Advertisement

शालेय दिंडी चे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केले पूजन

म्हसवड वार्ताहर

जिल्हा परिषद शाळा नंबर १ यांच्या दिंडीचे स्वागत व पूजन करताना माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी.
जिल्हा परिषद शाळा नंबर 3 यांच्या दिंडीचे स्वागत व पूजन करताना माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी.
गुरुकुल शाळेच्या माऊलीच्या दिंडीचे स्वागत व पूजन करताना माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी.
ज्ञानवर्धिनी हायस्कूल यांच्या माऊलीच्या दिंडीचे स्वागत व पूजन करताना माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी


म्हसवड परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शहरातून पालखी ,व दिंडी आयोजन केले होते.

औंधकर मठात 10 रोजी गुरुवारी गुरु पौर्णिमा, गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन

मायणी (प्रतिनिधी)- मायणी येथील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या औंधकर मठात गुरुपौर्णिमा व गुरुवंदना कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतीक महाराज औंधकर यांनी दिली आपल्या हिंदू राष्ट्रात गुरुवंदना या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे सद्गुरू मुळे शिष्याची जीवन परिपूर्ण होत असते म्हणूनच आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतात यानिमित्ताने मठामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केली आहेत कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे*–सकाळी सात वाजता मुनी महाराजांच्या समाधीस अभिषेक, सकाळी दहा वाजता भजन, दुपारी बारा वाजता लिंगैकय श्री षट स्थल ब्रह्मी 108 गुरु गंगाधर शिवाचार्य ओंकार महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून महामंगल आरती होणार आहे तर दुपारी बारा ते दोन या कालावधीमध्ये महाप्रसाद वाटप होणार आहे तरी सर्व शिष्य, सदभक्तांनी कार्यक्रमात तन-मन-धनाने सेवासमर्पण करून गुरुकृपेस पात्र व्हायचे आहे असे शार्दुल स्वामी यांनी सांगितले आहे

error: Content is protected !!