सातारा : (अनिल वीर यांजकडून) दुर्गम डोंगराळ अशी ओळख असलेल्या पाटण तालुक्यातील युवक विविध क्षेत्रांत गगनभरारी घेत आहेत. भविष्यात चांगले क्रिडापट्टू तयार होण्यासाठी शासकीय क्रिडासंकूल उभारण्यात यावे. अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास हादवे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
पाटण तालुका विविध वैशिष्टयानी देशाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे.
धार्मिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका जैवविविधतेने संपन्न असला तरीही दुर्गम म्हणून उपेक्षित राहिला आहे. तरीही तालुक्यातील तरुण-तरुणी अपार कष्ट करून गरिबीचा सामना करून विविध क्षेत्रांत भरती होऊन यश संपादन करत आहेत.तेव्हा क्रिडाक्षेत्राचा विचार करता या ठिकाणी कोणतेही क्रिडा प्रशिक्षण केंद्र व सुसज्ज क्रिडांगणे उपलब्ध नसतानाही तालुक्यातील अनेक युवक – युवतींनी क्रिडाक्षेत्रात भरारी घेत आहेत.यातुन भविष्यात राष्ट्रीय खेळाडूसुद्धा तयार होतील. यासाठी विविध स्पर्धेत उतरण्यासाठी तालुक्यात सुसज्ज शासकीय क्रिडासंकूल उभारून तरुणांचे राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून चमकण्याचे ध्येय पूर्ण होईल.अशा आशयाचे निवेदन आहे.
फोटो : क्रीडासंकुल संग्रहित.(छाया-अनिल वीर)