माधवराव पाटील महाविद्यालयात व्याख्यानाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी 

Spread the love


मुरूम, ता. ६ (बातमीदार) :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी ( ता.६ ) रोजी व्याख्याने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबाद, मुरूम शहर पत्रकार संघ व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित, राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणी करते. असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुशिल मठपती, महेश निंबरगे, रवी अंबुसे, अमोल गायकवाड, विशाल देशमुख, जगदीश सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, नाहीरपाशा मासूलदार, हुसेन नुरसे, डॉ. शिला स्वामी, प्रा. नारायण सोलंकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. भीमाशंकर पांचाळ, योगेश पांचाळ, नामदेव भोसले, अमोल कटके, मनोज हावळे, किशोर कारभारी, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, महेश मोटे, सुधीर पंचगल्ले, महेश निंबरगे सह पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!