औंध प्रतिनिधि – ओंकार इंग्लै
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला संविधान दिले. संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार,महापुरुषांची विटंबना, संविधानाची विटंबना,हे सातत्याने घडत आहे. त्याच संविधानामुळेच नागरिकांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले त्याच संविधानावर आज संपूर्ण देश चालतो मात्र परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या त्या माथे फिरूचे हे कृत्य निंदनीय आहे त्याच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण आहे याचा पोलीस प्रशासनाने तपास करावा व अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी.तसेच या घटनेतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडी मध्ये मृत्यू झाला त्या वेळी असणारे पोलीसांचे निलंबन करण्यात यावे आशी ही मागणी समता युवक संघ औंध यांच्या मार्फत औंध पोलीस स्टेशन ला निवेदत देत करण्यात आली आहे.
यावेळी युवराज रणदिवे, प्रशांत सर्वगोड, शिवाजी रणदिवे, तुषार रणदिवे,प्रभाकर रणदिवे,अक्षय रणदिवे,रमेश रणदिवे, अमोल रणदिवे, दादा रणदिवे प्रफुल्ल रणदिवे उपस्थित होते.