म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
मारहाण करून जबरी चोरी केलेल्या आणि 4 वर्षांपासून फरार राहून माननीय न्यायालयात हजर न राहणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक
सविस्तर हकीकत
म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 30/2019 भादविस कलम 394, 323, 504, 506,34 प्रमाणे सन 2019 साली मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद असून यातील आरोपी नामे रोहिदास शिवाजी जाधव यांनी त्याच्या साथीदारांसह या गुन्ह्यातील तक्रारदार यांना लोखंडी रॉड व इतर घातक हत्यारांनी मारहाण करून त्याची सोन्याची चैन जबरी चोरी करून घेतलेली होती. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र माननीय न्यायालयात जमा करण्यात आलेले होते. परंतु माननीय न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणी करिता यातील आरोपी नामे रोहिदास शिवाजी जाधव हा गेल्या चार वर्षांपासून हजर राहत नव्हता, त्यामुळे त्यास अजामीनपात्र नॉन बेलेबल अटक वॉरंट काढण्यात आलेले होते. हा आरोपी खूप प्रयत्न करून देखील बऱ्याच दिवसांपासून फरार झालेला होता. त्यामुळे या आरोपीला पकडण्याकरिता एक शोध पथक तयार करून त्याची गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणावरून माहिती काढून त्यास पळशी येथून अटक करण्यात आलेली असून आज रोजी माननीय न्यायालयात त्यास हजर केलेले आहे.
सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, भगवान सजगणे, धीरज कवडे, नवनाथ शिरकुळे, वसीम मुलानी, राहुल थोरात, हर्षदा गडदे यांनी केलेली आहे.