▪️ खटाव तालुक्याची कार्यकरणी जाहीर
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज : खटाव तालुक्यातील तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी अभय शिंदे , उपाध्यक्षपदी सचिन जाधव , कार्याध्यक्ष गौरव खटावकर तर सरचिटणीस पदी गणेश पिसे यांची निवड झाली .
या निवडी दरम्यान तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे , सेवानिवृत नायब तहसिलदार कमलाकर भादुले , जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे म्हणाले की ‘ , सद्यस्थितीतील कामाचा अतिरिक्त ताण व धगधगते जीवन यासाठी संघटना मजबूत असणे काळाची गरज आहे . येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा पातळी वरून योग्य ती दखल घेत राज्य पातळीवर समन्वय साधला जाईल .
यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिंदे म्हणाले की जिल्हा कार्यकरणी व सहकार्याना सोबत घेऊन या पदाला न्याय देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत .
खटाव तालुका तलाठी संघटेनेच्या जाहीर झालेल्या निवडी बद्दल प्रातांधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने यांच्यासह महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी अभिनंदन केले .

फोटो: तलाठी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अभय शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे व इतर ( विनोद लोहार)