Advertisement

महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे तेवत ठेवावा.-प्रा. डॉ. महेश मोटे

मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : माझ्या राज्यात माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे, यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना पराक्रमी राजा बनविण्यासाठीचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी दिले. कर्तव्य, निष्ठा आणि शौर्य यांच्या जोरावरच समाजाला नवीन दिशा देता येते यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. तरुणांना जीवनाचे उद्दिष्ट कसे असावे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांनी दिली म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्हीही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे तेवत ठेवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी (ता. १२) रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश मोटे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल पाटील होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डी. डी. गव्हाणे म्हणाले की, मराठा सेवा संघाच्या वतीने शहरात सर्वच महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन सामाजिक सलोख्याच्या अनुषंगाने सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन राबवली जातात, हे कौतुकास्पद आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यास मदत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी. डी. गव्हाणे, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरूळे, माजी नगरसेवक अजित चौधरी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भगत माळी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, भाजप नेते अरविंद फुगटे, सुधीर चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राहुल वाघ, धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब भालकाटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. दत्तात्रय इंगळे, भगत माळी, अजित चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रवींद्र जाधव, संदीप जाधव, संदीप बाबळसुरे, गोपाळ इंगोले, भरत होनाळे, अंकुश शिंदे, किशोर शिंदे, आकाश धर्माधिकारी, प्रतीक राठोड, महेश शिंदे, सुनील निलवडे, आकाश क्षीरसागर, श्रावण इंगळे, पिंटू बेंडकाळे, लखन भोसले, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष श्रीधर इंगळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मोहन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश शिंदे तर आभार सिद्धलिंग हिरेमठ यांनी मानले. यावेळी शहरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शिवाजी चौकात महापुरुषांच्या जयंती प्रसंगी अभिवादन करताना सर्व मान्यवर, पदाधिकारी व अन्य.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ॲड शिवाजी कांबळे


सोलापूर प्रतिनिधी -सोलापूर येथील महात्मा फुले निसर्ग सानिध्य प्रतिष्ठान रजि.संस्था सोलापूर या संस्थेची संलग्नीत असलेल्या आरटीई कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटना सोलापूर या महाराष्ट्रातील पहिल्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ॲड. शिवाजी कांबळे यांची निवड झाली आहे. सोलापुरातील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटाचे) प्रदेश चिटणीस व आर.टी.ई.कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांत (बापू) कांबळे यांच्या हस्ते ॲड.शिवाजी कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले
यावेळी समाजातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थिती होते.
महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी माध्यम व खाजगी संस्थेतील शाळेमध्ये आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दलित, आदिवासी वंचित समाजातील विद्यार्थ्यांना इतर श्रीमंत कुटुंबातील मुलांप्रमाणे चांगले शिक्षण मिळावे व पुढील उच्च शिक्षण सुध्दा नामांकित विद्यापीठातून घेता यावे,तसेच उच्च शाळेतील शिक्षणही मोफत मिळावे व त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावावा या उद्देशाने आरटीई कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटना सोलापूर या पहिल्या संघटनेची स्थापना सोलापुरात करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून विविध समाजातील विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींना आरटीई कायद्याअंतर्गत मोफत प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन दिले जाणार आहे व प्रवेशातील येणाऱ्या विविध अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे मत नूतन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी कांबळे यांनी निवडीनंतर सांगितले.
तसेच या संस्थेमार्फत जाहीर आव्हान करण्यात आले की ज्या विद्यार्थ्यांना आरटीई द्वारे शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना या संस्थेमार्फत शालेय प्रवेशा संदर्भात मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे तरी त्यांनी १) श्री शशिकांत (बापू) कांबळे (संस्थापक,अध्यक्ष) ९८५०५६६००७, २) ॲड शिवाजी कांबळे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)९९२२२४६१२३ या फोन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत केले आहे.

अखिल भारतीय संत नामदेव एक संघाची स्थापना

पंढरपूर प्रतिनिधी

समस्त शिंपी समाजाच्या एकत्रीकरणासाठी अखिल भारतीय संत नामदेव एक संघाची स्थापना संपूर्ण महाराष्ट्रातील शिंपी समाजातील सर्व पोट जातींना एका छताखाली एका मंचावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष ॲड.महेश ढवळे यांनी जे सहकार्य ,परिश्रम व संकल्प केले असून गेल्या 2 वर्षभरामध्ये त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे . यासाठी अजून जोमाने कार्य करण्यासाठी व महाराष्ट्राच्या समस्त शिंपी समाजाच्या तळागाळातील बांधवांसाठी सामाजिक शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय व समाजातील समाज मंदिर जीर्णद्धाराच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा, कोकण ,मुंबई ,उत्तर महाराष्ट्र , खान्देश ,विदर्भ, या भागातील समाजातील नामदेव ,अहिर, वैष्णव ,माहेश्वरी ,भावसार, मेरू, तेलगू या पोटजातीतील सर्व समाज बांधवांना एकाच छत्रछायेखाली व एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प नुकताच मुंबई येथे संत नामदेव महाराजांचे 16 वे व 17 वे वंशज ह भ प मुकुंद महाराज ह भ प ज्ञानेश्वर व निवृत्ती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संत नामदेव महाराज स्मारक व केशवराई मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिंपी समाजातील प्रलंबित विषयांना त्यांना देण्यासाठी आगामी जुलै महिन्यात संत नामदेव महाराजांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळा भव्य प्रमाणात घेण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला व हा कार्यक्रम भारतातील सर्व समाज बांधवांना बोलवून भव्य करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त करण्यात आला या संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना एका बॅनरखाली आणण्यासाठी अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ या माध्यमातून कार्य करण्याचे ठरले व याची घोषणा संत नामदेव महाराजांचे वंशज यांनी केली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक माजी राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर, ज्येष्ठविधीतज्ञ अजय तलवार ,केशवराव संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके, सचिव धनंजय जंवजाळ, पंढरपूर समाज अध्यक्ष गणेश उंडाळे,तसेच महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले मनोज भंडारकर जळगाव, नितीन बाविस्कर शिरपूर गजेंद्र शिंपी नंदुरबार, अशोक खैरनार मुंबई, रुपेश बागुल, मालेगाव कोल्हापूर पुणे येथील समाज बांधव,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी लाल किल्ला दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्राच्या लोकनृत्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 18 वर्षाच्या पुढील मुलांमधे शिवम विष्णू इंगळे याची निवड झाली आहे
‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’ यांच्या सहाय्याने 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवण्यासाठी कलावंत म्हणून शिवम विष्णू इंगळे याची निवड झाली आहे.यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून सातारा जिल्ह्यातून औंध ता.जि.सातारा येथील रहिवाशी आहे.त्याच्या या निवडीबद्दल सातारकर व औंध ग्रामस्थांनी शिवमचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
या कोळी नृत्यामध्ये असलेली शिवम विष्णू इंगळे हा 29 डिसेंबर 2024 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सतत सराव करीत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतः ची छाप पाडण्यासाठी मिळालेल्या संधीबाबत या कलाकारावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा गावाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. शिवम इंगळे सुरुवातीपासूनच सांस्कृतिक विभागात नेहमीच कलागुणांना वाव देऊन सतत यश संपादन केले आहे.या शिवमला आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली आहे.या गौरवपूर्ण प्रसंगाने शिवमचा नावलौकिक वाढला असून त्याला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे वडील श्री विष्णू इंगळे व आई राणी विष्णू इंगळे यांचे सुरुवातीपासूनच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.त्याचबरोबर त्याची पत्नी पायल शिवम इंगळे यांनी शिवमच्या कलेला खूप मोठा पाठिंबा आहे.सुरुवातीपासूनच नृत्य ,गायन,चित्रकला,रांगोळी आंतरराषट्रीय, राष्ट्रीय, फेस्टिवल इत्यादी क्षेत्रात – तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर नेहमी नेहमी यश संपादन केले आहे.शिवम हा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आहे तसेच त्याच्या नावाने २६ तास सलग नृत्याचा वर्ल्ड रेकॉर्ड (विश्वविक्रम)आहे. अनेक पुरस्कारांचा मानकरी देखील आहे.त्याने आपली गुणवत्ता उत्कृष्टपणे टिकवून ठेवण्यात यशस्वीपणे भूमिका पार पाडली आहे.

दहिवडी शहर मराठी पत्रकार संघेटनेच्या अध्यक्ष पदी राजेश इनामदार, उपाध्यक्ष पदी अजित कुंभार

दहिवडी वार्ताहर..
दहिवडी शहर मराठी पत्रकार संघेटनेच्या अध्यक्ष पदी दैनिक पुढारी चे माण तालुका प्रतिनिधी राजेश इनामदार यांची तर कार्याध्यक्ष पदी माणदेश भूषण चे संपादक अजित कुंभार यांची निवड

कुकुड वाड प्रतिनिधी : जयराम शिंदे
दहिवडी येथे झालेल्या बैठकीत दहिवडी पत्रकार संघटनेच्या निवडी पार पडल्या. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे व राज्याच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करणार असून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.त्याच बरोबर जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून विशाल गुंजवटे यांची,
संघटनेच्या उपाध्यक्ष पदी जयराम शिंदे,सचिव पदी चैतन्य काशीद, यांची तर खजिनदार म्हणून दिलीपराव माळवदे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून विजय ढालपे, योगेश गायकवाड, नितीन पुकळे,निशांत बोराटे,आत्माराम शिंगाडे यांची निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांचे ना.जयकुमार गोरे राज्याचे अध्यक्ष हरीश पाटणे सर व माण तालुक्यातील राजकीय,शासकीय,सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून, फोनवर,सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

म्हसवड शहरातील सार्वजनिक शौच्छालयांची दुरावस्थानागरीकांना नाक दाबुन बुक्क्यांचा मार





म्हसवड दि. १२
स्वच्छ शहर, सुंदर शहर असे बिरुद डोक्यावर घेवुन स्वच्छतेचा डंका जिल्हाभर पिटणार्या म्हसवड नगरपालिकेच्या सार्वजनिक शौच्छालयाची दुरावस्था पाहता याठिकाणी नक्की प्रशासन वा स्वच्छता विभाग कार्यरत आहे का हा प्रश्न सर्वांनाच पडल्याशिवाय राहत नसुन शहर स्वच्छतेविषयी पालिका प्रशासनाची उदासिनदा का ? असा प्रश्न सर्वसामान्य म्हसवडकरांना पडलेला आहे.
शहर स्वच्छतेचा डांगोरा पिटणार्या म्हसवड पालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी प्रतिमहिना लाखो रुपयांचा ठेका दिलेला असला तरी शहरातील मुख्य रस्ते वगळता इतर ठिकाणच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत, तर शहरातील सार्वजनिक शौच्छालयातील अवस्था ही न सांगण्यासारखीच आहे, येथे शौच्छविधीस गेलेली व्यक्ती ही व्यवस्थित बाहेर येईल याची शाश्वती नाही, ती व्यक्ती या शौच्छालयात गेल्यास ती त्याच ठिकाणी बेशुध्द होवुन पडेल की काय अशी अवस्था आहे. सार्वजनिक शौच्छालयात साफ सफाई केली जाते की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
सार्वजनिक शौच्छालयात पाणी नाही तर दरवाजेही नाही त्यामुळे शौच्छालयात बसणार्यास उघड्यावर शौच्छविधीस बसल्याचा प्रत्यय येतो. यापुर्वी उघड्यावर शौच्छविधीस बसणार्यावर पालिकेकडुन दंडात्मक कारवाई केली जात होती. आता नागरीकांमध्ये याबाबत चांगलीच जागृती झाल्याने पालिका हद्दीत घरोघरी शौच्छालये निर्माण झाली आहेत त्यामुळे सार्वजनिक शौच्छालयात जाणारे घटक हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, हा घटक जरी दुर्बल असला तरी हा घटक सुध्दा शहराचा नागरिक आहे, तो वर्ग ही पालिकेचा करदाता आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना सोयी सुविधा देणे हे पालिकेचे कर्तव्यच आहे. मात्र याच कर्तव्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सार्वजनिक शौच्छालयात जाणारा सामान्य व्यक्ती असल्यानेच पालिका त्यांच्या बाबतीत गंभीर नाही का ? असा सवाल ही या वर्गातुन विचारला जात आहे.
पालिका दर महा शहर स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करीत असली तरी ही स्वच्छता नेमकी कोठे व कोणाची केली जाते हा प्रश्न येथील चित्र पाहिल्यास निर्माण होत आहे. पालिका हद्दीतील सर्वच सार्वजनिक शौच्छालयाची अतिशय दैयनिय अवस्था झाली असुन ही अवस्था केवळ पालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षा मुळे झाली आहे. नागरीकांकडुन पालिका जसा कर घेते तसे नागरीकांना सुविधा ही देणे ही बंधनकारकर आहे, मात्र सामान्यांच्या सुविधेकडे कोण लक्ष देणार, अशा सार्वजनिक ठिकाणी ना राजकिय नेते, ना प्रशासकीय अधिकारी शौच्छास जात नसल्यानेच याठिकाणच्या अडचणी, येथे जाणार्यांची घुसमट त्यांच्या लक्षात येत नाही. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवुन नागरीकांचे आरोग्य बिघडणार‌ नाही याची खबरदारी घेवुन नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी जोरदार मागणी म्हसवडकर नागरीकांतुन होत आहे.

पालिका विरोधात आंदोलन करणार – माजी उपनगराध्यक्ष सरतापे –
म्हसवड शहरातील नागरीक हे खुप सोशीक जरी असले तरी ते षंड नक्कीच नाहीत पालिका प्रशासनाने सार्वजनिक शौच्छालयाची अतिशय दैयनिय अवस्था असतानासुध्दा याकडे दुर्लक्ष करुन नागरीकांना एकप्रकारे वार्यावर सोडले आहे, पालिका प्रशासन हे बड्यांच्या मागेपुढे करीत असुन सामान्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे पालिका प्रशासनाने शहरातील सर्वच सार्वजनिक शौच्छालयाची स्वच्छता करुन त्याठिकाणी पाण्याची व दरवाजे बसवावेत अन्यथा आपण पालिका प्रशासनाच्या विरोधात २६ जानेवारी पासुन बेमुदत आंदोलन सुरु करु असा इशारा म्हसवड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी दिला आहे.

फोटो –

देवापूर च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: तात्यासाहेब औताडे


देवापूर सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड.

विशाल माने देवा पूर:

माण तालुक्यातील देवापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती माण किरण उदमले निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी सी.टी खाडे उपस्थित होते. तात्यासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करीत हलगीच्या निनादात ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन संपूर्ण गावात फटाक्याच्या आतषबाजी सवाद्य मिरवणूक काढली.देवापूर ग्रामस्थांनी सत्कार करुन आपला आनंद व्यक्त करत ग्राम विकासाची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच मंगला बाबासाहेब बनसोडे , उपसरपंच मंगला सयाजी चव्हाण , सदस्य शहाजी बाबर , तानुबाई बाबर , अलका चव्हाण , सविता बाबर , सुनिता कांबळे , निशिगंधा बनसोडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी व पंच क्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुक अनुषंगाने महिलांचाही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
माण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तात्यासाहेब औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच मंगला बनसोडे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सी.टी.खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी सरपंच पदासाठी तात्यासाहेब औताडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
तात्यासाहेब औताडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, आजी माजी चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्यावर राजकीय शैक्षणिक सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

        यावेळी सरपंचपदी निवड झाल्यानंतर तात्यासाहेब औताडे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले कि देवापूरच्या गावकऱ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन. माजी सरपंच शहाजी बाबर, मां. सरपंच मंगला बनसोडे व सदस्य, नागरिक यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेन. शासनाच्या विविध योजना आणून पारदर्शीपणे काम करून सर्वांना विश्वासात घेऊन ग्राम विकास अमलात आणेन. ऐतिहासिक, शैक्षणिक वारसा असणाऱ्या या गावांला विकासात्मक पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यानी सांगितले 
 यावेळी किसान काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष कृषी मित्र प्रा . विश्वंभर बाबर , माजी सरपंच शहाजी बाबर , लाडकी बहिण योजनेचे माण तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पुकळे , ॲड.  विठ्ठल वीरकर, विजयशेठ बनगर, निवृत्त ए. पी.आय रमेश लोखंडे सुलोचना बाबर , माजी सरपंच मंगल बनसोडे , बाबासाहेब बनसोडे , राजू माने पत्रकार विशाल माने यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल काटकर सर यांनी सुत्रसंचांलन केले . मोहन बाबर यांनी आभार मानले.
error: Content is protected !!