Advertisement

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते सिटी मॉल कापड दुकान शुभारंभ

म्हसवड येथे सिटी मॉल कापड दुकानाचे उद्घाटन

म्हसवड येथे सिटी मॉल या कापड दुकानाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि इंजि. सुनील पोरे (नासप जिल्हाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या व्यवसायाची स्थापना १९४० साली विजयशेठ चांडवले यांच्या आजोबांनी केली होती, आणि आता पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नासप राज्य अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ. अजय फुटाणे, नितीन दोशी, युवराज सुर्यवंशी, करण भैय्या पोरे, दत्ता भागवत, डॉ. दोलतडे, विक्रम जाधव, सौ. सुवर्णा पोरे, मॉडर्न स्कूलच्या पवार मॅडम, सदाशिव सावंत, नारायण मासाळ, नामदेव चांदवले तसेच पंचक्रोशीतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिटी मॉलमध्ये माल थेट फॅक्टरीकडून ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यामुळे ग्राहकांना किफायतशीर दरात चांगल्या प्रतीचे कापड मिळेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश म्हेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन सौ राणी चांडवले यांनी मानले

error: Content is protected !!