भोंदु बाबाच्या पोलीस कोठडीत वाढ
म्हसवड दि. २१
पैशाचा पाऊस पाडुन १० पट रक्कम करुन देण्याची बतावणी करुन आर्थिक फसवणुक करणार्या भोंदु बाबा मंगेश भागवत हा सध्या म्हसवड पोलीसांच्या कोठडीत असुन त्याचा अन्य एक सहकारी फरार असल्याने पोलीसांना त्याचा शोध घेण्यास आणखी थोडा वेळ मिळावा म्हणुन म्हसवड न्यायालयाने भागवत याच्या पोलीस कोठडीत वाढ करीत दि.२४ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.
म्हसवड येथील कांता बनसोडे यास १० पट रक्कम पैशाचा पाऊस पाडुन करुन देण्याचे आमिष दाखवत भोंदु बाबा मंगेश गौतम भागवत रा. कळस ता. इदापुर, जि. पुणे व त्याचा म्हसवड येथील सहकारी सर्जेराव वाघमारे यांनी ३६ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक करीत बनसोडे यांना १० पट रक्कम सोडाच पण त्यांनी दिलेली मुळ रक्कमही परत न दिल्याने बनसोडे यांनी वरील दोघांविरोधात म्हसवड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे, सदर गुन्हा दाखल होताच म्हसवड पोलीसांनी मंगेश भागवत यास त्याच्या राहत्या घरातुन ताब्यात घेत त्यास म्हसवड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने भागवत यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याची मुदत दि.२१ रोजी संपल्याने पोलीसांनी आज पुन्हा त्यास न्यायालयासमोर हजर करीत याप्रकणी अन्य एक सहकारी फरार असल्याचे सांगत भागवत याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळण्याची वविनंती न्यायालयाकडे केली असता न्यायालयाने भागवत यास आणखी ३ दिवसांची दि.२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान याप्रकरणी ज्यांची फसवणुक झाली आहे त्यांनी म्हसवड पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन स.पो.नि. बाराजदार यांनी केले आहे.
