Spread the love

स्टेट बँकेत हिंदी भाषिकांकडून मराठी खातेदारांना मिळतो न्याय…

सातारा दि: भाषा ही एकमेकांना समजून घेण्याची व मदत करण्याचे भूमिका पार पाडते. त्यामुळे अनेक व्यवहार सुरळीत होतात. साताऱ्यात प्रतापगंज पेठेतील भारतीय स्टेट बँकेत सध्या हिंदी भाषिक वरिष्ठ अधिकारी ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांनी अगोदर भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत मराठी खातेदारांना होणाऱ्या अन्याय दूर करावा अशी मागणी होऊ लागलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सातारा शहरांमध्ये प्रतापगंज पेठ या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. वास्तविक पाहता भारतातील मोठी बँक असल्यामुळे ग्राहक व खातेदारांचा विश्वास संपादन केला आहे .भारत देशातील एक नंबरची बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे सुमारे २३ हजार शाखा आहेत, ६३,५८० ए.टी.एम/ए.डी.डब्ल्यू.एम, ८२,९०० बी.सी. आउटलेट्सच्या विशाल नेटवर्कद्वारे ५०० दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. भारतीय रेल्वे सेवेनंतर भारतीय स्टेट बँकेचा ग्राहकांशी उत्तम सेवा म्हणून नंबर लागतो. २४१ कार्यालये आणि २९ परदेशी देशांमध्ये टाइम झोनमध्ये कार्यरत आहे.
या एवढ्या मोठ्या बँकेच्या कामकाजासाठी सर्व जाती धर्मातील व भाषिक अधिकारी व कर्मचारी अहोरात्र झटत असतील. पण, सातारा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेतील काहीजण अपवाद आहे. हे ओघाने नमूद करावे वाटते. तसा अनुभव अनेकांना आलेला आहे. या उलट हिंदी भाषिक वरिष्ठ अधिकारी खातेदार व ग्राहकांशी आपुलकीने वागत आहेत.
प्रतापगंज पेठ शाखेत बँकेचे कामकाज करताना होणाऱ्या मनस्ताप मुळे अनेक जण इतर बँकेत ठेवी व व्यवहार करत आहे. यातून कुणीही बोध घेतला नाही. सोमवारी सकाळी प्रतापगड शाखेत एक व्यक्ती खातेदारांच्या कामकाजाबाबत साधा अर्ज देण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी बऱ्याच अवधीनंतर थेट वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. मराठी भाषेत त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. ते समजून घेऊन त्यांनी हिंदी भाषेतच नेमकं काय करावा लागेल. हे थोडक्यात सांगितले. आणि त्या ग्राहकाच्या कामासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दिलासा दिला.
भारतीय स्टेट बँक प्रतापगंज पेठ शाखेत हिंदी भाषिकांकडून मराठी भाषिकाला न्याय मिळाला. हे पाहून इतर खातेदारांनी समाधान व्यक्त केले. जे कोणी चांगले काम करतात. त्यांची जात- धर्म- पंथ- प्रांत न बघता त्यांचे कौतुक करणे. हे सातारकरांचा बाणा आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत बहुतांश मराठी अधिकारी कर्मचारी एवढेच नव्हे तर वॉचमन पासून ते शिपायांपर्यंत अनेक जण ग्रामीण भागात मराठी भाषा बोलतात. काही जण आपुलकीने वागतात तर काही खातेदारांवर उपकार केल्यासारखे काम करतात.
वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातून आलेल्या काही खातेदारांना बँकेचा व्यवहार समजत नाही. त्यांना समजून घेण्याऐवजी भरकटलेल्या मानसिकतेसारखे फक्त आकडा सांगितला जातो. सहा नंबरला जावा. चार नंबरला जावा. आठ नंबर ला जावा. बिचारा बँकेला संपूर्ण हेलपाटे मारून सुद्धा त्याचे काम होत नाही. हा भाग वेगळा आहे. परंतु असेही परिस्थितीमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांनी मराठी खातेदार असलेल्या व्यक्तीच्या कामासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकाला योग्य मार्गदर्शन केले. ही खूप कौतुकाची बाब आहे. मराठी भाषा ही सर्वगुणसंपन्न आहे. परंतु, ती राबवणारे जर कुचकामी ठरले तर अशा मराठी भाषिकांबद्दल टीकाटिपणी गरजेचे आहे. मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणाऱ्यांनी किमान भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगड शाखेत जाऊन मराठी ग्राहकांची कशी ससेहोलपट होते. हे एकदा पहावे आणि जमलं तर आंदोलन करावे. म्हणजे त्यांना मराठी माणसांवरील अन्यायाची धाक्त दिसून येईल. आपला तो बाब्या व दुसऱ्याच ते कार्ट ही मानसिकता नक्कीच बदलेल. अशी काही खातेदारांनी आशा व्यक्त केली आहे. या बँकेच्या शाखेचा अनुभव घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खासदार व आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांचे वेतन या खात्यातून द्यावे अशी मागणी पुढे आलेली आहे.


फोटो — भारतीय स्टेट बँक, प्रतापगंज पेठ, शाखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!