बालकांनी रेखाटलेल्या चित्रांचे व रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शनही संपन्न
गोंदवले. – (विजय ढालपे)

छाया – लोधवडे प्राथमिक शाळेच्या बाल बाजारातील ग्राहक आणि बाल विक्रेते ( विजय ढालपे )
आजच्या काळात शिक्षण आणि जीवन व्यवहार यांची सांगड निर्माण होणे गरजेचे आहे. शाळेत मिळविलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना त्याच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे.गणिती ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्य निर्माण करणे.विद्यार्थ्यांनाचे खरेदी विक्री व संवाद कौशल्य विकसीत करण्याच्या हेतूने सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या संकल्पनेतून बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्र व रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
लोधवडे प्राथमिक शाळेच्या बालबाजारात विद्यार्थी बालकांची एकूण ८० छोटी-मोठी दुकाने लावली होती, तर यामध्ये १५२ बालव्यापारी सहभागी झाले होते.या बालबाजारातून चांगल्या प्रकारची आर्थिक उलाढाल झाली.गावरान देशी वाणाच्या विविध पालेभाज्या,शेंगवर्गीय भाज्या,फळभाज्या,भोपळ्यांचे विविध प्रकार,तसेच देशी फळांमध्ये केळी,रामफळे,पेरू,बोरे व कवठ यांचाही यात समावेश होता, तर अंडी,कांदा,लसूण,लिंबे,मक्याची कणसे,मसाल्याचे पदार्थ,मेवा मिठाई,खवय्यांचे विविध खमंगदार चविष्ट पदार्थ,चहा कॉफी स्टॉल, गरमा-गरम भजी ,पॅटीस ओली-सुकी भेळ,शेंगदाणे लाडू ,चायनीज मंचुरीन तसेच अनेक प्रकारची सूपही विक्रीसाठी उपलब्ध होती.बुटी पार्लर व बेंटेक्स साहित्य आणि धूप अगरबत्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.त्याचबरोबर शहाळ्यांचे नारळ, लोधवडे गावचा प्रसिद्ध अस्सल स्वादिष्ट प्युअर खवा,बासुंदी आणि पेढ्यांची तर बालबाजारात विक्रमी विक्री झाली.लोधवडे बालबाजारात अनेक ग्राहकांनी मनपसंत मनमुराद असा खरेदीचा आनंद घेतला.याशिवाय यावेळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा व रांगोळ्यांचा मान्यवर,ग्राहक,पालक व ग्रामस्थांनी पाहण्याचा आनंदही घेतला.
बालबाजाराचे उदघाटन लोधवडे गावचे सरपंच मा.निवास काटकर यांचे शुभहस्ते करण्यात आले तर चित्र व रांगोळी प्रदर्शनच्या एका दालनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.कुंडलिक चोपडे यांचे शुभ हस्ते तर दुसऱ्या दालनाचे उदघाटन केंद्रप्रमुख मा.शोभा पवार यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या बालबाजाराला माण तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे यांनीही सदिच्छा भेट दिली.या कार्यक्रमावेळी अन्य मान्यवरांचा उपस्थितीमध्ये अशोक पवार,पोलीस पाटील अनिल लोखंडे,वैभव मोरे,उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे, वसंतराव कदम,राजकुमार माने,कुमार जाधव,रेश्मा शिलवंत,त्रिवेणी मोरे,तनुजा जगताप,शिवाजी मोरे,जयराम अवघडे,श्रीकांत कांबळे मुख्याध्यापक महादेव ननावरे,शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे,दिपाली फरांदे,संध्या पोळ,मनिषा घरडे व अश्विनी मगर हे सर्व उपस्थित राहून सक्रिय सहभागी झाले होते.या कार्यक्रमात सूत्र संचलन सतेशकुमार माळवे यांनी केले तर शेवटी आभार दिपक कदम यांनी मानले.