहकांच्या खात्यामध्ये किती ठेव शिल्लक आहे हे आत्ता एका क्लिकवर समजते. रेल्वे, विमाने, चित्रपट यांसारख्या तिकिटांचे आरक्षण संगणकाद्वारेच घरबसल्या करता येते. आजकाल सर्व महत्वाच्या परीक्षा या संगणकाद्वारेच घेतल्या जातात संगणकाद्वारे नोकरीबरोबरच कार्यालयातील कामे सुद्धा काही जन घरीच बसून करतात आणि इंटरनेट च्या मदतीने कार्यालयात पाठवतात असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भरत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन शेखर सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थित आमचे आभार अभिषेक मिसाळ यांनी मांडले.

औंध येथे बुधवारी भव्य बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री यमाई देवी ची यात्रा चालू आहे यात्रे दरम्यान यात्रा कमिटी दरवर्षी प्रमाणे गावा मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करत असते.
या वर्षी सुद्धा औंध यात्रा कमिटी च्या वतीने बुधवारी 22/1/2024 रोजी भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1 लाख तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 71हजार तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 51हजार तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 41 हजार,पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 31 तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 21 तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस 11 हजार आशी असतील.यावेळी प्रमुख उपस्थिती ही श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची आहे तर संपर्क प्रमुख म्हणून गणेश देशमुख, संतोष जायकर,बाबू माने,धनाजी यादव, धनाजी गायकवाड, महादेव माने, अनिकेत देशमुख तर शैलेश मिठारी पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी समलोचक म्हणून सुनील मोरे पेडगावकर असतील तर झेंडापंच म्हणून सोमनाथ जगदाळे असणार आहेत.तसेच मंडप साऊंड हा सोन्या गुरव चोराडे यांचा असणार आहे. ही स्पर्धा ही सरकारी मळा खरशिंगे रोड औंध येथे होणार आहे. मैदान सकाळी 8 वाजले पासून चालू होणार असून गाड्या या ऑनलाईन पद्धतीने नोंदवल्या जाणार आहेत. मैदानात एक ही गाडी नोंद केली जाणार नाही. तरी सर्व बैलगाडा मालकांना श्री यमाई देवी देवस्थान, समस्त ग्रामस्थ, शर्यत कमिटी औंध यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

शिवचरीत्र केवळ अभ्यासाचा विषय नसून आचरणाचा आहे-देशमुख

शिवचरीत्र केवळ अभ्यासाचा विषय नसून आचरणाचा आहे-देशमुख

पंढरपूर अर्बन बँकेच्या व्याख्यानमालेस प्रारंभ


पंढरपूर (वार्ताहर)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे केवळ ऐकण्याचा, अभ्यासाचा किंवा अभिमानाचा विषय नसून आजच्या युवकांनी याचे आचरण करण्याचा विषय आहे. महाराजांच्या एक एक घटना पाहिल्या तर यामधून याकाळात देखील जगण्याचा मंत्र मिळतो असे प्रतिपादन रायगड येथील प्रसिध्द शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले.
येथील दि पंढरपूर अर्बन को.ऑप.बँकेच्या वतीने आयोजित देशभक्त कै.बाबुराव जोशी व्याख्यानमालेस प्रारंभ झाला असून याच्या पहिल्या दिवशी देशमुख हे बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन सौ.सीमाताई प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तसेच बँकेचे अध्यक्ष सतीशजी मुळे, उपाध्यक्षा माधुरीताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.प्रशांत देशमुख यांनी आपल्या अतिशय ओघवत्या व उत्स्फुर्त शैलीमध्ये उठ युवका जागा हो शिवचरित्राचा तू धागा हो या विषयावर जवळपास दीड तास उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
यावेळी बोलताना देशमुख यांनी, छत्रपती शिवाजी महाराज हा आपला स्वाभिमान असून मराठी मातीचे महान सुपूत्र आहेत. महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग अतिशय विलक्षण असून यामधून मोठा संदेश मिळतो. जवळपास चारशे वर्षा नंतर देखील महाराजांनी दिलेली शिकवण, त्यांच्या आयुष्यात आलेले विविध प्रसंग पाहिल्यावर ते ज्या प्रमाणे वागले ते पाहून आजच्या काळात देखील कसे जगावे याची शिकवण मिळते असे प्रतिपादन केले. यासाठी देशमुख यांनी काही उदाहरण दिली. आजची पिढी लगेच हताश होते, टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. मात्र महाराजांनी मोठ्या कष्टाने राज्य मिळविले. मात्र मिर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबर झालेल्या तहात त्यांना आपले किल्ले व अनेक गोष्टींचा त्याग केला. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही, औरंगजेबाच्या कैद म्हणजे मृत्यू परंतु यावरही हुशारीने मात करून तेथून निसटले असे प्रसंग पाहिल्यावर संकटाला पाठ न दाखविता त्यावर मात करणे शिकवते. शत्रुच्या स्त्रीवर हात टाकणार्‍या आपल्या सरदाराला व पत्नीच्या भावाला देखील भर सभेत शिक्षा करून त्यांनी कायदा सर्वांना समान असल्याचा संदेश दिला. सुरते मध्ये विधवा स्त्रीच्या घराचे संरक्षण केले कारण तीचा पती वारला होताच परंतु तो दानधर्म करणार होता. यावरून चांगल्या कर्मावर त्यांचा विश्‍वास होता. सर्व जातीला बरोबर घेणारा, त्यांच्यातील गुणांना वाव देणारा हा राजा सर्वोत्तम नेता होता असे सांगून देशमुख यांनी केवळ घोषणाबाजी करून महाराज समजणार नाहीत यासाठी त्यांच्या शिकवणुकीचे आचरण करा असा सल्ला प्रशांत देशमुख यांनी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक हरिष ताठे यांनी, सूत्रसंचलन शांताराम कुलकर्णी यांनी तर आभार डॉ.संगिता पाटील यांनी मानले.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, बाजार समितीचे माजी सभापती दाजी भुसनर, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांतभैय्या देशमुख यांच्यासह पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग घंटी, विनायक हरिदास, अमित मांगले, गणेश शिंगण, मनोज सुरवसे, अनिल अभंगराव, गजेंद्र माने, तज्ज्ञ संचालक प्रभुलिंग भिंगे, उदय उत्पात, सोमनाथ होरणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!