
औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
खटाव तालुक्यातील औंध गावामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा समता युवक संघ औंध, पुणे, मुंबई यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 13 रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचून अभिवादन होणार आहे त्यानंतर 13 रोजी बारा वाजता त्रिशरण पंचशील अनुग्रहण करून 14 एप्रिल महासकाळ कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे 14 रोजी सकाळी आठ वाजता महाअभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजारोहण व मान्यवरांचे भाषणे होणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात येणार आहे. दिनांक 15 रोजी एक ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व महिला विशेष कार्यक्रम,मुले मुली महिला पुरुष यांच्यासाठी संगीत खुर्ची सारखे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत संध्याकाळी सात वाजता माननीय भगवान रणदिवे यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रबोधन पर कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी नऊ वाजता भीम गीते होणार आहेत त्या दिवशी संध्याकाळी प्रदीप दिनकर रणदिवे व राजेंद्र सोपान रणदिवे यांच्या वतीने स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले आहे दिनांक 16 रोजी संध्याकाळी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा असून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सलग 26 तास नृत्याचा विश्वविक्रम असणारे लावणी सेवक शिवम इंगळे यांच्या लावणीचे सादरीकरण होणार आहे