प्रतिनिधी- विनोद लोहार
वडूज : येथील माधवनगर चे सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे यांचे बुधवारी रात्री देशसेवा बजावत असताना वयाच्या ४० व्या वर्षी अपघाती निधन झाले.
जवान चंद्रकांत काळे हे अठरा मराठा मराठा तोफखाना रेजिमेंट चे राजस्थान येथील महाजन फिल्ड फायरींग रेंज मध्ये युध्द अभ्यास ट्रेनिंग घेत असताना अपघाती निधन झाले. ते गेली अनेक वर्षे देश सेवेत रुजू होते . त्यांनी यापूर्वी पंजाब , लडाख, जम्मू काश्मीर, सतवारी, नवशेरा, सिकंदराबाद, डाबर तालबेहट, आवेरीपट्टी , अश्या विविध ठिकाणी देशसेवा बजावली होती. सध्या ते दिल्ली – मेरठ येथे अठरा रेजिमेंट मध्ये अटलरी डिपार्टमेंट मध्ये नाईक सुभेदार या पदावरती कार्यरत होते. चंद्रकांत यांचे प्राथमिक शिक्षण वडूज जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले.माध्यमिक शिक्षण घेत असताना शालेय एन.सी.सी. ग्रुपचे ते सीएचम होते. शैक्षणिक दशेपासूनच देशसेवेची आवड असणारे चंद्रकांत हे विविध मैदानी खेळात पारंगत होते.
त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
