
म्हसवड दि प्रतिनीधी
सतयुगातील रामायणातील प्रभु रामचंद्राना प्रथम पाहिल्यावर त्यांचा परमभक्त हनुमंताच्या डोळ्यात जसे आनंदाश्रू यावेत तसा काहिसा प्रसंग काल नागपुर विधानभवनात उपस्थितांना डोळ्यांनी पाहायला मिळाला माण खटाव चे पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली याचा सर्व माण खटावच नाहि तर संपूर्ण सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व सामान्य माणसाला अत्यानंद झाला या आनंदाच्या भरात काहि कार्यकर्त्यांनी मंत्री गोरे भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी तडक नागपूरच विधानभवन च गाठले या कार्यकर्त्यात मंत्री गोरे भाऊंनी तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून भाऊंबरोबर असलेले म्हसवड चे माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी काही कार्यकर्यासह हि नागपूर गाठले नागपूर १०० ते १५० किलोमीटर राहिले असताना धट यांनी गोरे भाऊंना फोन केला व मी तुम्हांला भेटायला आलोय असे सांगितले मात्र मंत्री गोरे भाऊ हे नियोजित ठिकाणी बाहेर चालले होते मात्र आपला एक सच्चा कार्यकर्ता भेटायला येतोय म्हणून भाऊंनी बाहेर जायचे थांबत सावकाश या मी थांबतोय असे सांगितले यावरून नेता कसा असावा कॅबिनेट मंत्री झालो म्हणून कसलाही अहंभाव न ठेवता कार्यकत्यासाठी मंत्री महोदय थांबले काहि वेळातच विजय धट नागपूर विधानभवनात पोहचले आणि मंत्री गोरे भाऊंची भेट होताच धट यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी गोरे भाऊंना मिठीच मारली बराच वेळ धट यांना काय बोलावे हेच सुचेना त्याचा कंठ दाटून आला होता जसे सतयुगातील रामायणातील प्रभु रामचंद्राना प्रथम पाहिल्यावर त्यांचा परमभक्त हनुमंताच्या डोळ्यात जसे आनंदाश्रू यावेत तसे मंत्री जयकुमार गोरे भाऊंना पाहताच त्यांचा कार्यकर्ता विजय धट यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले “संघर्ष असा करावा कि नशीबाला ही झुकावे लागले पाहिजे” हे मंत्री जयकुमार गोरे भाऊंकडे पाहुन शिकावे अशी मोजकीच पण बळ देणारी प्रतिक्रिया यावेळी धट यांनी दिली
यावेळी अरुण मुकिरे, महेश गायकवाड ,राजू डाके, अमोल शिंदे, संभाजी कडवणे, दत्ता डावखरे, गंगाराम शिंदे, आकाश मेंढापुरे, अनिकेत लांब ,आकाश पिसे, शुभम लिंगे, अनिकेत लिंगे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते