Advertisement

उत्तम योजनांचा फक्त गाजावाजा; बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची फसवणूक


मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रहिवाशी दाखले, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड, सात-बारा उतारे, फेरफार नोंदी, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी विविध सवलती या सर्व योजना समाजहिताच्या आणि खरंच उपयुक्त आहेत. परंतु या चांगल्या योजनांच्या अंमलबजावणीत मुरुम येथील प्रशासनाने अक्षरशः नागरिकांची थट्टा केली आहे. शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात बुधवारी (ता. १६) रोजी नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे, मंडळ अधिकारी सुहास जेवळीकर, मुरुम मंडळ अधिकारी वैजनाथ माटे, तलाठी सुरेश खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्कार, भाषणे आणि फोटोसेशनवर भर दिला गेला. नागरिकांनी मोठ्या आशेने गर्दी केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त आधार सीडिंग या एका कामापुरतेच शिबिर मर्यादित राहिले. तेही केवळ अर्ध्या तासात तांत्रिक अडचणी सांगून बंद करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून केवळ एका तासात शिबिर संपल्याची घोषणा करण्यात आली आणि नागरिकांना अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज, दाखले, फेरफार नोंदी आणि इतर तक्रारी हाताळल्या देखील गेल्या नाहीत. उपस्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्व काही व्यर्थ ठरले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सगळ्यावर तहसीलदारांना कोणतीच माहिती नसल्याचे समजले आणि कार्यक्रमाबाबत मोघम उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, जर योजना राबवायच्या नसतील, तर अशा शिबिरांमुळे आम्ही का फसावयाचे ? काहींनी प्रशासनाच्या फोटोसेशनवर प्रश्न उपस्थित केला. हे फोटो केवळ कागदावर यश दाखवण्यासाठी वापरणार का ? यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. तहसीलदार व संबंधित अधिकारी आता हे शिबिर योग्य नियोजन करून, पारदर्शकतेने पुन्हा राबवतील का ? की यावरही पडदा टाकून, गप्प बसतील ? या ढोंगी अंमलबजावणीमुळे शासनाच्या उत्तम योजनांवर लोकांचा विश्वास उडत चालला आहे, हे दुर्दैवी वास्तव ! आता तरी प्रशासनाला जाग येईल का, की पुन्हा एकदा नागरिकांना फसवण्याचा कट रचला जाणार ?

वरकुटे येथे जुगार खेळताना ११ जण अटकेत,३लाख १२ हजार रुपये जप्त.

म्हसवड पोलिसांची अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई

म्हसवड (वार्ताहर)-
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 12 हजार 670 रुपयाचा जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना केली अटक केली आहे.

सविस्तर हकीकत
*मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावचे हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.*

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, पोलीस मित्र नारनवर यांनी या कारवाईत भाग घेतला.

या गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.

म्हसवड पोलिसांची अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई.

म्हसवड (वार्ताहर)-
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 12 हजार 670 रुपयाचा जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना केली अटक केली आहे.

सविस्तर हकीकत
*मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावचे हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.*

ग्रामविकासमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्यामुळे बेंदवस्तीच्या प्रश्न सुटला- हर्षवर्धन शेळके-पाटील

म्हसवड वार्ताहर
लोणंद MIDC ते मरिआईचीवाडी येथील हद्दीत सुरू असलेला केंद्र सरकारचा सौरऊर्जा प्रकल्प काही दिवसात सुरू होत आहे.
या प्रकल्पातून HT विद्युत लाईन औद्योगिक क्षेत्राकडे घेऊन जायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु ही लाईन जाण्यास बेंदवस्ती व सभोवतालच्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, राजकीय दबावापोटी या विद्युत लाईनच्या सर्व्हेमध्ये बदल करण्यात आला होता.
सदरच्या कामास कडाडून विरोध झाल्यावर शेतकऱ्यांनी हा प्रकार भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील यांच्या कानावर घातला. संबंधित शेतकरी, काँट्रॅक्टर, नायब तहसीलदार यांनी घटना स्थळावर पाहून सर्व्हे करून मा.तहसीलदार यांना अहवाल पाठवला.
श्री.हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी हा प्रकार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून देताच ग्रामविकास मंत्र्यांनी तहसीलदार अजित पाटील यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच ही विद्युत लाईन पुढे घेऊन जाण्याच्या सूचना केल्या.

त्याप्रमाणे आज तहसीलदार मा.अजित पाटील साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील, महावितरण उपविभागीय अधिकारी श्री.रेड्डीसाहेब, काँट्रॅक्टर श्री.खुडे, मंडलअधिकारी श्री.देवकाते साहेब यांनी संबधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढला व औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या HT विद्युत लाईनचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी नगरसेवक शिवाजीराव शेळके, मस्कुआन्ना शेळके, संदीप शेळके, शामराव शेळके, विकास क्षीरसागर, शरद शेळके, दिलीप क्षीरसागर, गोकुळ क्षीरसागर, तेजस शेळके, संतोष क्षीरसागर, संजय क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, मंगेश क्षीरसागर, सुजित क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
बेंदवस्ती व पाटीलवस्ती येथील शेतकऱ्यांच्या कडून ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्याड हल्ल्याबाबत सर्वपक्षीय जाहीर निषेध सभा मोठ्या उत्साहात संपन्न !

सातारा : संभाजी ब्रिगेडचे झुंजार नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानवादी,मानवतावादी, आंबेडकरवादी,पुरोगामी संघटना,पक्ष व व्यक्ती अर्थात, सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने जाहीर निदर्शने आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्यातील तमाम पुरोगामी पक्ष संघटना,व्यक्ती, धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय आदी संघटनांचे पदाधिकारी,प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.प्रथमतः सरकार विरोधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.भ्याड हल्ला करणाऱ्यासह मास्टर माईंडचा शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा द्यावी.या अनुषंगाने एकापेक्षा एक भाषणांची मैफिल रंगली असली तरी सरकार विरोधी आक्रोश होता.निदर्शने आंदोलनसह निषेध सभेसाठी अनेकजण हजर होते.गणेश भिसे यांनी प्रास्ताविक केले. गणेश वाघमारे यांनी आभार मानले.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.सदरच्या आंदोलनात भारत पाटणकर,पार्थ पोळके,राजेंद्र शेलार,तुषार मोतलिंग,चंद्रकांत तथा सी.आर.बर्गे,विजय मोरे,विवेकानंद बाबर,माणिक आढाव,मिनाज सय्यद,उत्तम भालेराव,अरबाज शेख,प्रमोद क्षीरसागर,उमेश खंडझोडे,प्रकाश काशिळकर, डॉ.श्री.व सौ.वंदना दीपक माने, संजय गाडे,विशाल भोसले, सतीश माने,नितीन रोकडे,भरत गाडे,डॉ.कारंडे, रामदास,रमेश गायकवाड, आदिनाथ बिराजे,विजय मांडके, हृषीकेश गायकवाड,दीपक गाडे, नितीन चव्हाण,अनिल वीर आदी मान्यवरांसह कांग्रेस, राष्ट्रवादी (एस.पी.), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई),दलित महासंघ, रिपब्लिकन सेना,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटना, जयंती समिती,दिपकभाऊ निकाळजे यांची आरपीआय, विद्रोही,मुस्लिम,भीमआर्मि आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्ते.

error: Content is protected !!