
म्हसवड दि. १७
म्हसवड शहरात सध्या ऑनलाइन मोबाइल गेमचे पेव फुटले असुन या ऑनलाइन गेमद्वारे शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची वस्तुस्थिती आहे, दोन किंवा त्याहुन अधिक भिडु एकमेकांना कोठेही भेटले की त्यांच्यामध्ये लगेचच लुडो चा डाव सुरु होत असुन याद्वारे काहीजण मात्र भिके कंगाल झाले आहेत.
या गेमद्वारे काहीजण कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे, मात्र याकडे पोलीसांनीही काना डोळा केल्याने शहरातील अनेक गल्लीबोळात असे भिडु लुडोचा डाव टाकलेले आढळुन येतात. मोबाईल वर अँपद्वारे ही गेम डाऊनलोड केली जाते, त्यानंतर दोन किंवा त्याहुन अधिकजण या मध्ये सहभागी होवुन त्यावर पैशाचा पाऊस पाडला जातो. या मध्ये जो जिंकतो तो हसतो मात्र जो हरतो त्याची अवस्था धड सांगता येत नाही, सहनही होत नाही अशी होते. या गेमद्वारे अनेकजण कर्जबाजारी झाल्याचे चित्र असुन दिवसभर मोबाईलमध्ये डोकं घालुन ही गेम खेळणार्यांच्या डोळ्याला व मानेला त्रास होत असल्याचेही अनेकजण सांगत आहेत. लुडोचा हा प्रकार म्हणजे जुगारच असल्याचे बोलले जात असुन यातुन हजारो रुपयांची दररोज उलाढाल होत आहे. लुडो खेळणार्यां भिडोंचे अड्डे कोठे सुरु आहेत याची संपूर्ण माहिती पोलीसांना आहे, मात्र खेळणारे भिडोही पोलीसांचे भिडु असल्याने ते त्यांच्याकडे आजवर डोळे झाक करीत आले आहेत, त्यामुळे या खेळाचा प्रसार अधिक होवु लागला असुन अनेकजण यातुन कर्जबाजारी होत असल्याची वस्तु स्थिती आहे.
फोटो