Advertisement

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी


पंढरपूर, दि.04:- राज्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी करुन, पुरातत्त्व विभाग व संबधित कंत्राटदारानी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करवीत अशा सूचना यावेळी दिल्या तसेच सुरु असलेल्या कामांना उपलब्ध निधीची माहिती घेवून, उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासनस्तरावरुन तात्काळ येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री खांडेकर, प्र.तहसीलदार सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली.
000000000

लोणंद येथील प्रा. डाॅ.क्षितीज खरात यांना डॉक्टरेट.

लोणंद -दिलीपराव वाघमारे

लोणंद नगरीचे सुपुत्र, प्राध्यापक डॉ. क्षितिज राजाराम खरात यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून फिजिक्स विषयामध्ये Ph.D. ( Doctor of Philosophy) डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.

त्यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाचे मा.कुलगुरू यांच्या हस्ते आज डॉक्टरेट ही पदवी देवून त्यांचा गौरव करण्यात आला .

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र शुभेच्छा देवून कौतुक होत आहे .

त्यांनी लोणंद,कोल्हापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच मलकापूर येथे ते सध्या फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.

तसेच 28 वर्ष ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा व त्यांचे गुरूंचा खूप मोठा वाटा आहे .

तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अभय शिंदे


▪️ खटाव तालुक्याची कार्यकरणी जाहीर


वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज : खटाव तालुक्यातील तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी अभय शिंदे , उपाध्यक्षपदी सचिन जाधव , कार्याध्यक्ष गौरव खटावकर तर सरचिटणीस पदी गणेश पिसे यांची निवड झाली .
या निवडी दरम्यान तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे , सेवानिवृत नायब तहसिलदार कमलाकर भादुले , जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती .
‌ याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे म्हणाले की ‘ , सद्यस्थितीतील कामाचा अतिरिक्त ताण व धगधगते जीवन यासाठी संघटना मजबूत असणे काळाची गरज आहे . येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा पातळी वरून योग्य ती दखल घेत राज्य पातळीवर समन्वय साधला जाईल .
यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिंदे म्हणाले की जिल्हा कार्यकरणी व सहकार्याना सोबत घेऊन या पदाला न्याय देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत .
खटाव तालुका तलाठी संघटेनेच्या जाहीर झालेल्या निवडी बद्दल प्रातांधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने यांच्यासह महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले .

फोटो: तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अभय शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे व इतर ( विनोद लोहार)

महाराष्ट्रात नासप च्या सहकार्याने विचाराने काम करणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे

समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय:


अमरावती:
आ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे यांनी समाजाच्या विकासासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. पारंपरिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

भास्करराव टोम्पे यांची सर्वसंमतीने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नुकत्याच झालेल्या उजंबवाडीत महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून 18 राज्यांमध्ये तो कार्यरत आहे. 2027 पर्यंत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या वेळी नामदेव समाजोन्नती परिषदचे सरचिटणीस डॉक्टर अजय फुटाणे, सातारा जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे केशवराज संस्था अध्यक्ष बाळ आंबेकर सहचिटणीस शित्रे, पुणे सरचिटणीस सुभाष मुळे पिंपरी चिंचवड अध्यक्ष एकनाथ सदावर्ते प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे यांचेसह अठरा राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते

टोम्पे यांनी संत नामदेव महाराजांचे योगदान अधोरेखित करत पंढरपूर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त केला. सरकारने या स्मारकासाठी कोठ्यावधी रुपये मंजूर केले असून लवकरच यासाठी प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाचा विकास व धोरणात्मक मागण्या:
समाजातील 90 टक्के लोक गरीबीरेषेखाली असून त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये 2 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी टोम्पे यांनी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसारखे उपक्रम राबवून त्यांनी समाजाला प्रोत्साहन दिले आहे.

यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुमारे एक लाख प्रतिनिधी सहभागी होतील. समाजातील तरुण आणि महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.

टोम्पे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समाजाच्या समस्या मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय स्तरावर समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

टोम्पे म्हणाले, “एकात्मतेत मोठी ताकद आहे. समाज एकत्र येऊनच पुढे जाईल.” त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देत महिला, विधवा, विधुर आणि घटस्फोटितांसाठी सामूहिक विवाह परिषदा घेतल्या आहेत.

महाराष्ट्रात नासप चे सहकार्याने विचाराने काम करणार असल्याचे सांगून …सातारा जिल्ह्यातील इंजि सुनील पोरे यांनी केलेले कामाची भास्करराव टोम्पे यांनी प्रशसा केली

भास्करराव टोम्पे यांच्या नेतृत्वाखाली आभा नामदेव क्षत्रिय महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शैक्षणिक परिवर्तनाचा पाया सावित्रीबाईंनी घातला-सुलोचना बाबर


म्हसवड.. प्रतिनिधी
तत्कालीन वेळी समाज अज्ञानरूपी अंधारात असताना सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया घातल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बालिका दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सुलोचना बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बाबर म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मोहीम रुजवली. समाजातील विकृत प्रवृत्तीने अनेक वेळा सावित्रीबाईंना अपमानित केले , मात्र त्या डगमगल्या नाहीत. शिक्षण हेच प्रगतीचे साधन असल्याने, सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाची गरज ओळखली व त्याद्वारे प्रगतीचे पाऊल टाकले. या निमित्ताने सुलोचना बाबर यांनी सावित्रीबाईंच्या जीवन पटाची तपशीलवारपणे माहिती उपस्थितताना देऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने पुनम जाधव , प्रांजल लुबाळ , समीक्षा बारवासे यांनी मनोगत केले तर मोहिनी राजगे हिने सावित्रीच्या ओव्या कथन केल्या. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन रोहिणी काटकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साधना दुधाळ यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!