Advertisement

माजी धोंडीरामदादा वाघमारे यांची जयंती साजरी.

म्हसवड ( वार्ताहर )–

उरमोडी जिहे कठापूर सिंचन योजनांचे जनक माजी धोंडीरामदादा वाघमारे यांचा जयंती सोहळा गोंदवले येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेत वृक्षारोपण,हुंदका काव्यसंग्रहाचे वाटप व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमासाठी श्री.संत गाडगे महाराज मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री मधुसूदन मोहिते, राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे महासचिव श्री.राजेंद्र शेलार ,संचालक श्री.बाळासाहेब माने,श्री. मारुती महाराज माने फलटण येथील श्री.दादासाहेब खटके, श्री शिवाजीराव महानवर सर, माण पंचायत समितीचे माजी सभापती श्री.बाळासाहेब रणपिसे,श्री.आप्पासाहेब देशमुख, प्राध्यापक तात्यासाहेब वाघमारे,वंचित बहुजन आघाडीचे माण तालुका अध्यक्ष श्री.युवराज भोसले, मुख्याध्यापक श्री.प्रशांत घाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

धोंडीरामदादा वाघमारे यांच्या सारखे समाजहित जपणारी, भविष्याच्या दृष्टीने विचार करणारी अशी अनेक विद्यार्थी या आश्रम शाळेत घडतील.

श्रीमती लक्ष्मी इंगळे यांचे दुःखद निधन

सात मुलांची तीन मुलींची तीस नातवंडाची सोळा परंतुडांची, इंगळे कुटुंबाची आई हरवली

औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे

“संघर्षांची सावली, मायेची उब… ‘आईआजी ’ आज काळाच्या कुशीत”
खटाव तालुक्यातील औंध गावातील मातंग समाजातील ज्येष्ठ, शांत, प्रेमळ आणि कुटुंबप्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती लक्ष्मी तानाजी इंगळे (वय ९०) यांचं दिनांक २३ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने केवळ इंगळे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाज हळहळला आहे.
लहान वयातच संसाराचा गाडा हाती घेतलेली ही माय, पतीच्या निधनानंतरही खचली नाही. सात मुले, तीन मुली, सात सुना, ३० नातवंडे आणि १६ परतुंडे यांच्या जीवनात मायेची सावली ठरलेली लक्ष्मीबाई म्हणजे एक जिवंत प्रेरणा होती.


त्यांचा दिवस मुलांसाठी, सूनांसाठी आणि घरासाठी झिजत असे. त्या फक्त आई नव्हत्या – त्या शिक्षक होत्या, आधार होत्या, आणि प्रेरणा होत्या. “बडीबाई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वृद्धेचा प्रेमळ स्पर्श आणि शांत डोळ्यांतून उमटणारे मूक आशीर्वाद आजही घराघरांत जिवंत आहेत.
वयाच्या ७५व्या वाढदिवशी मुलांनी आणि नातवंडांनी ज्या उत्साहाने त्यांच्या आयुष्याचा गौरव केला, तो दिवस औंधच्या इतिहासात कोरला गेला. पण आता या मायेच्या आभाळाला काळाची किनार लागली.
ती गेली खरी… पण तिच्या शिकवणीने, सवयींनी आणि संस्कारांनी भरलेलं हे कुटुंब आज तिच्या आठवणींचं रूप बनून उभं आहे.
अशा या हजारो शब्दांनी न सांगता येणाऱ्या ‘मायमाऊली’ला, इंगळे कुटुंब आणि औंध ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

वारकऱ्यांना मेडिकल असोसिएशन म्हसवड मार्फत आरोग्य सेवा देणार

म्हसवड वार्ताहर

वारी पंढरीची..
सिदनाथच्या पावन नागरितून जाणाऱ्या सर्व पालखीतील वारकऱ्यांना म्हसवड मेडिकल असोसिएशन म्हसवड मार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.


उद्या मंगळवार दिनांक 1/07/2025 रोजी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत म्हसवड मेडिकल असोसिएशन व परिसतील सर्व डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन व लॅब टेक्निशियन ( माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज मासाळ वाडी ) नर्सिंग स्टाफ सर्वांचे योगदान लाभणार आहे.
या मध्ये सर्व आजारावर उपचार केले जातील, गरज असेल त्या रुग्णांना रक्ताच्या लघवीच्या तपासण्या करून ऍडमिट कारण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे….
सर्व वारकरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा हि विनंती.

जयराम स्वामी पायी पालखीचे मेडिकल कॉलेज कडून आरोग्य तपासणी

मायणी प्रतिनिधी-

खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील जयराम स्वामी पाई पालखीचे रविवारी सायंकाळी सहा वाजता यावेळी माजी सरपंच प्रकाश कणसे व कार्यकर्त्यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले सोमवारी सकाळी नऊ वाजता मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी सर्व पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली यामध्ये 300 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली तर यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

ताप ,कणकण अंगदुखी, पोट दुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, इत्यादी आजारावर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपचार करून औषधे मोफत दिली या आरोग्य सोयीबद्दल मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी मेडिकल कॉलेजचे प्रमुख संदीप देशमुख यांचे आभार मानले
मी

स्टेट बँकेत हिंदी भाषिकांकडून मराठी खातेदारांना मिळतो न्याय…

सातारा दि: भाषा ही एकमेकांना समजून घेण्याची व मदत करण्याचे भूमिका पार पाडते. त्यामुळे अनेक व्यवहार सुरळीत होतात. साताऱ्यात प्रतापगंज पेठेतील भारतीय स्टेट बँकेत सध्या हिंदी भाषिक वरिष्ठ अधिकारी ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांनी अगोदर भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत मराठी खातेदारांना होणाऱ्या अन्याय दूर करावा अशी मागणी होऊ लागलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सातारा शहरांमध्ये प्रतापगंज पेठ या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. वास्तविक पाहता भारतातील मोठी बँक असल्यामुळे ग्राहक व खातेदारांचा विश्वास संपादन केला आहे .भारत देशातील एक नंबरची बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे सुमारे २३ हजार शाखा आहेत, ६३,५८० ए.टी.एम/ए.डी.डब्ल्यू.एम, ८२,९०० बी.सी. आउटलेट्सच्या विशाल नेटवर्कद्वारे ५०० दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. भारतीय रेल्वे सेवेनंतर भारतीय स्टेट बँकेचा ग्राहकांशी उत्तम सेवा म्हणून नंबर लागतो. २४१ कार्यालये आणि २९ परदेशी देशांमध्ये टाइम झोनमध्ये कार्यरत आहे.
या एवढ्या मोठ्या बँकेच्या कामकाजासाठी सर्व जाती धर्मातील व भाषिक अधिकारी व कर्मचारी अहोरात्र झटत असतील. पण, सातारा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेतील काहीजण अपवाद आहे. हे ओघाने नमूद करावे वाटते. तसा अनुभव अनेकांना आलेला आहे. या उलट हिंदी भाषिक वरिष्ठ अधिकारी खातेदार व ग्राहकांशी आपुलकीने वागत आहेत.
प्रतापगंज पेठ शाखेत बँकेचे कामकाज करताना होणाऱ्या मनस्ताप मुळे अनेक जण इतर बँकेत ठेवी व व्यवहार करत आहे. यातून कुणीही बोध घेतला नाही. सोमवारी सकाळी प्रतापगड शाखेत एक व्यक्ती खातेदारांच्या कामकाजाबाबत साधा अर्ज देण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी बऱ्याच अवधीनंतर थेट वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. मराठी भाषेत त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. ते समजून घेऊन त्यांनी हिंदी भाषेतच नेमकं काय करावा लागेल. हे थोडक्यात सांगितले. आणि त्या ग्राहकाच्या कामासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दिलासा दिला.
भारतीय स्टेट बँक प्रतापगंज पेठ शाखेत हिंदी भाषिकांकडून मराठी भाषिकाला न्याय मिळाला. हे पाहून इतर खातेदारांनी समाधान व्यक्त केले. जे कोणी चांगले काम करतात. त्यांची जात- धर्म- पंथ- प्रांत न बघता त्यांचे कौतुक करणे. हे सातारकरांचा बाणा आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत बहुतांश मराठी अधिकारी कर्मचारी एवढेच नव्हे तर वॉचमन पासून ते शिपायांपर्यंत अनेक जण ग्रामीण भागात मराठी भाषा बोलतात. काही जण आपुलकीने वागतात तर काही खातेदारांवर उपकार केल्यासारखे काम करतात.
वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातून आलेल्या काही खातेदारांना बँकेचा व्यवहार समजत नाही. त्यांना समजून घेण्याऐवजी भरकटलेल्या मानसिकतेसारखे फक्त आकडा सांगितला जातो. सहा नंबरला जावा. चार नंबरला जावा. आठ नंबर ला जावा. बिचारा बँकेला संपूर्ण हेलपाटे मारून सुद्धा त्याचे काम होत नाही. हा भाग वेगळा आहे. परंतु असेही परिस्थितीमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांनी मराठी खातेदार असलेल्या व्यक्तीच्या कामासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकाला योग्य मार्गदर्शन केले. ही खूप कौतुकाची बाब आहे. मराठी भाषा ही सर्वगुणसंपन्न आहे. परंतु, ती राबवणारे जर कुचकामी ठरले तर अशा मराठी भाषिकांबद्दल टीकाटिपणी गरजेचे आहे. मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्यांनी किमान भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगड शाखेत जाऊन मराठी ग्राहकांची कशी ससेहोलपट होते. हे एकदा पहावे आणि जमलं तर आंदोलन करावे. म्हणजे त्यांना मराठी माणसांवरील अन्यायाची धाक्त दिसून येईल. आपला तो बाब्या व दुसऱ्याच ते कार्ट ही मानसिकता नक्कीच बदलेल. अशी काही खातेदारांनी आशा व्यक्त केली आहे. या बँकेच्या शाखेचा अनुभव घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खासदार व आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांचे वेतन या खात्यातून द्यावे अशी मागणी पुढे आलेली आहे.


फोटो — भारतीय स्टेट बँक, प्रतापगंज पेठ, शाखा

परांजपे ऑटोकास्ट युनियनचे अध्यक्ष माननीय नितीन माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे

युवा उधोजक बाळासाहेब खरात यांची वाढदिवसाला हजेरी
फोनकॉल द्वारे लोकनायक अंकुश भाऊगोरे, माजी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, खाजदार निलेश लंके साहेब, माजी आमदार दिलीपरावजी येळगावकर साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे यांच्या शुभेच्छा
खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र माननीय नितीन माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न नितिन माने यांचे संपूर्ण शिक्षण हे सातार मध्ये झाले,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथून त्यांनी बीएस सी डिग्री घेत 2001 साली परांजपे ऑटोकास्ट कंपनी मध्ये ते रुजू झाले हरहुन्नरी स्वभावामुळे कंपनी मध्ये सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व झाले शांती, संयमी प्रेमळ स्वभाव यामुळे ते सर्व कामगारांवर आपले नेतृत्व कमवत आले त्यामुळे त्यांनी कंम्पनी मध्ये कामगार संघटनेचे सचिव पद, उपाअध्यक्ष पद मिळवले सन 2024 रोजी त्यांचि युनियन अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांच्या वाढदिवसला प्रमुख उपस्थिती ही धनगरवाडी गावाचे युवा नेते व युवा उधोजक श्री बाळासाहेब खरात यांची होती तर परांजपे ऑटोकास्ट युनियन सचिव श्री प्रदीप वाघमळे चेरमन सचिन भोसले, प्रकाश पवार, प्रमोद पोळ, युवराज कदम, अभिजीत काकडे, राहुल नलवडे, नितिन नलवडे, अमोल फडतरे, नवनाथ बर्गे शीवाजी मांडवे , युवा उधोजक श्री अमित चव्हाण, उदयोजक स्वप्नील माने, स्वप्नील जाधव, मयूर जगताप, गणेश पवार, युवा नेते विक्रम जाधव, गोकुळ मित्र समूहाचे अध्यक्ष श्री अमोल जाधव यांची हजेरी होती

खटाव तालुक्यात जिवंत सातबारा मोहीम : तहसीलदार बाई माने

वडूज: प्रतिनिधी (विनोद लोहार )
वडूज: खटाव तालुक्यातील सर्व मंडलामध्ये जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन राबवण्यात येणार असून या अंतर्गत चुकांच्या दुरुस्तीबाबतची अर्ज जबाब व आवश्यक कागदपत्रे कँम्पच्या अगोदर तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तरी शासनाच्या या मोहिमेचा संबंधित ग्रामस्थांनी आपल्या मंडलात दिलेल्या तारखे दिवशी हजर राहण्याचे आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केले आहे.


या मोहिमे अंतर्गत अपाक शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे , कालबाह्य नोंदी कमी करणे, इतर नोंदी, भूसंपादन निवाडा, सातबारा सदरील नोंदी घेणे, महिला वारस नोंदी करणे ,कालबाह्य व निरोपयोगी नोंदी सातबारा उताऱ्यावरील कमी करणे आधी कामकाज करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार आहे . खटाव तालुक्यातील प्रत्येक सजामध्ये कॅम्प आयोजित केले आहेत. सोमवार दिनांक ३० जून पासून २६ आँगस्ट पर्यंत सकाळी आठ ते बारा तसेच काही सजामध्ये सकाळी ११ ते दोन वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे.यासाठी कँम्प अगोदर ग्राम महसूल अधिकारी यांनी हस्तलिखीत सातबारा वरून संगणकीय सातबारा तपासणी करून असलेल्या चुकांच्या दुरूस्तीबाबतचे अर्ज, जबाब व आवश्यक कागदपत्रे तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यासाठी गावांमध्ये दवंडी देऊन, सोशल मिडीयाद्वारे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय नोटीस बोर्डावर कँम्प च्या आयोजनाचे नियोजन, प्रचार व प्रसिध्दी करण्यात याव्यात अशा सुचनाही तहसिलदार बाई माने यांनी दिल्या.
यामध्ये ३० जून वडूज येथे ८ ते १२ , खटाव येथे ११ ते २,
२ जुलै गणेशवाडी येथे ८ ते १२ तर धारपुडी येथे ११ ते २ , ४ जुलै कुरोली सिध्देश्वर येथे ८ ते १२ , दरुज ११ ते २ , ७ जुलै मांडवे येथे ८ ते १२ तर जाखनगाव ११ ते २ , ८ जुलै गोपूज ८ ते १२ तर खातगुण येथे ११ ते २ , ९ जुलै भुरकवडी येथे ८ ते १२ तर जांब येथे ११ ते २ , १० जुलै पुसेगाव येथे ८ ते १२ तर पुसेसावळी येथे ८ ते १२ , ११ जुलै विसापूर येथे ८ ते १२ तर जयराम स्वामी वडगाव येथे ८ ते १२ , १४ जुलै निढळ येथे ८ ते १२ तर राजाचेकुर्ले येथे ८ ते १२ , १५ जुलै कटगुण येथे ८ ते १२ तर पारगाव येथे ८ ते १२ , १६ जुलै नेर , वाझोंळी , पळशी येथे ८ ते १२, १७ जुलै वर्धनगड , निमसोड ८ ते १२ , १८ जुलै बुध येथे ११ ते २ तर भूषणगड येथे ८ ते १२ , २१ जुलै वेटणे येथे ११ ते २ तर गुरसाळे येथे ८ ते १२, २२ जुलै अंबवडे येथे ८ ते १२ तर ललगुण येथे ११ ते २ , २३ जुलै चोराडे येथे ८ ते १२ तर नागनाथवाडी येथे ११ ते २ , २४ जुलै म्हासुर्णे येथे ८ ते १२ तर राजापूर येथे ११ ते २ , २५ जुलै मायणी येथे ८ ते १२ तर डिस्कळ येथे ११ ते २ , २८ जुलै धोंडेवाडी येथे ८ ते १२ तर मोळ येथे ११ ते २ , २९ जुलै मोराळे येथे ८ ते १२ तर चिंचणी येथे ११ ते २ , ३० जुलै पिंपरी येथे ८ ते १२ तर औंध येथे ११ ते २ , ३१ जुलै चितळी येथे ८ ते १२ तर नांदोशी येथे ११ ते २ , १ ऑगस्ट अनफळे येथे ८ ते १२ तर येळीव येथे ११ ते २ , ४ ऑगस्ट कातरखटाव येथे ८ ते १२ तर जायगाव येथे ११ ते २ , ५ ऑगस्ट एनकूळ येथे ८ ते १२ तर कळंबी येथे ११ ते २ , ६ ऑगस्ट पळसगाव ८ ते १२ , ७ ऑगस्ट डांभेवाडी ८ ते १२ , ८ ऑगस्ट बोंबाळे ८ ते १२ , ११ ऑगस्ट हिंगणे ८ ते १२ , १२ ऑंगस्ट कलेढोण येथे ८ ते १२ , १३ ऑगस्ट तरसवाडी , १४ ऑगस्ट पाचवड ८ ते १२ , १८ ऑगस्ट विखळे येथे ८ ते १२ असे कार्यक्रम होणार आहेत .
जिवंत सातबारा मोहिमेत अधिक व्यापक व विस्तारित स्वरूपात करण्याबाबत शासनाकडील निर्देश प्राप्त आहेत .जिवंत सातबारा मोहिमेच्या कामांमध्ये निष्काळजीपणामुळे पुनश्च: चुका केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती देखील तहसीलदार बाई माने यांनी यावेळी दिली आहे
..

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलोची चांदी घागर अर्पण,

रामेश्वर कोरे पंढरपूर

( दि.26) वै.ह.भ.प. जयदेव हरी भोईर यांच्या स्मरणार्थ भोईर बंधू यांनी आज दि.26 जून रोजी 4 किलो 150 ग्रॅम वजनाची चांदीची घागर श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चरणी अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. त्यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. या चांदीच्या घागरीचे सुमारे 4 किलो 150 ग्रॅम वजन असून, त्याची अंदाजीत रक्कम 4 लाख 33 हजार होत आहे. देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.सद्यस्थितीत, आषाढी यात्रा 2025 चा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसरात व दर्शन रांगेत गर्दी होत आहे. देणगीदार भाविकांना देणगी देण्यासाठी ज्यादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, सोने चांदीच्या स्वरूपातील वस्तू भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून, त्यासाठी विभाग प्रमुख, लिपिक व अनुभवी सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. इच्छुक भाविकांनी देणगी व सोने-चांदी भेटवस्तू देण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असे मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
..

लोकमत’चे नितीन काळेल यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

पुणे येथे कार्यक्रम : मराठी पत्रकार संघातर्फे सन्मान सोहळा

सातारा : मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथील कार्यक्रमात ‘लोकमत’चे सातारा आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक नितीन काळेल यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देशरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना अपंगत्व पत्करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘नेशन फर्स्ट’ हा कार्यक्रम सोमवारी पुण्यात झाला. केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जवानांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, सुनील माळी, भावेश शिंगोटे, आनंद रेखी, सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी उपस्थित होते.
‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर म्हणाले, “देशाच्या सीमेवर भारतीय जवान खंबीरपणे उभे आहेत म्हणून आपण आज इथे आहोत. त्यांच्या धैर्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. नेशन फर्स्ट कार्यक्रमानिमित्त त्यांचा होणारा गौरव हा खरोखरच अभिमानास्पद आहे.
……………………..


फोटो ओळ : पुणे येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक नितीन काळेल यांना सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते.
……………………………………

म्हसवड पोलीसांनी धाड टाकूनदारू व ताडी विक्रेत्यांना केली अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध दारू, ताडी विक्री धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच

180 लिटर ताडी आणि देशी-विदेशी दारू जप्त करून एकाच दिवसात 3 ठिकाणी कारवाई आणि आरोपींवर गुन्हे दाखल.

म्हसवड (वार्ताहर):-
सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीसांनी दारू व ताडी विक्रेत्यांना अटक केली असून दारू व ताडी मुद्देमाल जप्त केला आहे.

error: Content is protected !!